सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 537, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४९१
अर्थ - रावण रणभूमीवर येऊन उभा राहिल्याचे प्रभू रामचंद्रांनी पाहिले १ या रणांगणावर आता आपापली नावे विसरून हे दोघे एकमेकांना भिडतील २ परस्पराविषयी असणाऱ्या प्रेमसबधाच्या अनुसंधानामुळे हे एकमेकांचे बाण निवारण करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, या रघुनाथाने रहस्य जाणून फार मोठा पराक्रम केला ४ ११०३ केला रावणाचा वध । अवघा तोडिला सबंध ॥ १ ॥ लकाराज्यें विभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ २ ॥ औदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिरकाल-कायमची, दीर्घ कालपर्यंत अर्थ - या रामप्रभूने मदमत्त रावणाचा वध केला व त्याच्या पूर्वकर्मांच्या सबंधापासून त्याला मुक्त केले १ नंतर लंकेचे राज्य रामचंद्राने विभीषणाला दिले त्या राज्यावर त्याची दीर्घकाळपर्यंत स्थापना केली २ या राम- चंद्राच्या औदार्याची सीमा मी काय वर्णन करावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा माझा दाता प्रभू रामचंद्र असून, त्याने सीतेची रावणाच्या बंदिवासातून मुक्तता केली ४ ११०४ रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥ १ ॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ २ ॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥ ३ ॥ स्मरता जानकी । रामरूप जाले कपि ॥ ४ ॥ रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥ ५ ॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कपि-वानर अर्थ - अयोध्येस परत आल्यावर रामप्रभूंनी आपल्या कौसल्या मातेस रामरूप करून टाकले १ ज्याच्या मनात सतत रामनाम आहे, ज्याच्या चिंतनात सतत रामनाम आहे, तो रामरूपासच जाऊन पोचेल, याविषयी कोणीही संदेह धरू नये २ अयोध्येमधील सर्व प्रजाच रामरूप होऊन गेली ३ सीतादेवींचे व रामचंद्राचे स्मरण करता करता सर्व वानरही रामरूप होऊन गेले ४ रावणाच्या लंकेतील सर्व राक्षसांनाही, या रामाचीच भीती एकसारखी असल्यामुळे तेही रामरूपच बनून गेले ५ अशा प्रकारे नित्य जो रामनामाचे स्मरण करितो, त्याचे पायावर तुकाराम महाराज डोके ठेवित्तांत ६ ११०५ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरींतुरे वाद्याचे गजर ॥ १ ॥ आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥ २ ॥ फिरिती अक्षवाणे ओवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥ ३ ॥ जाले रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्से नरनारीबाळें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अक्षवाणे-दिव्यांच्या आरतीने ओवाळण्याची मंगल क्रिया अर्थ - रामचंद्र परत अयोध्येस आल्यानंतर सर्वत्र आनंद्दीआनंद झाला सर्व स्त्रीपुरुष नागरिक हर्षभरित होऊन गेले शंख, भेरी, तुताऱ्या यांच्या जयनादांचा गजर झाला १ रघुनाथ अयोध्येस आल्यामुळे अवघ्या