सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 347, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३१३ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । ये भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥ ४ ॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळों दूर होती खळाळों ॥ ५ ॥ म्हणोनि १नासावें अज्ञान । इReport/इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनार्दन । धरूनि चरण तुका विनवी ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- वोळिलों-बनलो, अंतर-अंत करण, लाहातें-संबध, पसर-पसारा, खळाळों-लाटा अर्थ :- अहो वेदमूर्ती देवा, माझी बुद्धी फार अल्प असून तुमच्या विषयी भावही थोडा आहे माझे आयुष्य थोडे असून जे आहे तेही माझ्या स्वाधीन नाही. मी तर अनंत अपराधाची मूर्तीच बनलो आहे. तरी माझी एक विनंती तुम्ही ऐका ना. १ माझ्या दोषांचा परिहार किती करू ? किती दोष घालवायचे म्हटले तरी ते जात नाहीत, इतके माझे अंत करण दोषांनी मलीन झाले आहे. प्रारंभीचे, वर्तमानकाळचे, पुढील काळचे कर्म किती आहे याचा नीट सुगावा काही लागत नाही. २ हे कर्म विविध प्रकारचे असून त्याच्यामुळे चौऱ्याशी लक्ष योनींच्या फेऱ्यात सापडावे लागते. या शरीरालाही आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक अशा स्वरूपाचे तीन मोगही वारंवार भोगावे लागतात. हे शरीर म्हणजे नानाविध कर्माचे भांडारच आहे असे वाटते थ त्यातच जन्म, म्हातारपण व मरण यांची साठवण आहे. ३ तसे पाहिले तर जीव व शरीर यांचा काही संबंध नाही. भिन्न भिन्न पंचमहाभूतांचा हा देह बनलेला आहे. तो कर्माप्रमाणे, संचिताप्रमाणे कधी रचला जातो, कधी खचला जातो. याप्रमाणे हा देह असार असून फोलकटाप्रमाणे व्यर्थ आहे. ४ पुत्र, पत्नी, बंधू, मायबाप, इतर नातेवाईक याच्या नात्याचा पसारा कसा आहे ? तर एखाद्या मोठ्या नदीत महापूर यावा, त्यात काही लाकडे योगायोगाने जवळ यावीत व मग लाटाची खळबळ झाली की ती दूर वाहून जावीत, तसा हा नात्यातील माणसाचा परस्परांशी क्षणिक संबंध आहे. ५ म्हणून मासांठी अज्ञान नाहीसे करावे. इतकी तरी देवा, तू माझ्यावर कृपा करावीस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू कृपाळू आहेस ना ? जनार्दना, मी तुझे चरण धरून तुला अशी विनंती करीत आहे. ६ ६३५ ऐसी हे गर्जूं चेलरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥ १ ॥ जनार्दना जगजीवना । विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ २ ॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमर्दना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥ ३ ॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाट्यकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥ ४ ॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा । करोनि अकर्ता आपणा । भेदो अभिमाना आतळों ॥ ५ ॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाप जीयावेगळें न करी तुका ॥ ६ ॥ १ नसावे. तु. गा...४०