सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 91, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ६३ १३० शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षितीला हो दिसा साता ॥ १ ॥ उठाउठी करी स्मरणाचा धावा । धरवत देवा नाहीं धीर ॥ २ ॥ त्वरा झाली गरुड टाकिला मागें । द्रौपदीच्या लागे नारायणे ॥ ३ ॥ तुका म्हणे करी बहुत तातडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शुकसनकादिक-प्रसिद्ध ब्रह्मचारी, धर्मज्ञ, वैराग्यशील ज्ञानी असा शुकाचार्य सनक, सनदन, सनातन व सनत्कुमार हे सनकादिक ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र ज्ञानी व तत्त्ववेत्ते म्हणून प्रसिद्ध होते बाहो- हात, परीक्षित-अर्जुनाचा नातू, उत्तरा-अभिमन्यू याचा मुलगा उठाउठी-ताबडतोब, द्रौपदी-पांडवपत्नी, द्रुपद राजाची मुलगी अर्थ - शुकसनकादिक ऋषिमूनींनी हात ऊंच करून सांगितले आहे की, परिक्षिताचा धावा ऐकून सातव्या दिवशी भगवंताने त्याचे रक्षण केले १ जो कोणी आपले स्मरण करील धावा करून प्रार्थना करील त्याकडे देव रक्षणास धावतो, देवालासुद्धा मग धीर धरवत नाही २ कौरवसेभेत दुष्टाकडून गांजलेल्या द्रौपदीकडून आर्त हाक ऐकू येताच भगवंताने गरुडासारख्या चपळ वाहनासही मागे टाकले व तो मनोमय वाहनातून येऊन तिच्या साहाय्यासाठी उभा राहिला ३ तुकाराम महाराज म्हणतात, एकनिष्ठ प्रेमाची आवड या भगवंतास फार असल्याने तो भक्ताच्या रक्षणासाठी अशीच त्वरा करीत असतो तातडीने तो भक्तांना संकटमुक्त करतो ४ विवरण - केवळ मनोभावे स्मरण केले तरी भक्ताचे रक्षण परमेश्वर कसे करतो हे दाखविण्यासाठी तुयानी दोन उदाहरणं दिली आहेत परिक्षितास भगवंतानी अनेक वेळा सरक्षण दिले आहे अश्वत्थाम्यान सोडलेल्या अस्त्रांमुळे उत्तरच्या गभात हा होरपळू लागला उत्तरेने विष्णूचा धावा केला, तेव्हा त्याचे रक्षण झाले हा एकदा तृषाक्रान्त होऊन पाण्यासाठी शमीक ऋषीच्या आश्रमात गेला शमीक ध्यानस्थ असल्याने त्याच्या ध्यानात याची याचना आली नाही यात रागाने त्याच्या गळ्यात एक मृत सर्प अडकविला ऋषीचा मुलगा शृंगी याने सातव्या दिवशी परीक्षित राजाला सर्पदंश होऊन मरण येईल असा शाप दिला परिक्षिताचे हे सकट शुकाचार्यांच्याकडून भागवतश्रवणान नष्ट झाल्याची कथा आहे १३१ बोलिलो तें काहीं तुमचिया हिता । वचन नेणता क्षमा कीजे ॥ १ ॥ वाट दावी तया न लगे रुसावे १ । अतित्याई जीवे नाश पाये ॥ २ ॥ निंब दिला रोग तुटाया अंतरों । पोभाळितां धरि आंत चरे ॥ ३ ॥ , तुका म्हणे हित देखण्यास कळे । पडती आंधळे कृपा माजी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अतित्याई-आततायी मनुष्य, पोभाळिता-वरवर चोळल्याने, देखण्यास-पाहणाऱ्यास कूपा माजी-विहिरीत अर्थ - मी आजवर कटू शब्दात तुम्हास काही बोललो असेन, पण ते तुमच्या हितासाठीच होते हे ध्यानात घ्या त्यातील कडवटपणा सोडून मला क्षमा करा तुम्ही १ जो नीट रस्ता दाखवितो त्याच्यावर कधी रागावू नये, त्याचे न ऐकताच जर आततायी माणसाप्रमाणे वागाल तर मग नष्ट व्हाल २ एखाद्या वैद्याने पोटात घ्यावयास कडू लिंबाचे औषध दिलेले असते, ते रोग नाहीसा व्हावा म्हणूनच पण ते पोटात घ्यायच्या ऐवजी जर वरवरच चोळले तर बरे वाटायच्या ऐवजी रोगाचे प्रमाण वाढतच राहील ३ तुकाराम महाराज म्हणतात जे लोक विचार करतात त्यानाच आपले हित समजेल, पण आंधळे असतील तर ते विहिरीतच पडतील अज्ञानाच्या विहिरीत पडून राहतील ४ १ शिषावे