सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 570, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५२४ सार्थ तुकारामगाथा ११८८ तुका मान्या पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - मान्या-मारला गेला, पेटका-पोटाने अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, मी पोटाने मारला गेलो आहे दुसरे काही मी जाणत नाही. त्यातल्या त्यात हरिभक्ताच्या संप्रदायाने मी थोडा रामनामाचा जप करतो १ ११८९ काफर सोही आपण बुझे । आला दुनिया भर । कहे तुका तुम्हे सुनो रे भाई । हिरिदा जिन्होका कठोर ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - काफर-नास्तिक हिरिदा-हृदय अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या योगाने प्रेम वाढते, त्यास मी सत समजतो व ज्याच्यामुळे देवावर असलेले प्रेम कमी होते अशा नास्तिकांना मी दुर्जन म्हणतो १ ११९० भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जयै कमतरिण । सो ही सो फल खाये ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पढीया-शिकलेले अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात, जे कुणी शिकलेले आहेत, त्यांनी आपल्या विद्यारूपी मालावर भरवंसा ठेवून लोकरंजन केले तर त्यांना परमार्थफळ प्राप्त होणार नाही व जे कोणी सर्व अभिमान टाकून आपल्याकडे कमीपणा घेऊन नम्र झाले आहेत तेच त्या परमार्थफळाचे सेवन करितात १ ११९१ फल पाया तो खुस भया । किन्होसु न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित मिलाया नाद ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - भया-झाले, मिरगा-हरीण अर्थ - जो परमार्थफळाचे सेवन करतो, तो सुखी होतो व कुणाशी वादविवाद करीत नाही जसे व्याधाच्या गायनाकडे हरिणीचे चित्त वेधून जाते की व्याधाने मारावयास काढलेल्या बाणाकडे तो पाहातही नाही १ ११९२ तुका दास रामका । मनमे एक हि भाव ॥ तो न पालटू आव । यँ हि तन जाय ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - पालटू-बदलूं अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात मी रामाचा दास आहे व माझ्या मनात त्याच्याविषयीचाच एक भाव आहे, तो हे शरीर पडले तरी कधी बदलणार नाही १ ११९३ तुका रामसु चित बाघ राखू । तैसा आपनो हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥ १ ॥ शब्दार्थ व टीपा - बछरा-वासरू सात अर्थ - तुकाराम महाराज म्हणतात वासराला टाकून गाय ही जरी वनात गेली तरी तिचे वासरावरील जे प्रेम आहे ते उठून तिच्या बरोबर जात नाही, तसे तुम्ही आपले चित्त आपल्या हाताने रामाच्या ठिकाणी बांधून ठेवा १ ११९४ चितसु चित जब मिले । तब तनु थडा होये । तुका मिलना जिन्होसु । ऐसा विरला कोये ॥ १ ॥