सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 481, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंअसे नव्हे तुमचे व माझे बोलणे एकसारखेच असल्याने दोघांना बोलावून दोघांच्या भांडणाचा निकाल लावून टाका ना एकदाचा हे काम लावणीवर टाकणे उचित नाही देवा ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी काही आता निकरावर येत नाही तुमच्या पायावर मी माझे डोके ठेविले आहे, ते आणून माझी मुक्तता करा एवढीच विनंती आहे ४ ९७३ काय कृपेविण घालावे साकडें । निश्चिती निवाडें कोण्या एका ॥ १ ॥ आहो तैंसी पुढें असो दीनपणे । वेचूनि वचने करुणेची ॥ २ ॥ धरू भय आता काय वाहों चिंता । काय करु आता आप्तपण ॥ ३ ॥ तुका म्हणे आम्ही भावहीन जीव । म्हणउनी देव दुरे दुरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - साकडें-संकट अर्थ - देवा, तुम्ही मजवर कृपा केलेली नाही म्हणून काय मी तुम्हास संकटात घालावे ? देवा, मी निश्चित असावे, असा कोणताही एखादा निवाडा तुम्ही केलेला नाही १ देवा, यापुढेही आम्ही पूर्वी होतो तसेच दीन वृत्तीने राहू करुणेची वचने तुमच्यासमोर बोलत राहू २ आता कसले भय धरून मनात चिंता वाहू ? आता आप्तपणाच्या संबंधास तरी काय करावे ? ३ तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जीव भावभक्तीच्या शिवाय आहोत, म्हणूनच देव आमच्यापासून दूर झाला आहे ४ ९७४ नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज का नारायण दुरी जाला ॥ १ ॥ अशंकितीं मनें करों आळवण । नाहीं समाधान निश्चितीचे ॥ २ ॥ दासाचा विसर हे तो अनुचित । असे¹ सर्व नीत पायापाशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे तुम्हा लाज येत नाहीं । आम्हा चिंताडोहीं बुडविता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-दूर अशंकितें-संशयित होऊन अर्थ - शास्त्रवचनांची अथवा साधुसंतांची मर्यादा मी अजून कधी ओलांडली नाही मग हा नारायण मला एवढा दूर का बरे झाला आहे ? १ याच संशयित मनाने मी या देवाची प्रार्थना करीत आहे, पण माझ्या मनाच्या ठिकाणी चिंतारहित असे समाधान नाही २ देवा, तुला तुझ्या दासाचा विसर पडला आहे हे तर फारच अनुचित दिसते तुमच्याजवळ तर सर्व नीती आहे असे असून तुम्ही असे वागता ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आम्हाला अशा प्रकारे नाना प्रकारच्या चिंताच्या डोहामध्ये बुडविताना तुम्हाला काही लाज वाटत नाही ? ४ ९७५ जीव जायवरी सांडी करी माता । हे तो आश्चर्यता बाळकावी ॥ १ ॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जाले ॥ २ ॥ क्षणक्षणा माझा न घ्यावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥ ३ ॥ तुका म्हणे नाहीं वचनासी रुचि । फल फटवेचि तें तें होय ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडी-त्याग फल फटवेचि-फोलकटाप्रमाण अर्थ - एखाद्या मुलाचा प्राण जाईपर्यंत त्याची आई त्याचा त्याग करते, हे एक मोठे आश्चर्यच आहे १ देवा, तुम्ही दुर्बळच आहात, काय ? मग आम्ही जे सांगतो आहोत, ते तुम्ही नीट कानानी का ऐकत नाही ? तुमच्या ठिकाणी काय कमीपणा निर्माण झाला की काय हो ? २ क्षणाक्षणास आमचा सांभाळ तुम्ही करूच नये, अशा दुर्दैवाचा काळ मोठा विपरीत आलेला दिसतो ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आमच्या बोलण्यास काही रुचीच नाही, असे झाले आहे फोलकटाप्रमाणे ते व्यर्थ होत आहे ४ १ असो