सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 89, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ६१ जोहार-अभंग ३ १२७ मायबाप¹ जोहार । सारा साधावया आलो बेसकर ॥ १ ॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालितो जी ॥ २ ॥ फांकूं नका रुजू जालिया वाचून । सागा जी कोण घरीं तों धण्या ॥ ३ ॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्या कोणी घडी रहेना हो ॥ ४ ॥ तुका म्हणे काहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - जोहार-पूर्वी अंत्यजादी महार लोक 'जोहार' म्हणून नमस्कार करीत असत जोहार म्हणजे नमस्कार सारा-सरकारी कर, बेसकर-वेशीवर राहणारा महार, झाडा-हिशेब, खोडा-सापळा, पिंजरा, फाकू नका-जाऊ नका, तडामोडी-ताटातूट अर्थ - मायबाप, मी हा गावचा बेसकर महार तुम्हास जोहार जोहार असे म्हणून वंदन करीत आहे मी, सरकारकडून सारा मागण्यासाठी आलो आहे १ तुम्ही तुमच्या मागल्यापुढल्या जन्माचा सर्व हिशोब नीट द्या, नाही तर जन्ममृत्यूच्या किंवा संसाराच्या खोडपात, सापळयात किंवा चक्रात तुम्ही पुन सापडाल २ धन्याच्या चाकरीस हजर झाल्यावाचून तुम्ही इतरत्र कुठे जाऊ नका जे काही सागायचे असेल ते या घरच्या धन्याला सागा ३ मायबाप लोकहो, आजच काय प्रियान्मंची ताटातूट करून घेऊन मोकळे व्हायचे असेल तर व्हा, पुन काही उद्या ही वेळ यायची नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात, शेवटच्या वर्षी जेव्हा हिशेब पूर्ण होईल त्यावेळी मग काही बचावाचे बोलणे करता येणार नाही काय ते आताच साधा ५ विवरण - मराठी संतानी लोकवाङ्मयाच्या स्वरुपात जो अनेक रूपके 'भारुड' या विभागात केली आहेत त्यात त्यांच्या 'जोहार' अभगाना फार महत्त्व आहे अशा प्रकारचा हा उपदेश रूपकात्मकच असतो गारुडी, गावगुंड, गोंधळी, वासुदेव, भुल्या, माग, जागल्या, वेस्कर, वाघ्या, मुरळी अशा अनेक नावांनी ही लोकगीतात्मक अभगरचना संतानी केली आहे नुसत्या परमार्थपर निरूपणापेक्षा त्याच्या लोकव्यवहारात्मक अशा विविध रीतीतून किंवा क्रियातून बोध दिल्यास तो सर्वसामान्य जनतेस अधिक उपयुक्त होणार असतो 'जोहार' हा एक महत्त्वाचा प्रकार आहे 'जोहार' म्हणजे अस्पृश्यांनी वरिष्ठांना करावयाचा नमस्कार, किंवा रामराम जुन्या समाजरचनेत किंवा जातिसंस्थेत निरनिराळ्या जातीना काही कामे वाटून दिली होती ती या भारुडात्मक लोक- वाङ्मयात भरून टिकून आहेत 'जोहार' मुख्यतः महाराच्या तातचा रामराम आहे गावव्यवस्थेत महारास फार महत्त्वाचे व जबाबदारीचे काम असे वेशीवर राहून त्याने गाव रक्षण करावे लागे सरकारचा सारा कुलकर्याच्या वतीने दरबारात भरण्याचे जोखमीचे काम यांच्याकडेच असे सरकारी पत्रव्यवहार नेणे, आणणे, निरोप देणे, घेणे ही कामेही या महाराकडेच असत महार हे अधिक बुद्धिमान, शक्तिमान व विश्वासू असल्यामुळे जुन्या समाजरचनेत त्यांना महत्त्वाचे स्थान असे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव मोठ्या सतोषाने करता येण्यासारखा आहे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशी महारच, म्हणून या देशाचे नाव महाराष्ट्र आहे असाही संशोधकाचा एक तर्क आहे येथील भूमिपुत्र म्हणून महारच प्रसिद्ध आहेत जमिनीची सर्व व्यवस्था महाराकडे असे जमिनीच्या न्यायनिवाड्यात महाराची साक्ष महत्त्वाची असे महाराच्या या कामाचे रूपकाच्या आश्रयाने मोठे सुरेख वर्णन संताच्या अभंगात सापडते स्वतः महाराचे रूप घेऊन किंवा त्या भूमिकेवरून संतानी परमेश्वरास अनेकदा आळविले आहे महार व त्याचा जोहार याना आणखी महत्त्व येण्याचे एक कारण म्हणजे ज्ञानेश्वराच्या काळी संतत्वास पोचलेला चोखा महार यांचे कर्तृत्व होय आपल्या विठ्ठलभक्तीमुळे हा चोखा महार सर्वांना वद्य झाला 'जोहार १ जोहार मायबाप जोहार