भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 275, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 275

सार्थ तुकारामगाथा २४७ पैसा सर्व टाकून दे. उगाच व्यर्थ बडबड करू नकोस श्रीगुरूच्या प्राप्तीशिवाय दुसरा मार्ग नाही. इतर सर्व करशील ते फोल आहे. २ चांगले खातेस, नेसतेस आणि वर म्हणतेस, आम्ही देवाच्या दासी आहोत. पण साधुसंत घरी येताच पाठमोऱ्या होऊन पळून जाता, नाही का ? ३ असेच सत वरवरचे झाले आहेत वाचून, पडून शहाणे झाले व आम्ही सत झालो असे म्हणतात, पण दुसऱ्याची स्त्री पाहताच याचे चित्त विचलित होते. ४ याच्या कपाळावर टिळा असतो, टोपी डोक्यावर साधूंसारखी असते, गळयात माळा असतात. आम्ही साधू असेही हे म्हणतात, पण याच्या चित्तात दयाधर्म नसल्यामुळे हे भोंदूच समजायला हवेत ५ या कलियुगात संत घरोघरी फारच झाले आहेत पण गोतभर पोट भरण्यासाठी ते दारोदार हिंडत राहिले आहेत. ६ संत म्हणतील याने आमची निंदा केली, पण तुकाराम महाराज म्हणतात, बधूनो, ही निंदा नव्हे खऱ्या सतांच्या पायी हा मी नेहमी अनन्य भावाने शरण आहे ७ विवरण - मराठी संतांच्या भारूड वाङ्मयात निरनिराळे धंदे करणाऱ्या लोकांच्या बरोबर सौरी ही एक असते सौरी म्हणजे वाईट चालीची, पण देवाची नाते जोडणारी बाजारबसवी स्त्री असाच वरवरचा अर्थ आहे जगतीने वा कुणाच्या फसवणुकीने ही स्त्री वाईट नादी लागने व मग मनात विकार असून देवाच्या नावावर देवदासीचा व माधुर्याचा आविर्भाव आणते हिच्याभोवती अनेक माणसे टपून असतात देवाच्या भावाखाली चाललेल्या या विक्षिप्त प्रकाराची तुकारामबुवांनी कडाडून हजेरी घेतली आहे पायातळूकू लावून, नट्टापट्टा करुन जाणाऱ्या व केवळ पैशावर नजर ठेवणाऱ्या सौरीचा बुवांनी निषेधच केलेला आहे या सौरीच्या भोवती जमणारा गोतावळा मोठा चमत्कारिकच असतो ना पुरुष, ना स्त्री अशांपैकी हिजडे गळ्यात कवडयाची माल घालून देवीचे, खंडोबाचे भक्त स्वतःस म्हणवितात त्याच्या मनातील दुःखाचा, त्यांच्या संसाराचा निर्देश तुकोबांनी मोठ्या मार्मिकतेने वरील काही अभंगातून केलेला आहे खरोखरच चुकून फसली गेली आहे मनातूनच लौकिकाला विटून देवाच्या दारी आलेली आहे मनात ईश्वरप्रेम दाटून आले आहे अशा सौरीबद्दल तुकोबाच्या मनात नक्की आस्था आहे, किंवा एखाद्या वेळेस वाकडे पाऊल पडले असेल, पण आता पश्चात्तापाने दग्ध झाल्यावर जर ईश्वरभक्तीची जोड मिळाली तर सौरी सौरी राहू नये असाही या अभंगाच्या मागचा हेतू असावा 'सौरी' सुद्धा शुद्ध भाव धरून ईश्वरकृपेस पात्र होऊ शकते अशी उदाहरणे पिंगळा, कान्होपात्रा इत्यादी पतित समजल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीतीलच माहीत काय ? 'सौरी'वर एकनाथ, ज्ञानेश्वर यांसारख्या संतांनीही पद्यरचना केलेली आहे ज्ञानेश्वरांच्या 'सौरीने' 'होय सौरी आता उघडा घाली माथा । परपुरुषां रमल्या वाई त्याची पतिव्रता' असे म्हटले आहे दुसरी एक सौरी म्हणते, 'धर्मास्तव झालों सोरा । मेलों पंढरपुरा । संत सनकादिका मेळीं ठोर वाईला पुरा-।' या शब्दांतून सौरीचे पश्चात्ताप- युक्त अंतःकरण स्पष्ट दिसते परंतु एकनाथतुकारामांनी सौरीचे धाष्ट्र्य व फसवे चाळेही वर्णन केले आहेत मुसलमानी सत्तेत नाना आपत्ती स्त्री जातीवर आल्या 'मी मुल्लाची कन्यका झाले वाढविली घरीं । देखतां देखतां उचलून नेली चोरी ॥ सौरी झाले बाई आता करू तरी बाई ?' असे अगतिक होऊन एक सौरी म्हणत आहे, तर दुसरीचे वर्णन पाहा कसे आहे ते ' येणी फणी वानाळ कुंकू केला टाकनटिका । बांधुनि बुचडा उघडा माथा विभूतीचा पट्टा । आला गेला म्हटला नाहीं धरल्या चारी वाटा । जानी भ्रष्ट झाली सौरी हिंडे दारोदारीं ॥' अशाच सौरीचे तुकोबांनीही वरील काही अभंगात वर्णन केलेले दिसून येईल सारांश, वरवरच्या सोंगपेक्षा, देखाव्यापेक्षा, अंतरंगातील भावभक्तीला महत्त्व आहे ती जर असेल तर 'सौरी'ला सुद्धा आयुष्याचे सार्थक करता येण्यासारखे आहे वाघा-अभंग १ ४६६ अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्हारी देवाचा ॥ १ ॥ शुद्धसत्त्वाचा कवडा मोठा । बोधबिरडें वाघला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भक्तीच्या ॥ २ ॥