भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 597, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 597

पारखियासी सांगता गोष्टी । घरची कुटी खातील ॥ ३ ॥ तुका म्हणे निवांत राहो । पाहिले पाहीं धणीवरी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भार-ओझे, वित्त-संपत्ती, कुटी-निंदा अर्थ :- या श्रीहरीने माझे चित्त हरून टाकले आहे संपत्तीचे ओझे याने विसरायला लावले आहे १ आता मी घरी तरी कसा जाऊ ? आता हा बाह्य लौकिक काही मला बरा वाटत नाही २ जे कुणी पारख करणारे असतील, त्यांना ही माझी अवस्था समजेल, पण घरचे लोक माझी निंदाच करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मी आता याच अनुभवात स्वस्थ होऊन राहतो जे मी पाहिले आहे तेच तृप्ती होईपर्यंत पाहात बसतो ४ विवरण - वरील दोन अभंगातून तुकाराम महाराजांनी परमेश्वराची अनुभूती कशी आली व तिकडे तिकडे श्रीहरीच सामावून राहिल्याची प्रचीती कशी आली याचे मोठे रेखीव असे वर्णन आहे जिकडे तिकडे श्रीहरीचीच रूप त्यांना दिसू लागली मागचे सर्व संशय फिरले तळमळ दूर झाली, व 'हरि भोवे भोवताला' अशी जाणीव तीव्रपणे प्रकटली तुकाराम महाराजांना अशा प्रकारे श्रीहरीच्या दर्शनाने जे सुखसमाधान वाटत असे, त्याचे रेखीव व मर्म- ग्राही वर्णन त्यांनी शब्दांकित केलेले आहे 'भाग्य फळलें झाली भेटी । नेघें तुटी पाबरी । दैन्य गेले हरली चिंता । सदैव आता पावरी' अशा प्रकारचा अनुभव त्यांनी आणखी एका अभंगात वर्णन केलेला आहे पुष्कळ दिवस वाट पाहिल्यानंतर परमानंदाचा दिवस कसा उगवतो, याचे मोठे सुंदर वर्णन तुकोबानी 'बहुता दिवसाची आजी झाली भेटी । झाली होती तुटी काळगणी' या ओळीने सुरु होणाऱ्या अभंगात केलेले आहे या श्रीहरीचे रूप प्राप्त झाल्या- वर, त्याची भेट झाल्यावर मग जगाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते 'धवळले जगदाकार । आधार तो निरसला ।' असा सर्वत्र प्रकाशाचाच पसारा दिसतो जिकडे तिकडे त्या श्रीहरीच्याच खुणा मग दिसू लागतात 'धावे मागे मागें । जाय तिकडे चालत लागे ॥ तुका म्हणे मेले । माझें सर्वस्व विठ्ठले' अशी त्याची जवळीक त्यांना वाटत असे 'जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनिया' अशी त्याची नित्य रमणीय सोबत मग उत्साहवर्धक वाटते सर्वत्र त्याच एका रूपाने विश्व भरून गेल्याचा अनुभव येतो 'ब्रह्मरसे गेले भरूनिया अंग' अशी थोर प्रचीती मग येत

– खंड पहिला समाप्त –