भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 422, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 422

३८४ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - दुमाला-पाठ, चोजवी-इच्छा करितो. अर्थ - देवा, या नास्तिकांनी तर माझी एकसारखी पाठ पुरविली आहे विठ्ठला, मी त्याच्या विषयी काय बोलू ? १ कांदे खाऊन समाधान मानणाऱ्यास कस्तुरीची इच्छा झाली तर तिचा काय उपयोग ? स्वत भिकारी असल्यामुळे त्याला तिची किंमत समजणारच नाही २ मला जो गोष्ट समजत नाही, तीच गोष्ट पुन पुन त्रास देऊन लोक विचारतात, माझ्या चरणाशी लागतात व आग्रह करतात सांगितल्याशिवाय पाय काही सोडीत नाहीत ३ देवा, मी त्यांना काय सांगावे ? तुझ्या पायावाचून मी काहीच जाणोत नाही सर्व ठिकाणी तूच एक मला दिसतोस ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशा लोकाच्या ताडाला खोळ पडो असल्या या भाडखोर लोकांशी मी किती बोलावे ? ५ ८०४ कलियुगीं कवित्व करिती पाषाड । कुशळ हे भाड बहु जाले ॥ १ ॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजाची आवडी । मुखें बडबडी¹ कोरडाचि ॥ २ ॥ दंभ करी सोग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥ ३ ॥ वेदाज्ञे करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥ ४ ॥ तुका म्हणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - पाषाड-पाखंडी, नास्तिक, दारा-स्त्री अर्थ - या कलियुगात कवित्व करणारे पुष्कळ नास्तिक लोक झाले असून ते केवळ भांडण करण्यातच कुशल आहेत १ त्याच्या मनात द्रव्य व स्त्री याची आणि पुष्कळ प्रजा आपणास व्हावी एवढीच आवड असते त्याच्या मुखातून कोरडी बडबड उगाच सारखी चालू असते. २ लोकांनी आपणास मानावे म्हणून उगाचच दंभ अथवा सोंग करतात, मुखाने त्यागाच्या गोष्टी बोलतात, पण त्याच्या मनात तशी भावना नसते ३ वेदाच्या आज्ञेप्रमाणे वागून हे आपले स्वहित साधीत नाहीत व देहाविषयीच्या प्रीतीपासून अलिप्तही होत नाहीत ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे कविलोक पुढे यमाची शिक्षा सहन करतील कारण वाणीने बोलल्याप्रमाणे कर्म याचे नसते ५ ८०५ विषयाचे सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥ १ ॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ २ ॥ असिपत्री तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥ ३ ॥ तप्तभूमीवरि लोळविती² पाहीं । अग्निस्तंभ बाहीं कवळविती ॥ ४ ॥ म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आता याती गर्भवास ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - किंकर-सेवक, असिपत्रीं-तरवारीच्या पात्यावर, धारेवर, इंगळ-अग्नी, विस्तव, बाही-बाहूनी, हातानी अर्थ - या लोकांना माणसाच्या जन्मी येऊन नाना विषयाचे सुख घेताना मोठे गोड वाटते पण पुढे फार मोठे असे यमाकडून शासन होणार असले हे ध्यानात हये १ यमाच्या हाती सापडल्यावर मग त्या पापी माणसांस मारतात, तोडतात, झोडपतात यमाचे सेवक मोठ्या निष्ठुरतेने त्याचे कित्येक वर्षे हाल हाल करतात २ त्याला हे तरवारीच्या धारेवर धरतात, वृक्षांमधील श्रेष्ठ असणाऱ्या खैराच्या लाललाल विस्वावर चालायला लावतात, ज्यातून ज्वाला निघत आहेत अशा तेलात किंवा पाकात टाकतात ३ तापलेल्या भूमीवर लोळवितात अग्नीच्या तप्त खांबास दोन्ही हातानी मिठी मारायला लावतात ४ हे त्याचे हाल पाहून तुकाराम महाराज म्हणतात, मी काकुळतीस येत आहे आता मला हे गर्भवास नकोत ५ १ मुखी बडबडी भलतेचि, २ घालविती पायीं