सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 47, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २१ बसल्या ठिकाणीच तिच्या दुधाला भरते येते व त्याच्या प्राशनाने एवढी लय साधते की ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते ध्येय, ध्याता, ध्यान यातील भेद मावळतो ३ काय जाणावयाचे आहे ते, जाणणारा व त्याची झालेली जाणीव अशा वेगळया अवस्थाच शिल्लक राहात नाहीत ४ या जगात आम्हासारख्या विष्णुदासांना हरिनाम हाच एक विसावा आहे. नारायणाने विसावा आमच्याच देहांत घेतलेला आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वरप्राप्तीच्या या भोजनाचा लाभ फार मोठाच आहे येथे कुणीही उपाशी राहू म्हटले तरी राहू शकत नाही ६ ४५ दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि । आपणाबाहेरी । नलगे ठाव धुंडावा ॥ १ ॥ इतुले जाणावया जाणा । कोठे तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । १जाणतेचि साधावे ॥ २ ॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसे भासतें ॥ ३ ॥ तुका म्हणे जागा । नको २धासपू घाउगा ॥ आहेसि तू आंगा । अगों डोळे उघडी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुजें-द्वैत, जीवशिव, आत्मापरमात्मा ही भिन्न असल्याची जाणीव खंडे-सडल्यावर सपल्यावर, पारधी-शिकारी, धासपू-चाचपू, घाउगा-व्यर्थ अर्थ - एक द्वैत संपले की जे उरते ते सर्व परमेश्वराचेच रूप आहे मग त्याला शोधण्यासाठी आपल्या- बाहेर कुठे जावे लागत नाही १ पण हे ज्ञान होण्यासाठी मनाने मनाकडेच अंतर्मुख व्हावयास हवे, कारण पारध्यासच पारध्याच्या खुणा माहित असतात २ आधी देह हासुद्धा खरा नाही, मग त्यापासून निर्माण झालेला पसारा खरा कसा असणार ? शेतातले बुजगावणे हे जसे चोरास रक्षण करणारेच वाटते त्याप्रमाणे देह आपणास खरा वाटतो ३ म्हणून तुकाराम महाराज जागे करीत आहेत की, उगाच इकडे तिकडे ध्येयं चाचपू नका, देहातच तुम्ही ईश्वरस्वरूप आहात, हे देहातीलच ज्ञानदृष्टीने तुमच्या ध्यानात येईल ४ विवरण - संताच्या अभंगात द्वैताद्वैताचा उल्लेख नेहमी येतो मग द्वैती की अद्वैती ? याचे उत्तर संत तत्त्व ज्ञानाच्या वा बोधाच्या दृष्टीने अद्वैतीच त्यांची अनुभूती अद्वैताची दुजेपणा किंवा द्वैत संपल्यावर जे स्वरूप उरत तोच एक परमेश्वर हा या अभंगाचा मुख्य गाभा आहे दुजेपणा संपावा, भेद सर्व नाहीसा व्हावा, जीव वेगळा, ईश्वर वेगळा अशी भावना उरू नये यासाठी तर आग्रह आहे 'भेद तुटलीयावरि। आम्ही तुमचीच हो हरी' अशी जाणीव सर्वत्र आहे 'कासयाने पूजा करू केशीराजा' नावाच्या सर्वोत्तम अभंगात या अद्वैतानुभूतीचे फार चांगल वर्णन आलेले आहे नाव निरनिराळी म्हणून काय मूळ रूपही वेगवेगळे असावे ? जलप्रवाह निराळा, तरंग निराळा, सुवर्ण निराळे, अलंकार वेगळे किंवा तुकोबाच्या भाषेत बोलायचे म्हणजे 'खडा साळी साखर । झाला नामाचाची फेर ' नामाची भिन्नता, परंतु स्वरूपाच्या दृष्टीने एकताच की 'तुज मज नाहीं भेद' अशीच अनुभूती सर्वत्र आहे मग द्वैत आले कोठून ? 'अद्वैतीं तो नाहीं माझें समाधान ' असही तुकारामबुवा का म्हणतात ? याचे उत्तर अस की बोधाला, प्रचीतीला, तत्त्वज्ञानाच्या बैठकीवर अद्वैतच; पण या अद्वैताची अनुभूती येणार ती द्वैताच्या साह्याने भोगायला द्वैत, अनुभूतीत अद्वैत दिसायला दोन पण असायला एक अशी वस्तुस्थिती आहे डोळे दोन पण दृष्टी एक ओठ दोन पण गोष्टी एकरूपाच्या एक वीजच वृक्षाच्या रूपाने आले सुवर्णच नाना अलंकाराच्या रूपानी व्यक्त झाले, अनेक लहरीच समुद्रावर उमटल्या, पण या सर्वात अनुभूती एका अव्यक्ताचीच आहे घरात सूर्य अस्तित्व दिसतो वाळात अग्नी वेगळा दिसतो पण सूर्याची व अग्नीची व्यापकता सर्वत्र जगत उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा हीच अनुभूती उदक व तरंग या द्वैतापासून यावयाची तत्त्वर बीजा पोटीं । वीज तश्यवरा शेवटी, 'असे हे द्वैताद्वैत चक्र आहे 'तुझी माझी एक ज्योती' हे अनुभवाचे सार आहे अध्ययनाला सुद्धा व्यक्त होण्याचा अद्वैताला द्वैतावर येण्याचा ध्यास असतो कारण त्याशिवाय सुख नाही त्या मूलस्थानाचा एकट्यास करमनास होणे म्हणून तो बहुविध आवा- रानी नटतो, व्यक्त होतो एका बीजाचा नाश झाल्यासारखा वाटून तरी अनेक टपोऱ्या दाण्याचे कणीस दिसते या अनेक दाण्यातही एक बीजच विविधनान नटलेल असत १ जाणे तणेंचि साधाव्या २ चाचपू