सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 512, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४६८ | सार्थ तुकारामगाथा व्यानले रे' अशा नांवेत नामदेवांनी या रीतीने वर्णन केले आहे केवळ प्रेमसुखासाठी 'देवचि झाला भक्त' हेंच खरे आहे देवभक्ताचे हे ऐक्य व प्रेमाच्या भोगासाठी त्यांच्यातील भेद हा भक्तिमार्गातील एक मोठा तरल विचार आहे 'देव ते सत । देव ते सत । निमित्त त्या प्रतिभा', 'आम्ही जाणो तुझा भाव । कंचा भक्त, कंचा देव?' इत्यादी वचनातून तुकारामबुवानी देव व भक्त याचे अभिन्नत्व वर्णन केले असून 'अभेदानें भेद राखियेला अंगीं । वाढावया जगों प्रेमसुख' असा निर्णय दिलेला आहे १०३९ हुवरती गाये तयाकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥ १ ॥ गोपाळांची पूजा उच्छिष्ट कवळी । तेणे वनमाळी सुखावला ॥ २ ॥ चोरोनिया खाये दुध दही लोणी । भावे चक्रपाणि गोविला तो ॥ ३ ॥ निष्काम तो जाला कामासी लपट । गोपिकाची वाट पाहात बैसे ॥ ४ ॥ जगदानी इच्छी तुळसी एकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥ ५ ॥ तुका म्हणे हेंचि चैतन्य सावळे । व्यापूनि निराळें राहिलैसे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीका :- हुवरती-मोठ्या प्रेमाने, कैवल्यनिधान - मोक्षाचा, कैवल्याचा साठा, गोविला- गुंतला गेला अर्थ - जो भक्त मोठ्या प्रेमाने गाऊन देवाचे गुणगान करतो, त्याच्याकडे कान देऊन हा कैवल्याचा साठा श्रीहरी उभा राहिलेला असतो १ तो गोपाळानी केलेली पूजा मोठ्या प्रेमाने घेतो, त्याचे उच्छिष्टही ग्रहण करतो त्याच्यातच हा वनमाळी सुखावून जातो २ हा गोपाळांचे दहीदूध, लोणी चोरून खातो व त्यांच्या भावभक्तीत गुंतला जातो ३ गोपिकांविषयी हा प्रेमासक्त असला तरी निष्काम असल्यामुळे त्याची वाट पाहण्यात त्याला सुख वाटते ४ सर्व जगातील लोकांना आपल्या कृपेचे दान देणारा हा प्रभू, एका तुळशीच्या पानाची इच्छा करीत नसतो भक्ताच्या भावास तो अशा प्रकारे जणू विकलाच गेलेला असतो ५ तुकाराम महाराज म्हणतात, येथे हे सावळे चैतन्य सर्व विश्वात व्यापून आपण पुन वेगळे राहिलेले आहे ६ १०४० समर्थांसी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरों ॥ १ ॥ आदराचे ठायों बहुच आदर । मागितले फार तेथें' वाढी ॥ २ ॥ न म्हणे सोइरा सुहृद आवश्यक । राजा आणि रंक सारिखाचि ॥ ३ ॥ भाव देखे तेथें करी लडबड² । जडा राखे जड निराळेंचि ॥ ४ ॥ कोणी न विसभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥ ५ ॥ तुका म्हणे पोट भरूनी उरवी । धाले³ ऐसे दावी अनुभवे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - समर्थाती-श्रीमंत व उदार गृहस्थाच्या ठिकाणी, वर्णावर्णभेद-उत्तम-कनिष्ठ असा भेद, धाले-संतुष्ट झाले अर्थ :- श्रीमंताच्या घरी मेजवानीच्या प्रसंगी, हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, असा भाव कधी नसतो, त्याच्या घरची सामग्री सर्वांसाठी सिद्ध असते १ ज्याच्या मनात देवाविषयी विशेष आदर असतो त्याचा आदर मग देवही करतो व यामुळे भक्त जेवढे मागतील त्याच्यापेक्षाही जास्त तो त्याना देतो २ ह्यावेळी तो हा माझा सोयरा आहे, हा मित्र आहे, हा राजा आहे, हा भिकारी आहे, असा भेद तो कधी करीत नाही ३ जेथे भक्ताचा शुद्ध भाव त्यात दिसतो, तेथे हा देव फार लुडबुड करुन त्याला जड अशा संसाराच्या उपाधीपासून वेगळे ठेवतो ४ कोणत्याही याचक भक्ताकडे हा दुर्लक्ष करीत नाही त्याची दशा समजायून घेऊन त्याची इच्छा हा देव पूर्ण करितो ५ सर्वांचे पोट भरले आहे व अन्न उरले आहे, सर्वजण जेवून तृप्त झाले आहेत, असे स्वानुभवाने हा जाणतो भक्तानाही असाच अनुभव येतो ६ १ ते ते, २ बडबड, ३ आल.