सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 70, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४४ सार्थ तुकारामगाथा
हे बालभक्त म्हणून पंढरपुरास ज्ञानेश्वराच्या काळातच प्रसिद्धीस आले होते ते शिंपी जातीचे असून कापड विकण्याचा त्याचा धंदा होता तुकाराम महाराजांनी आणखी एका संताचे उदाहरण दिले आहे ते त्याच्या आधीच थोड्याच वर्षांत होऊन गेलेल्या एकनाथाचे आहे परंतु हे एकोबा अभंगात व्यंकोबा म्हणून उल्लेखलेले आहेत 'व्यंकोबा' हाच पाठ बरोबर असण्याची शक्यता आहे हे व्यंकोबा तुबाच्या समकालीन संत वाय ? कारण कबीर व नामदेव ही दोन जुन्या काळची उदाहरणे दिल्यानंतर 'प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण' म्हणून अगदी नजीकचा उल्लेख करीत आहेत कदाचित एकोबा म्हणजे एकनाथ हेही त्यांना काळच्या दृष्टीने कालचेपरवाचे वाटत असावेत कारण एकनाथाच्या निर्याणानंतर आठनऊ वर्षांतच तुकोबाचा जन्म झाला
९३ भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥ १ ॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अगोंच अधर्म ॥ २ ॥ देव अंतरे ते पाप । खोटे उगवा सकल्प ॥ ३ ॥ तुफा म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा¹ पोटीं ॥ ४ ॥
शब्दार्थ व टीपा - उफराटें-उलटे, अंतरे-दूर होतो, उगवा-उलगडा करून घ्या
अर्थ - मनात ईश्वराविषयी भाव असला म्हणजे नाना विषयांचे भोग घेत असतानाही त्याग घडतात व ईश्वराविषयी निष्ठा नसेल तर मात्र वरवर त्याग करीत असतानाही तो भोगच होतो १ असे हे धर्माचे रहस्य उलटेसुलटे आहे वद्यो धर्मामध्येच अधर्म दिसतो, अधर्मातच धर्म असतो २ एवढे लक्षात असू द्या की ज्यामुळे देव अंतरतो ते पापकर्म समजावे, म्हणून आपल्या कर्माचे खरेखोटेपंग नीट समजावून घ्यावे, त्याच्या स्वरूपाचा उलगडा करून घ्यावा ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या कर्माविषयी परीक्षा न करता संकल्प करणे ही भीड खोटी आहे विचार करून भिडेचा त्याग करणे श्रेयस्कर असते ४
९४ भोरप्याने सोंग पालटिले वरी । बक ध्यान धरी मत्स्या जैसे ॥ १ ॥ टिळे माळा मेद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ २ ॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फासा कळो नेदी ॥ ३ ॥ खाटिक हा स्नेहभावें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥ ४ ॥ तुका म्हणे तैसा भला मी लोकांत । परो तू कृपावत पाडुरंगा ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - भोरप्याने-बहुरूप्याने बक-बगळा, मद-बाटमारे लोक डीवर-मासे धरणारा, स्नेहभावें-मोठ्या प्रेमाने
अर्थ - आपल्या कमकुवत मनाची मोठ्या विनयाने व प्रांजळपणे कबुली देताना तुका म्हणत आहेत, परमेश्वरा, बहुरूप्याने वरवरची अशी नाना प्रकाराची सोंगे धारण केली तरी तो निराळाच असतो व बगळ्याने डोळे मिटून ध्यानाची बतावणी केली तरी त्याचे चित्त माशावरच असते १ एखाद्या वाटमाऱ्याने गळ्यात माळा घातल्या किंवा मुद्रा लावल्या अंगावर तरी त्याचे अंतरंग निराळेच असते फांसे टाकून प्राण्यांना पकडण्याचे त्यांचे फसब दिसून येत नाही इतकेच २ माशांना गळाला खाण्याचा पदार्थ लावून मासेमारी लोक आमिष दाखवितात, पण त्यांना त्या गळात असणारा फास दिसत नाही ३ एखादा खाटिक मोठ्या प्रेमाने शेळ्यामेंढ्या पाळतो, त्यांना खायला घालतो, पण त्याचा हेतू या प्राण्यांना मारून त्यांचे मांस खाण्याचाच असतो हे वरवर दिसत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व उदाहरणांप्रमाणेच मी वरवर लोकात बरा दिसत असेन, साधू वाटत असेन, पण माझे अंतरंग अजून शुद्ध नाही, प्रभू पांडुरंगा, तू कृपाळू आहेस म्हणून सारे निभावते एवढच ५
१ विचाराच्या