सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 353, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ३१९ सागर व परमानंदाचे प्रत्यक्ष रूपच आहे. गोपी, गोपाळ, गाई यांना याचाच एक नाद असून पशू आणि पक्षी यांनाही याचा छंद नेहमी असतो. हाही यांच्याच छंदाने पावा वाजवीत असतो. ४ याने मुकुट सुशोभित असून हा चतुर्भुज आहे. हा भक्तांचे मन हरण करणारा असून याच्या ध्वजावर गरुडाचे स्थान आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा स्वामी लगबगीने भक्तांच्या कामासाठी धावत येत असतो. ५ ६४३ हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें म्हणायें । करितों जीवें निबलोण ॥ १ ॥ बैसतां संतांचे पंगती १ । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणीच नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ २ ॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठों रुचि ठेऊनि गोड । देखत नाड फळतसे ॥ ३ ॥ मरती मेलों नेणों किती । तोचि लाभ तयाचे संगतीं । म्हणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥ ४ ॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥ ५ ॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्टचि पतित । तुका म्हणे मज संत हांसती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- कोड-हौस, नाड-फजिती. अर्थ :- देवा, मला आता हाताशी धरले आहे ते सोडू नये. मी तुम्हांस जीवेभावे शरण आलेलो आहे. मला तुम्ही आपला आहे असे म्हणावे. मी माझे जीव तुमच्यावरून ओवाळून टाकीन. १ हे कमळापती, मला या संतांच्या पंगतीस बसल्यावर समजून आले की, माझे हे सर्व आप्त लोक मला कधीही उपयोगी पडणारे नाहीत. ते आपले नव्हेतच. हाच माझ्या मनात निश्चयाचा दृढ भाव झाला. २ ही सर्व नातेवाईक माणसे तुझ्या भजनाच्या आड येतात. देवा, मला प्रपंचाची हौस वाटावी असे करतात, प्रपंचादी मुखासारख्या कमी प्रतीच्या गोष्टीत त्यांना रुची वाटते. पण त्याची पुढे होणारी फजिती मला समजते. ३ ह्यातील कित्येकजण मरून गेले. मलाही त्यांच्या संगतीत एवढा एकच लाभ झाला असता; म्हणून तर देवा, मी फार काकुळतीस येऊन विनवणी करीत आहे की, माझे चित्त त्यांच्यात जडू नये, एवढा धीर मला तुम्ही द्यावा. ४ मग माझी निंदा हे माझे आप्त लोक सुखाने करू द्या ना. मी त्यांच्याशी भाषणही करणार नाही. देवा, तूच आदिपिता आहेस माझा. नारायणा, मी तुमचे पाय काही मग सोडणार नाही. ५ मी आपले हित आपणच साधून घेणार आहे. पूर्वसंचिताप्रमाणेच मी हे करीन. तुकाराम महाराज म्हणतात, मी जर हे न करीन तर मी नष्टच होईन, पतितच राहीन. मग सारे संतजन मला हसतील ना. ६ ६४४ वरयें जालें लागलों कारणों । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥ १ ॥ न वेंचे शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संतांची अंदणी दासी । केला याविशीं निर्धार ॥ २ ॥ जीवनों राखिला जिव्हाळा । जालों मी मजसीं निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥ ३ ॥ १ संगती.