भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 528, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 528

४८२ सार्थ तुकारामगाथा सौजन्य असून यासाठी त्याचा उपयोग आपणास मोठाच आहे म्हणून काही त्याला आपल्या पदरात बांधून घेता येत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात, विंचू व सर्प ही नारायणाची रूपे, परंतु त्यांना न शिवता दुरूनच वंदन करावे ३ १०७९ भूत भविष्य कळो यावे वर्तमान । हे तो भाग्यहीन त्याची जोडी ॥ १ ॥ आम्ही विष्णुदासीं देव घ्यावा चित्ते । होणार ते होते प्रारब्धें ॥ २ ॥ जगरुडीसाठी घातले दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥ ३ ॥ तुका म्हणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रिद्धिसिद्धी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जोडी-प्राप्ती अर्थ - आपणास भूतकाळातील व भविष्याळातील वर्तमान समजावे म्हणून पुष्कळ लोकांची खटपट असते पण या ज्ञानाची प्राप्ती ही भाग्यहीन माणसास होते म्हणजे ही प्राप्ती काही विशेष भाग्याची नाही १ आम्हीं विष्णुदासांनी मात्र निरंतर या देवाचेच चिंतन मनात करावे व जे प्रारब्धानुसार असेल ते भोगावे २ केवळ जगरुडीसाठीच भूतभविष्य समजणाऱ्या लोकांनी दुकान घालून धंदा सुरू केलेला आहे पण त्यामुळे परमेश्वराचे पाय अंतरून जातात ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, हा प्रपंच मोठा गहन असून त्यात, रिद्धीसिद्धींची पीडाही फार मोठी असते ४ घोंगडयाचे अभंग- १२ १०८० ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनिया ॥ १ ॥ पांघुरलो बहु काळें । घोगडें बळें सांडवले ॥ २ ॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपाले ॥ ३ ॥ तुका म्हणे आड सेवा । लाबिला हेवा धाडली ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ठकिले-फसविले, कुडी-देह लाग-लाभ, हेवा-हाव अर्थ - मी काळाला फसवून दडी देऊन लपून राहिलो देहभावाची वृत्तीही टाकून दिली १ पुष्कळ दिवसांपर्यंत मी हे काळे घोंगडे पांघरले होते, ते मुद्दामच टाकून दिले आहे २ आता त्या काळास कसलाही लाभ होणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी जाऊन मी लपलो आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, बाह्य सेवा करण्याची माझी वरवरची हाव होती, तिची आडकाठी मी या प्रकाराने झटपट दूर केली ४ १०८१ घोंगडियाचा पालट केला । मुलामुला आपुल्यात ॥ १ ॥ कान्होबा तो मीच दिसे । लाविले पिसे सवंगडिया ॥ २ ॥ तो बोले मी उगाच बैसे । आनारिसे न दिसे ॥ ३ ॥ तुका म्हणे दिले सोंग । नेदी व्यंग जाऊ देऊ ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पिसे-वेड, आनारिसे-वेगळेपणा अर्थ - खेळताना या गोपाळांच्या मुलानी आपल्या घोंगड्यांची अदलाबदल केली. १ प्रत्येकजणाने कान्होबा मीच, असे सोंग घेऊन इतर सोबत्याना बतावणी केली २ तो बोलतो व मी उगाच बसतो असे असले तरी, त्याच्यात व आमच्यात वेगळेपणा नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, या श्रीहरीने हे जे सोंग त्याना दिले आहे, ते काहीं व्यर्थ वाया जात नाही ४