सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 441, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४०३ अर्थ :--आज सर्व सुखांची प्राप्ती मला येथेच झाली आहे. कारण येथे संतांचे चरणकमल मी पाहिले आहेत. १ याच पावलांची इच्छा मी माझ्या मनात सदासर्वकाळ करीत होतो. आज मात्र माझी इच्छा तृप्त झाली. २ तुकाराम महाराज म्हणतात, आता मात्र माझी वाणी काही बोलू शकत नसून ती कुंठित झाली आहे; व माझ्या चित्तात पूर्ण समाधान प्राप्त झाले आहे. ३ ८६३ विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥ १ ॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ २ ॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न येदे अन्यथा आन दुजें ॥ ३ ॥ सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोवाचें ॥ ४ ॥ तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा.- काया-शरीर, आन-दुसरे अर्थ :-- हा विठ्ठल आता माझा अत्यंत आवडता असा सज्जन सोयरा झाला असून माझ्या चित्तात त्याचेच स्थान दृढ झाले आहे. १ या विठ्ठलरूपानेच माझे सर्व शरीर व्यापून गेलेले असून माझी छायाही त्यामुळे विठ्ठल- रूपाचीच बनलेली आहे. २ माझ्या जिव्हेच्या अग्रावर विठ्ठलच बसला असून, तो त्याच्यावाचून दुसऱ्या कुणाचे नावही घेत नाही. ३ सर्व इंद्रियात मन हे प्रमुख इंद्रिय असून, तेही याच विठ्ठलाचे ध्यान करू लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, आता या विठ्ठलास मला क्षणभरही विसरता येणार नाही. ५ ८६४ होय¹ वारकरी । पाहें पाहे रे पंढरी ॥ १ ॥ काय करावी साधने । फळ अवघेंचि तेणें ॥ २ ॥ अभिमान नुरे । कोड अवघेंचि पुरे ॥ ३ ॥ तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-- नुरे-उरत नाही, कोड-इच्छा. अर्थ --अरे मनुष्या, तू पंढरपूरचा वारकरी हो ना. एकदा तरी पंढरपूर येथे जाऊन त्या विठ्ठलास डोळे भरून पाहा ना १ इतर साधनांचा काय उपयोग ? सर्व फळ याच एका दर्शनाने मिळने २ याच्या भेटीमुळे मनात अभिमान उरत नाही व मनातील सर्व इच्छा मात्र तृप्त होतात ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा सावळा विठ्ठल माझ्या डोळ्यात निवास करून राहिला आहे ४ ८६५ पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥ १ ॥ अवघा होप पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ २ ॥ न लगे धन मान । देहभावे उदासीन ॥ ३ ॥ तुका म्हणे मळ । नासी² तात्काळ तें स्थळ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :-- नासी-नाश होतो अर्थ. - जो पंढरपूरला मनोभावे जातो, तो देवाच्या दर्शनाने इतका भारावला जातो की आपल्या आई- बापासही विसरून जातो. १ तो सर्वार्थाने पांडुरंगच बनलेला असून बेधुंद अंग धरून राहिलेला असतो. २ त्याला धनाची वा मानाची मुळीच इच्छा नसते. स्वतःच्या देहाविषयीही तो उदासीन बनलेला असतो. ३ या पंढरीच्या वास्तव्यामुळे मनात विकारादिकाचा जो मळ असतो त्याचा संपूर्ण नाश होत असतो. ४ १ होय होय, २ नाही.