सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 55, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा २९ माहात्म्य सांगितले आहे तुकोबांनी अनेक अभंगातून एकादशीचे महत्त्व परोपरीने सांगितले आहे 'एकादशी व्रत सोमवार न करिती । कोण त्याची गति होईल नेणों' अशी काळजी एका अभंगात व्यक्त केली आहे 'एकादशीस अन्नपान । जे नर करिती भोजन' या अभंगात एकादशी न करणारांची गती काय ती सांगून त्यांनी एकादशीमाहात्म्य वर्णन केले आहे ६० आम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाके । जाऊ पुडो भिके । कुतरीं घर राखती ॥ १ ॥ नादणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वाया भागा । थोरपण अगर । तरी ऐसे आणावे ॥ २ ॥ अक्षय साचार । केले सायासानीं घर । एरडंसिवार । दुजा भार न साहती ॥ ३ ॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तो करी । कोण गुरें वासरे ॥ ४ ॥ जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीची ॥ ५ ॥ ॰तुका म्हणे देवा । अवघा निरविला १ हेवा ॥ कुटुबाची सेवा । तोचि करो आमुच्या ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - सुडका- लंगोटी धारण करणारा, दरिद्री, धाके- भितो, पुढी- रोजच्या भिक्षेस, वाया- विनाकारण, भागा- श्रमता, साचार- खऱ्या स्वरूपाचे, सिवार- शेराचे लाकूड, निरविला- दूर केला अर्थ - थोर भक्त किती उदासीन व निरिच्छ असतो याचे वर्णन या अभंगात बुवानी फार चांगल्या प्रकारे केले आहे ते म्हणतात, आम्ही नेहमीच असे दरिद्री म्हणून भाग्यवान आहोत आमच्या घरी चोर येतच नाहीत, आले तर तेच भिवून जातात आम्ही बाहेर कुठे भिक्षेस अथवा भोजनाच्या व्यवस्थेस गेलो असता आमच्या घराचे रक्षण कुत्री करतात म्हणजे रक्षण करण्याजोगे तेथे काही नसतेच १ अशी भाग्याची वागणूक कुणाची आहे सांगा तुम्ही सर्वजण व्यर्थ भागता, दमता तुम्हास थोरपण हवे असेल तर आमच्या सारखे वागा २ आम्ही पाहा मोठ्या कष्टाने खरेखुरे घर उभे केले आहे त्याला लाकडे एरंडाची व शेराचीच वापरली आहेत, कारण याच्या- शिवाय दुसरा भार या घरास सहन झालाच नसता ३ आमचे धन व धान्य यानी लोकाची घरे भरली असून आम्ही मात्र पोट भरण्यासाठी भिक्षा मागीत हिंडतो गुरे, वासरे यांचे जतन करण्याची कटकट कोण करीत बसतो ? ४ आम्हास कशाचीच काळजी नाही, सर्वाविषयी आम्ही निश्चित आहोत कारण आमचे भांडवल म्हणजे शेण व माती, याचेच आहे याच्या साहाय्याने घराच्या भिंती मात्र स्वच्छ सारवलेल्या असून तुळशीवृंदावनही निर्मळ केले आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वराने आमची सर्व विषयाबद्दलची हावच दूर केली आहे आणि कुटुंबाची काळजी तोच नेहमी करीत असतो ६ विवरण - निरिच्छ व उद्दाम राहून सर्व भार परमेश्वरावर टाकणाऱ्या भक्ताच्या प्रपंचाची काळजी परमेश्वर करीत असतो असा अनुभव अनेक संतांना आलेला आहे मज जम अनन्य भक्त असतात तसंच ईश्वरही आपल्या भक्तांना अनन्य असतो 'अनन्याश्चिन्तयन्तो मा ये जना पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्' म्हणून आपण अनन्य चिंतन करणाऱ्या भक्ताचा यागक्षम मी चालविता अशी साक्ष भगवंताने गीतेत स्वमुखाने दिली आहे ज्ञानेश्वरांनी तर या परमेश्वराच्या अनन्यतेचे वर्णन करताना कौतुकाने म्हटले आहे, 'मग याहीवरी पार्था, माझ्या भजनीं आस्था । तरी तयाते मी माथा । मुकुट करीं ।' इतकेच नव्हे तर 'म्हगोनी गा नमस्करू । तयांतें आम्ही माथा मुकुट करू । तयाची टांच धरू । हृदयीं आम्ही तो पाहाया हे डोइल्ल । म्हणूनि अवकृती मज डोळे । हातींचिनि लालाफळें । पूजू तयांतें ॥ दोवेरी दोनी । भुजा आलो घेउनी । आलिंगावया लागुनी । तयाचे आंग ॥ असा गौरव ज्ञानेश्वरांनी भक्ताचा केला आहे ६१ परधिया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥ १ ॥ न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष । काय तुमचे यास वेचे सांगा ॥ २ ॥ बैसलिये ठायीं म्हणता रामराम । काय होय धर्म ऐसे सांगा ॥ ३ ॥ १ निरसला