सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 539, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४९३ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥ ३ ॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशानें ॥ ४ ॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मतिहीन-बुद्धीहीन, राजीवलोचन-कमळाप्रमाणे डोळे असणारा. अर्थ :- माझी बुद्धी तर अतिशय तोकडी आहे. रामराया, मी तुझे वर्णन काय करावे ? पाण्यामध्ये दगड तारण्याचे सामर्थ्य तुझ्या नामामध्ये आहे. १ रामचंद्रा, तुझे नाम अतिशय चांगले व पवित्र असल्याने ते नेहमी माझ्या मुखात राहो. या तुझ्या नामानेच सर्व वानरकुळांचा उद्धार झाला असून राक्षसांनाही तूच मुक्त केलेस. २ हनुमंतांच्या हातून द्रोणागिरी पर्वत आणण्याचे महत्कार्य रामचंद्रा, तुम्हीच करविले. भरतभेटीच्या वेळी तुम्ही मोठीच कीर्ती करून दाखविली. ३ गौतमाच्या शापाने दगड होऊन पडलेली अहल्या तुमच्याच प्रभावाने मनुष्यरूप झाली. अशी तुमची कीर्ती अतिशय थोर व वाखाणण्यासारखी आहे. सर्व लंकेचे दहन रामचंद्रा, तुमच्याच बळावर हनुमंताने केले. ४ असा हा श्रेष्ठ रामचंद्र सीतादेवीचे जीवनच असून योगीजनांचे ध्यान आहे. या रामाचे डोळे कमळांप्रमाणे आहेत. हा तुकाराम त्याचे चरण मनापासून धरून ठेवीत आहे. ५ विवरण :-तुकाराम महाराजांनी गाइलेल्या या रामचरित्राचे महत्त्व विशेष आहे. श्रीविठ्ठल हे दैवत वारकरी पंथीयांना व नामदेवतुकारामादी संतांना अतिशय प्रिय आहे. हे श्रीकृष्णाचे म्हणजे विष्णूचेच रूप होय. रामचंद्र हाही विष्णूचाच अवतार होय. त्या दृष्टीने रामचंद्राचे व त्याच्या नामाचे माहात्म्य वारकरी संतांना विशेष वाटणे स्वाभाविकच आहे. त्याच्या मंत्रात राम हेच नाम अगोदर आहे. 'राम कृष्ण हरि' या मंत्राची महिती मराठी साधुसंतांनी व विठ्ठलभक्तांनी अनेक प्रसंगी गाइलेली आहे. तुकोबांनी या रामचरित्रपर अभंगातून रामाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. वाल्मीकीच्या रामायणानंतर रामकथेवर इतरही कवीकडून जे अनेक संस्कार झाले, त्याचा प्रभाव तुकोबांच्या मनावर असावा असे दिसते. रामनामानी जड दगड पाण्यावर तरले, राम व रावण यांच्यात काही 'प्रेमसुखाचें संधान' असल्याने त्यांनी एकमेकांचे बाण बाणांनीच निवारण केले. प्रभू रामचंद्राकडूनच आपणास मृत्यू येऊन आपणास मुक्ती मिळावी अशा हेतूने, विरोधी भक्ती करूनच रावण रामचंद्राकडे आकर्षित झाला होता, वगैरे कल्पना पुढे भक्तीच्या क्षेत्रात बलवान ठरल्या. ऐतिहासिक वस्तुस्थितीच्या दृष्टीने रामकथा पाहण्यापेक्षा, भक्तिभावाच्या परिपुष्टतेसाठीच त्या चरित्रकथेचा उपयोग पुढे पुढे होत राहिला. अध्यात्मरामायणाचा प्रभाव भक्तिमार्गावर पुढच्या काळात विशेष रूपाने पडला असल्याचे स्पष्ट आहे रावणाच्या वधानंतर रामचंद्रांनी स्वतः लंकेवर राज्य केले नाही. बंधू लक्ष्मण याजकडून त्यांनी रावणाचा बंधू विभीषण याला राज्यावर बसविले ! हा भारतीय संस्कृतीचा एक आदर्श मानावयास हवा. कारण लंकेवर स्वारी ही अन्यायाच्या परिमार्जनार्थ होती. मदोन्मत्त रावणशक्तीचा नाश करण्यासाठी तो एक महान प्रयत्न होता. ऋषीमुनींचे यज्ञयाग सुरक्षित राहावेत व अबलांच्या शीलाचे रक्षण व्हावे, म्हणून ती एक योजना होती. स्वतःच्या लहरीसाठी या बडेजावासाठी साम्राज्यविस्तार करण्याची ती महत्त्वाकांक्षा नव्हती, ती बेताल लालसा नव्हती. मानवी संस्कृतीच्या इतिहासात 'लंकाराज्यें विभीषणा । केली चिरकाल स्थापना' हे एक लोकोत्तर व प्रगल्भ मनाचे कृत्य मानावे लागेल. तुकोबांनी केलेल्या रामराज्याच्या सुखाच्या वर्णनासही रामायणात भरपूर आधार सापडण्यासारखा आहे. अभंगक्रमांक ११०७ मध्ये तुकोबांनी 'रामजप बीजमंत्र नळा' असा एक महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. यातील नळ हा प्रसिद्ध नळ राजा न मानिता रामाच्या सैन्यातील एका वानराचे नांव नल होते, हाच संदर्भ महत्त्वाचा