भारतकोश
विक्रमोर्वशीयम् (महाकवि कालिदास - संस्कृत मूल एवं हिन्दी अनुवाद)

विक्रमोर्वशीयम् (महाकवि कालिदास - संस्कृत मूल एवं हिन्दी अनुवाद)

Vikramorvashiyam of Kalidasa with Hindi Commentary

महाकवि कालिदास / पं. विश्वनाथ शास्त्री द्वारा

DevanagariSanskritpublished168 पृष्ठ

पृष्ठ 2, कुल 168 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 2

सन १८८८ मध्यें छापलेल्या पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना. ---❖--- महाकवी श्रीकालिदासरचित अभिज्ञानशाकुंतल नाटक राघवभट्टकृत टीकेनें कांहीं वर्षांमागे आम्ही छापून प्रसिद्ध केलें, त्या वेळेस त्या व इतर कवींचीं नाटकें सटीक छापून काढावीं हा आमचा मानस होता पण तशीं साधनें अनुकूल नसल्याकारणाने आजपर्यंत आम्हांस तादृशपानें कांहींच करितां आलें नाहीं सुमारें दोन वर्षांमागे आमचे जयपूरकर मित्र महामहोपाध्याय पण्डित दुर्गाप्रसाद यांनी विक्रमोर्वशीवरील रत्ननाथकृत टीकेची एक हस्त- लिखित प्रत आम्हांस पाठवून दिली ही प्रत संवत् १७४५ माघ कृष्ण अमावास्या रोजीं लिहिलेली आहे तेव्हां आज ह्या पोथीला बरोबर १०० वर्षे निघून गेलीं या पोथीच्या लेखकानें-त्यास संस्कृत न समजल्यामुळे म्हणा, किंवा निष्काळजीपणामुळे ह्मण-निरनेक ठिकाणीं भलत्याच हस्तदोषांच्या चुका केल्या आहेत तरी ज्या पोथीवरून ही प्रत उतरून घेतलेली आहे ती ग्रंथाच्या शुद्ध असण्याकारणाने हींत अशुद्धे फारच थोडीं राहिलीं आहेत व जीं बहुधा शुद्ध वाचतां येतात क्वचित् पंक्ति सुटल्या आहेत त्यास प्रतान्तरा- शिवाय उपाय नाहीं दुसरी एखादी पोथी मिळेल ह्या आशेनें आज २ वर्षे वाट पाहिली, व ठिकठिकाणीं चौकशीही केली परंतु प्रत्यन्तर मिळालें नाहीं दुसरी प्रत मिळत नाहीं ह्मणून मिळालेली प्रतही गुप्त ठेवावी ही गोष्ट आम्हांस प्रशस्त वाटेना ह्मणून याच एका पोथीवरून ही टीका छापली आहे पुढें प्रत्य- न्तर निघाल्यास ती सुधारून घेतां येईल ह्या नाटकाचा कर्ता कालिदास हा कवि कोणत्या शालीं झाला याविषयीं पुष्कळ मतभेद आहेत ख्रिस्तीशकापूर्वील शतक ख्रिस्तीशकानंतरचें दुसरें शतक सहावें शतक वगैरे अनेक काळ या कवीविषयीं विचार करतांना विद्वानांनी सुचविले आहेत परंतु निश्चयात्मक असा एकही काळ या कवीचा ठरवून ठरता नाहीं टीकाकार रत्ननाथ याविषयींची जी काय माहिती मिळते ती त्याच्या या टीकेवरून या टीकेच्या आरंभीं मङ्गलाचरणांत व अणीं उपसंहारांत टीका- कारानें स्वतःविषयीं जे श्लोक केले आहेत त्यांवरून या टीकाकाराचा जन्म मानितामक कुळांत झाला याचे कुळाचें आराध्य दैवत रामचंद्र उपनाम निम्बेकर (पंडेकर) पंज्याचें नांव तानभ आज्याचें रंगनाथ, चुलत्याचें नारायण, पित्याचें बाळकृष्ण, वडील बंधूचें वेणीमाधव आणि १ ह्या नारायणाच्या उत्तररामचरित व विद्धशालभञ्जिका नाटकांवर टीका आहेत