सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 462, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४२४ सार्थ तुकारामगाथा ९२६ काय करु कर्माकर्म । धरें सापडले वर्म ॥ १ ॥ होसी नामाच सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ २ ॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी सचला ॥ ३ ॥ तुका म्हणे माझें । काय होईल तुम्हा ओझें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - लेखा-मर्यादा, वेचावेच-जमाखर्च अर्थ - कर्म व अकर्म याच्या कटकटींची चर्चा मी कशास करू ? मला या विठ्ठलाच्या नामाचे हे वर्म खरे सापडले आहे १ देवा, तू तुझ्या नामासारखाच कृपाळू व वत्सल होतोस व त्याचप्रमाणे आपल्या भक्ताची समजूत काढतोस अशी किती जनाची समजूत काढलीस त्याला सीमा नाही २ तुझ्या स्वरूपाविषयीही देवा काही खर्च वा काही जमा, असे न होता तू जसा आहेस तसाच साचून आहेस ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा, माझे ओझे तुम्ही का मानावे ? ४ ९२७ एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥ १ ॥ आम्ही देवा शक्तिहीने । भाकू तेणे करुणा ॥ २ ॥ पावटणी केला काळ । जया बळ होते ते ॥ ३ ॥ तुका म्हणे वीर्यावीर । सतधीर समुद्र ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - हातोफळी-हातावर हात मारून ठाया-ईश्वरस्वरूपात पावटणी-पायरी अर्थ - कित्येक बलवान साधुसत आपल्या हातावर हात देऊन, टाळी वाजवून ईश्वरस्वरूपास प्राप्त झाले आहेत १ पण देवा, आम्ही मात्र शक्तिहीन असल्याने तुझी करुणाच केवळ भाकू २ ज्या साधुसंताना सामर्थ्य होते, त्यांनी यमास आपल्या घरी चढून जाण्याच्या पायरीचे स्थान दिले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे सत म्हणजे धैर्यवान व वीरातील वीर असून धीराचे समुद्रच आहेत ४ ९२८ पुढिलांचे इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥ १ ॥ सत गेले तया ठाया । देवराया पावतीं ॥ २ ॥ ज्येष्ठांचीं का आम्हा जोडी । परवडी न लभो ॥ ३ ॥ तुका म्हणे करीं फोड । पुरवीं लाड आमुचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - परवडी-प्रकार अर्थ - आमच्या पुढे जाऊन साधुसंतानी जे मिळविले, त्याचीच इच्छा मीही करीत आहे पण माझ्या अंगी तेवढे बळ मात्र नाही १ पण देवराया, यापूर्वीचे साधुसंत जेथे जाऊन पोचले आहेत, ते स्थान मला दाखवा त्या स्थानावर मला पोचवा २ ज्येष्ठ असणाऱ्या साधुसंतानी भक्तीचे जे जे प्रकार भोगले त्याचा लाभ आम्हांस का होऊ नये ? ३ तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही आमचे कोडकौतुक करून लाड पुरवा ना ४ ९२९ कैवल्याच्या तुम्हा घरीं । रासी हरी उदंड ॥ १ ॥ मजसाटीं का जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ २ ॥ सर्वो गुणीं सपूरता । ऐसा पिता असोनी ॥ ३ ॥ तुका म्हणे पाडुरंगा । जालो सागा सन्मुख ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - कैवल्याच्या-मोक्षाच्या, उदंड-पुष्कळ वाणी-कमतरता अर्थ - देवा, तुमच्या घरी मोक्षाच्या पुष्कळ राशी असतील १ मग मलाच सर्व बाबतीत कमतरता का हो ? मला त्यांचा वाटा का मिळत नाही ? २ तू सर्व गुणांनी सपूर्ण असून, सर्वांचा पिता असून माझ्या