भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 26, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 26

.. बत्तीस . शाश्वतचा विसावा अशी ही पावन व मगंलकारी तुकोबाची वाणी ही नारायणाच्या कृपेने रगलेली आहे ती देवाचा निरोप सागणारो आहे खऱ्याखोट्याचा निवाडा करणारी आहे वेदाचा व पूर्वपरंपरेचा अर्थ यथार्थत्वाने सागणारो आहे तिला दिव्यत्वाचा स्पर्श झालेला आहे परतत्त्वाच्या स्पर्शाने ती सतेज बन- लेली आहे ईश्वरी प्रेमाने ती लडिवाळ व कमालीची रसाळ झाली आहे तिला अमृताचे माधुर्य आहे, चंद्रिकेची शीतलता आहे. तिला चंदनाचा सुगध आहे, तिला विठ्ठलरूपाचा स्वाद आहे 'तुका म्हणे चवी आले । जें कां मिश्रित विठ्ठले,' तुकोबाचे सर्व जीवनच विठ्ठलस्पर्शाने पावन झालेले होते त्याची शाश्वत टिकणारी अशी ही अभंगवाणी, आजच्या पडत्या काळात, घाईगर्दीच्या काळात, तीव्र जीवनकलहाच्या काळात, अशांततेच्या काळात, धामधुमीच्या व क्वचित प्रसंगी अराजकाच्या काळात, माणसाच्या मनास सावरणारी आहे, धीर देणारी आहे तिच्या सावलीतच माणसाचे तप्त मन आजही विसावा घेऊ शकेल, आजही त्यास अलौकिक सुखाचे व आंतरिक समाधानाचे मार्ग स्पष्टपणे दिसतील ते तुकाराम महारा- जाच्या या वाणीच्या सौम्य व शीतल प्रकाशातच