भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 535, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 535

सार्थ तुकारामगाथा ४८९ भोगाच्या अथवा त्यागाच्या वेळी रामनाम जर मुखात असले, तर ते कर्म आपल्या अगी लागणार नाही आपण त्यापासून निर्लेप राहू. ५ अशा प्रकारे जो रोज रामनामाचा सतत जप करीत असतो, त्यास तुकाराम महाराज जीवन्मुक्तच म्हणतात ६ १०९७ तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥ १ ॥ तो हा न करी तें काई । का रे लीन नव्ह्हां¹ पायीं ॥ २ ॥ सीळा मनुप्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥ ३ ॥ वानरा हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- उदकावरी-पाण्यावर, सीळा-दगड अर्थ - या रामाचे महत्त्व असे आहे की, याच्या नावाने जड जड दगडही पाण्यावर सेतुबंधनाच्या वेळी तरले १ असा हा रामप्रभू करणार नाही असे काय आहे ? त्याच्या पायांवर तुम्ही लीन का हो होत नाही ? २ याच रामाच्या पायाच्या स्पर्शाने अहल्या शिळा होऊन पडली होती, ती परत मनुष्यरूपास आली. ३ याच रामचंद्राने वानरांच्या साह्याने सबंध लकेचे राज्य रावणापासून हिरावून घेतले व सीतेची मुक्तता केली ४ विवरण:- श्रीरामचंद्राच्या पावन व उद्बोधव चरित्रातील काही कथांचा उल्लेख तुकोवानी रामचरित्रपर अभंगातून केलेला आहे सेतुबंधनास, रावणाशी लढण्यात वानराचे साहाय्य रामचंद्राना विशेष झाले असल्याचे प्रसिद्ध आहे रामचंद्र वनवासास निघाल्यानंतर ज्या अनेक घटना झाल्या, त्यात अहल्येच्या उद्धाराची घटना महत्त्वाची होती. रामाच्या चरणस्पर्शाने शिळा होऊन पडलेली, फत्तराप्रमाणे निर्विचार झालेली, अहल्या मनुष्य झाली, माणसात आली, अशी कथा आहे अहल्या ही गौतम ऋषींची पत्नी ब्रह्मदेवाने ही आपली मानसकन्या गौतमास अर्पण केली इंद्र, अग्नी वरुण इत्यादींचेही प्रेम हिच्यावर हान, इंद्राने गौतमाचे रूप धारण करून अहल्येचे पातिव्रत्य भग करण्याचा प्रयत्न केला गौतमराग हे समजल्याने त्याने इंद्रास व अहल्येस दोघानाही शाप दिले अहल्या शिळा होऊन पडेल असा, गौतमाचा शाप होता व प्रभू रामचंद्र जेव्हा बनात येतील, तेव्हा अहल्येचा उद्धार होईल असाही उ शाप तिला मिळाला होता या संकेतानुसार प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदम्पर्शाने शापित अहल्येचा उद्धार करून तिला मुक्त केले. १०९८ राम म्हणता रामचि होइजे । पदीं बैसोन पदवी² घेइजे ॥ १ ॥ ऐसे सुख वचनीं आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥ २ ॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती फेवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आन-दुसऱ्या अर्थ - या रामनामाचे माहात्म्य असे आहे की, जो कुणी त्याचा जप करितो तो स्वतःच रामरूप होऊन जातो. १ असे अलौकिक सुख रामनामाच्या जपात आहे विश्वास ठेवून अनुभव घेऊन पाहा तुम्ही २ एकदा राम- नामाच्या रसयसेची चव मिळाली की, मग दुसऱ्या चवींची आवडच संपून जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हो रामनामाची चव मी स्वतः चाखून पाहिली आहे मला स्वतःला जो अनुभव आला आहे, तोच मी तुम्हांस सांगत आहे ४ १०९९ रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरितीं आपण शंकरें ॥ १ ॥ केंसीं तारक उत्तम तिन्हीं लोकां । हळाहळ शीतळ केले शिवा देवा ॥ २ ॥ हाचि मत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥ ३ ॥ जुनाट नागर नीच नये । तुका म्हणे म्या धरिले जीवें भावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हलाहल-हलाहल नावाचे उग्र विष, नीच-नित्य १ व्हाना, पद पेविीजे तु गाथा . ६२