सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 577, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंभोगाभोग तेथें न चुकती प्रकार । जन्मजरादुःखव्याधि । साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥ ३ ॥ घोकित अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष । होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचे मूळ भूषण तुका म्हणे । सांडीं मिथ्या खती । रिघोनि संतां शरण सर्वभावे । राहे भलतिया स्थिती ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - अन-अग्नी, काया-शरीर, पचाय आनी-पंचाग्नी, चारही बाजूस अग्निकुंडे पेटवून केलेली साधना, साडी-सोडून दे, खती-काळजी
अर्थ - अग्नी तप्त झाला की शरीर तापून निघते तापत्रयानेही तो संतप्त होत असतो सचित, क्रियमाण व प्रारब्ध याचा भोग संसाराच्या स्थितीत कधी चुकत नाही ज्याप्रमाणे रहाटगाडग्याची भडकी एकसारखी फिरतच असतात, एक मडके पाण्याने भरले जाते व दुसरे रिकामे होते, त्याचप्रमाणे या प्रपंचाची गती आहे हा प्रपंच म्हणजे पंचाग्नीच्या साधनाप्रमाणे खडतर आहे, तो तू नीट साधून आत्मशांती प्राप्त करून घे १ नेहमी काम करीत असताना नारायण, नारायण असे मुखाने म्हणत जा या योगे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, पाप, पुण्यें ही सर्व दुःखे नाश पावतील २ रानावनात जाऊन तू शीत व उष्ण याची सवय कर आसन मांडून समाधी साधण्याचा प्रयत्न कर तपश्चर्या, तीर्थयात्रा, दानधर्म, व्रताचे आचरण व यज्ञयाग, वगैरे साधनाच्या व बुद्धीच्या योगाने नाना भोगाचे प्रकार काही चुकत नाहीत तेव्हा जन्म, मृत्यू, म्हातारपण, रोग याना सहन करून, काम, क्रोध, अहंकार इत्यादी विकाराना सहन करून आपल्या स्वतःच्याच आश्रमात अविनाशी स्वरूपात तू निजसुख प्राप्त करून घे ३ वेदाची अक्षरे घोकण्यास आरंभ करशील तर विनाकारण अहंकार व विधिनिषेध यांची कटकट मात्र पाठीमागे लागेल. वादविवाद करशील तर वृथा निंदेचा दोष प्राप्त होईल म्हणूनच ही भूषणे वाटली, तरी ती दोषांचीच मूळे आहेत असे तू समज, आणि तुकाराम महाराज म्हणतात, तू या संसाराची खोटी वाटणारी वृथा चिंता सोडून दे सर्व भावाने या संताना तू शरण जावेस व मग हव्या त्या स्थितीत तू राहिलास तरी हरकत नाही ४
१२११ नव्हे गुरुदास्य संसारिया । वैराग्य तरी भेंणे वापे विषया । तैसे नाम नव्हे पंढरीराया । जया सायास न लगती ॥ १ ॥ म्हणोनि गोड सर्वभावे । आंघोळी न लगे तोंड धुवावे । अर्थचाड जीवे । न लगे भ्यावे संसारा ॥ २ ॥ कर्मा तव न पुरे संसारिक । धर्म तव१ फळदायक । नाम विठ्ठलाचे एक । नाशीं दुःख भवाचे ॥ ३ ॥ न लगे साडणे मांडणे । आगमनिगमाचे देखणे । अवघें तुका म्हणे । विठ्ठलनामें आटले ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - गुरुदास्य-गुरुच दास्यत्व, भेंणे-भयाने, सायास-प्रयत्न, आटले-समाविष्ट झाले
अर्थ - जी संसारी माणसे आहेत, त्यांना श्रीगुरुचे दास्यत्व खडतरपणे होणार नाही, आणि प्रखर वैराग्य म्हणजे विविध विषयांविषयी पराग, हेही त्यांच्याकडून होणार नाही तसे या पंढरीरायाचे नाम नव्हे याच्या प्राप्तीसाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत १ यासाठी जे सर्व दृष्टींनी गोड आहे, त्याचा स्वीकार करण्यासाठी आंघोळ करणे अथवा तोंड धुणे याचीही गरज लागत नाही जे सांसारिक जीव आहेत, त्यांनी धनाची योग्य इच्छा
१ तरी