सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 545, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४९९ अर्थ - संसारपाशातून सुटण्याचा उपाय जो जो मी शोधू लागतो, तो तो त्यात अधिकच गुंतून जात आहे त्यात माझे पाय अधिकच गुंतले गेले आहेत १ अशा या दुःखाच्या पेचात मी सापडलो असून माझी सर्व बुद्धी व माझे सर्व बळ संपत आले आहे २ प्रारब्ध, क्रियमाण व संचित याच्यामुळे जो जो कर्मे भोगावी लागणार आहेत, ती ती खरोखर माझ्या मागे धावतच आली आहेत ३ विधिनिषेधाच्या कटकटीत मी सापडलो असून, एक संपविले की दुसरे निर्माण होऊन मी त्यातून काही मोकळा होत नाही मला त्याची निवडही करता येईनाशी झाली आहे ४ ज्याचा निषेध करावा व दूर सारावे त्याचीच वाढ माझ्या अंगात होते अशा या तृष्णेच्या वाढीमुळे मी अतिशय दुःखीकष्टी झालो आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तूच माझी मुक्तता या संसारपाशातून कर. कारण मी आता सर्व शक्तींच्या विरहित असा दुबळा झालो आहे ६ १११६ भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥ १ ॥ ऐसा पडिलों फाचणी । करीं धावा म्हणउनी ॥ २ ॥ विचारितों कांहीं । तो हैं मन हातीं नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । येयें न पुरे रिघावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पर-परंतु फाचणी-फाचात, पेचात रिघावा-प्रवेश अर्थ - या संसारपाशाचे देवा, मला फार भय वाटते हा संसार सुटता सुटत नाही १ अशा मोठ्या पेचात मी पडलो असून देवा, माझ्यासाठी तुम्ही सत्वर धावून यावे २ मी स्वतःच्या मनाशी पुष्कळच विचार करून पाहतो, पण माझे मन काही माझ्या हाताशी लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा या मनाच्या ठिकाणी काही माझा प्रवेश नीट होत नाही ४ १११७ येगा येगा पाडुरंगा । घेई उचलूनि वोसंगा ॥ १ ॥ ऐसी असोनिया वेसी । दिसतो मी परदेसी ॥ २ ॥ उगवूनि गोया । सोडवूनि न्यावे देवा ॥ ३ ॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसे नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - वोसगा-पदरामध्ये, वेसी-जवळच आश्रयाने, उगवूनि-गोडवून, गोवा-गुंतगुंत अर्थ - पांडुरंगा, तू सत्वर धावून ये ना मला उचलून तू आपल्या पदरात घे १ मी असा अगदी तुझ्या जवळच आश्रयास असूनही परदेशी झाल्यासारखा आहे २ देवा, या प्रपंचाची गुंतणूक सोडवावी व मला यातून तुम्ही मुक्त करावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे हृषीकेशी उगाच उशीर का करीत आहात ? ४ १११८ माझी विठ्ठल माउली । प्रेमपान्हा१ पान्हायली ॥ १ ॥ कुर्वाळुनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ २ ॥ केली पुरवी लाळी । नव्हे निष्ठुर कोवळी ॥ ३ ॥ तुका म्हणे घास । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- न वजे-जात नाही, आळी-हट्ट अर्थ - ही माझी विठाई माउली किती प्रेमळ आहे पाहा ही माझ्यासाठी प्रेमाच्या पाल्हाने पान्हायलेली आहे तोच मजसाठी उत्सुक आहे १ ती मला स्वतःच्या हळुवार हाताने कुरवाळिते व मग आपल्या स्तनांशी लाविते कृपेचे दूध मला पाजते व मग एक क्षणभरही माझ्यापासून दूर जात नाही २ मी जो जो हट्ट करीत असतो, १ प्रेमें पान्हा