सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 302, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २६९ शब्दार्थ व टीपा :- तीप-मुहूर्त, तिथी, भातुके-खाऊ अर्थ :- देवा, माझे चित्त आता फार कासावीस होत राहिले आहे रे. तू ये ना. येण्यासाठी तू काय एखादी चांगली तिथी किंवा मुहूर्त पाहात आहेस काय ? १ देवा, तू आपल्या प्रेमाचा खाऊ मला लौकर पाठवून दे स्वतःच्याजवळ काही राखून ठेवू नकोस. २ विठ्ठला, मजवर कुठलाच राग धरू नकोस. मी अवगुणी व अन्यायी असलो तरी तुझा राग नसावा. ३ थोर झालेल्या व जाणत्या असलेल्या पोराप्रमाणे तू मजसारख्या नेणत्या मुलास का रडवितोस ? ४ तू नुसते कमरेवर हात ठेवून काय उभा आहेस ? आपली धाकटी व लडिवाळ बाळे आहेत; त्यांची समजूत काढ ना. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता देवा, मी तुमच्या पदरास धरून पिछा घालीन व पकडून ठेवीन तुम्हांला. मग मात्र मी काही निराळा होणार नाही. ६ ५२९ कां हो देवा कांहीं न बोलाचि गोष्ट । कां मज हिपुटी करीतसा ॥ १ ॥ कंठीं प्राण पाहे वचनाची आस । तों दिसे उदास धरिले ऐसें¹ ॥ २ ॥ येणे काळें बुंथी घेतलीसे खोल² । कां नये विटाळ होऊं माझा ॥ ३ ॥ लाज वाटे मज म्हणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हिपुटी-कष्टी, बुंधी-खोळ, घुगट, खोल-मोठी अर्थ :- देवा, तुम्ही माझ्याशी कसलीच गोष्ट का बोलत नाही ? मला असे तुम्ही दुःखी कष्टी का करीत आहात ? १ माझा प्राण कंठाशी आला असून मी आपली वाट एकसारखी पाहात आहे. पण तुम्ही तर उदास झाल्यासारखे दिसता आहात. २ या वेळी फार मोठी खोळ तुम्ही माझा विटाळसुद्धा होऊ नये म्हणून घेतली आहे असे दिसते. ३ देवा, मी तुमचा असे म्हणविताना मला लाज वाटू लागली आहे. कारण, तुम्ही नुसती फुकाची चौकशीही माझी कधी करीत नाही. ४ ५३० उचित ते काय जाणावें दुबळें । थोरिवेचें काळें तोड देवा ॥ १ ॥ देतौं हाका कोणी नाइकती द्वारी । ओस कोणी घरीं नाहीं ऐसें ॥ २ ॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन काय वेचे ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हां साजे हे श्रीहरी । आम्ही निलाजिरों नव्हों ऐसीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा : - उचित-इष्ट, योग्य, थोरिवेचे-जाणतेपणाचे, अतीता-अतिथीस. अर्थ - देवा, इष्ट काय आहे, उचित काय आहे ते मजसारख्या दुबळ्याने कसे जाणावे ? आणि जाणतेपणाचे तोंड तर या भक्तिमार्गात काळेच आहे. जाणिवेचा उपयोग नसतो. १ एखाद्या रिकाम्या घरी दारात उभे राहून अनेक हाका माराव्यात, पण त्या कुणी ऐकूच नयेत अशी स्थिती देवा माझी झाली आहे. २ दारी आलेल्या अतिथीस शब्द, नुसता आदराचा शब्दही पुरा पडतो, तो फुकटचा बोलायला काय खर्च होणे तुमचे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, श्रीहरी, तुम्हास हे शोभून दिसते, पण आम्ही मात्र इतके निलाजरे नाहीत. ४. ५३१ आम्ही मागो ऐसे नाहीं तुजपाशीं । जरी तूं भीतोसि पांडुरंगा ॥ १ ॥ पाहे विचारूनि आहे तुज ठाये । आम्ही घालों नांवें तुझ्या एका ॥ २ ॥ ऋद्धिसिद्धि तुझें मुख्य³ भांडवल । हे तों आम्हां फोल भक्तीपुढें ॥ ३ ॥ तुका म्हणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि निर्दिचत⁴ सुख भोगूं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - विचारूनि-विचार करुन, घालों-मजूर झालों. १ तुम्हीं, २ खोळ, ३ मोल, ४ निवान्त.