सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 444, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४०६ सार्थ तुकारामगाथा
बुडण्याच्या प्रसंगीं किंवा अग्नीत जळण्याच्या प्रसंगी हा ईश्वर आपल्या भक्तांचे नेहमींच रक्षण करतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा देव आमच्यासाठीही आपल्या अंतःकरणांत निरंतर दया बाळगीत असतो. ४ ८७१ काय विरक्ति फळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥ १ ॥ नाचो सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ २ ॥ शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेवांचूनियां ॥ ३ ॥ कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥ ४ ॥ कासया एकांत सेवूनया वना । आनंद तो जनामाजी असे ॥ ५ ॥ तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वैष्णवमेळीं-विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात, घोळ-दीणा, सरसा-बरोबर अर्थ:-वैराग्याची थोरवी आम्हांस कुठून कळणार? आम्ही त्या विठोबाचे एक नाममात्र जाणीत असतो. १ मोठ्या सुखाने व आनंदाने आम्ही विठ्ठलभक्तांच्या मेळाव्यात नाचत असतो. टाळ व घोळ यांच्या नादांत आम्ही तल्लीन होत असतो. २ शांती, क्षमा, दया यांचे महत्त्व आम्ही काय जाणावे? या पांडुरंगाच्या, गोविंदाच्या कीर्तनात हे सर्व काही येते. गुणकीर्तनावाचून दुसरे काहीही आम्ही जाणीत नाही. ३ नामामृताच्या सागरात बुडी दिल्यानंतर देहावर उदास होऊन काय उपयोग? ४ या लोकातच एवढा आनंद भरलेला असताना मी रानावनात जाऊन उगीच शीण कशास वाढवून घेऊ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, आम्हांस आता कसलीच भीती नाही. कारण हा श्रीविठ्ठल आमच्याबरोबर आहे, असा विश्वास आम्हांस नेहमीच वाटत आलेला आहे. ६ ८७२ जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥ १ ॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे १ यमापाशीं ॥ २ ॥ गरुडटक्यांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ॥ ३ ॥ सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥ ४ ॥ तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥ ५ ॥ तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- ओखदासी-औषधासमुद्धा, भेणें-भयाने अर्थ :- ज्या स्थानावर विठ्ठलभक्तांचा निवास असतो, ती भूमी व तो देश पुण्यवान आहे असेच समजावे १ या ठिकाणी औषधालासुद्धा दोष दिसणार नाही, असे यमाचे दूत यमास सांगत असतात. २ गरुडाचे निशाण ज्यांच्या खांद्यावर आहे अशा वैष्णवांच्या समुदायाने व नामकीर्तनाने सर्वत्र या विठ्ठलाचाच जयजयकार होत असतो. ३ येथील लोकांच्या वाणीस गोविंद गोविंद-विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा सहजच छंद असतो ४ या ठिकाणी तुळशीची वने असून नाना प्रकारच्या रांगोळ्या काढलेल्या असतात. येथील सर्व सोहळा वैकुंठाप्रमाणेच असतो. ५ तुकाराम महाराज म्हणतात, भीतीने काळ या बाजूस फिरकतसुद्धा नाही. ६ ८७३ माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपणचि देव होय गुरु ॥ १ ॥ पढियें देहभावें पुरवितो वासना । अंतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ २ ॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥ ३ ॥ योगक्षेम त्याचें जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥ ४ ॥ तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥ ५ ॥ १ सांगती.