सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 8, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंकर्मकांडावर त्यांनी कडाडून असा प्रखर शब्दांत हल्ला केला आहे लोक संसार-संसार, पैसा-पैसा, बायको- बायको करीत असताना कसे बेभान होतात व विठ्ठलाला कसे विसरतात, याचे वर्णन त्यांनी अनेक उदा- हरणे देऊन केले आहे. निरनिराळ्या प्रसंगाच्या निमित्ताने त्यांनी संसारी लोकांना सावध करून भक्ति- मार्गास लाविले नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग जो भागवत संप्रदायात रूढ होऊ पाहात होता, त्यास त्यांनी चालना दिली ज्या जिजाबाईंचे किंवा आवलीचे नाव तुकोबांच्या चरित्रात वारंवार कडवटपणे उच्चा- रिले जाते, तिच्याही बाजूने पुष्कळच सहानुभूतीने बोलण्यासारखे आहे तुकारामबुवानी तिलाही उपदेश करून पूर्ण बोधाचे बारा अभंग लिहिले आहेत
याप्रमाणे तुकोबानी स्वतःचा उद्धार करून घेतलाच पण त्यांचे कुटुंबीय व त्याच्या भोवतीचा परिवार यांनाही विठ्ठलभक्तीचे सुख समजू लागले. तुकारामबुवांची कीर्ती अवघ्या महाराष्ट्रात पसरून राहिली त्याच्या भोवती शिष्यसमुदाय मोठ्या प्रमाणावर जमू लागला तुकारामबुवाना जिंजाबाईपासून काशी, भागीरथी व गंगा अशा तीन कन्या व महादेव, विठ्ठल व नारायण असे तीन मुलगे, अशी अपत्ये झाली या लहानशा कुटुंबाबाहेर अवघे विश्व तुकोबाना जवळचे झाले होते 'देवांसाठीं झालें ब्रह्मांड सोयरें' असे त्यांनी म्हटले आहे निळोबाराय पिंपळनेरकर, रामेश्वरभट्ट वाघोलीकर, गंगाराम मवाळ कडूस्कर, महादाजीपंत कुलकर्णी देहूकर, कोंडोपंत लोहोकरे, मालजी गाडे येळवाडीकर, गवरशेट सुदुंब्रेकर, संताजी जगनाडे, लोहगावकर इत्यादी अनेक शिष्य मंडळी बुवांच्या भोवती जमा झाली निळोबाराय पिंपळनेरकर यांच्या परमार्थांमधील अधिकारासंबंधी जितके लिहावे तितके थोडेच आहे. 'येऊनियां कृपावंतें । तुकया स्वामी सद्गुरू नाथें । हात ठेविला मस्तकीं । देऊनि प्रसाद केलें सुखीं' असा आपला व तुकोबांचा संबंध निळोबानी वर्णन केलेला आहे असेच नाव या भक्तीच्या व परमार्थवृत्तीच्या प्रांतात तुकोबांच्या कृपेने कमाविले आहे ते बहिणाबाई या थोर व अधिकारसंपन्न अशा स्त्रीने 'मत्स्य जैसा जळावांचूनी चरफडी । तैसी ते आवडी तुकोबाची' अशा प्रकारची तगमग तिची तुकोबांसाठी असे हिला तुकोबानी स्वप्नात मंत्रोपदेश दिला 'स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली' अशी साक्ष बहिणाबाईंची आहे
याप्रमाणे तुकारामबुवा आपल्या जीवनात ईश्वरी प्रसादाने तृप्त झाले 'तुका प्रेमें माजे गाये । गाणियांत विरोनि जाये' अशी त्याची अवस्था झाली 'सर्व सुखें पायीं वोळंगिती,' 'खुटलीया धाव तृष्णेचिया,' 'वेध थोरगें लावियेला' अशा तृप्तीच्या आनंदात तुकोबानी स्वतःचा व लोकांचा उद्धार केला व आपल्या नंतरही अखंडपणे लोकांना प्रेरक व मार्गदर्शक ठरेल असे अभंगवाङ्मय निर्माण केले अणुरेणूएवढे असलेले तुकारामबुवा आभाळाएवढे बनून राहिले 'तुझी माझी एक ज्योती' अशी अनुभूती त्यांना येत राहिली जिवंतपणीच ते नारायणाच्या स्वरूपात जाऊन जणू मिळाले होते 'निरजनीं आम्हीं बांधियेलें घर', 'झाला प्रेतरूप शरीराचा भाव' 'बीज भाजुनी केली लाही । आम्हा जन्ममरण नाहीं' यासारख्या अनुभवातून तुकारामबुवा जात शेते भक्तिमार्गाच्या पथावर ते कळसरूपाने स्थिर झाले शके १५७१ च्या फाल्गुन व १ रोजी त्यांनी देहूस गोपाळपुरा येथे नांदुरगीच्या वृक्षाखाली कीर्तन केले आणि फाल्गुन व २ या दिवशी तुकोबानी या लोकांची यात्रा संपविली ते सदेह वैकुंठाला गेले असा समज पुष्कळांचा आहे 'घरा आलें वैकुंठपीठ' अशी ज्यांची अनुभूती ती मात्र त्यांच्या अभंगवाणीत आजही ताजी टवटवीत अशी आहे