छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 13, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंदीड हजारांचा सरंजाम देऊन त्यांना बढती दिली. या सरंजामात शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा मालोजी व विठोजी यांचेकडे वहिवाटीस आला. या सुमारास मालोजीचे वय केवळ चौदा-पंधरा वर्षांचे होते. इ.स. १५९१ ते १५९५ या काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात जबरदस्त संघर्ष चालू होता. या संघर्षात निजामशहाच्या वतीने मालोजीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला. त्याबद्दल बुऱ्हाण निजामशहाने त्याचा सरंजाम पाच हजारपर्यंत वाढविला. त्यामध्ये सुप्यासारख्या परगणा मालोजीकडे वहिवाटीस आला. बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. मलिक अंबर आणि मिआन राजू या दोन सरदारांमध्ये सत्तास्पर्धा निर्माण झाल्या. मूर्तजा निजामशहाला मलिकअंबरचे वर्चस्व तापदायक होईल असे वाटू लागले. म्हणून त्याने मिआन राजू वर अधिक जबाबदारी टाकली आणि त्याला अधिक अधिकार दिले. त्यातून मलिक अंबर व राजू यांत अनेक चकमकी होऊ लागल्या. मालोजी भोसले हा मलिक अंबरचा पक्षपाती असून इंदापूर परगण्यातील गढीमध्ये तो वास्तव्य करून होता. मिआन राजूच्या सैन्याने इंदापूरच्या गढीवर हल्ला केल्यानंतर झालेल्या चकमकीत मालोजी ठार मारला गेला. त्याच्या मृत्यूसमयी त्याचा मुलगा शहाजी हा केवळ पाच-सहा वर्षांचा होता. मालोजीच्या मागे विठोजीने १६११ पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला. त्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीकडे आली. मालोजीच्या पत्नी निंबाळकर घराण्यातील असून तिचे नाव दीपाबाई होते. तिला शहाजी व शरीफजी अशी दोन मुले होती. त्या मुलांच्या नावासंबंधी बखरीत दिलेल्या कथांना कोणताही आधार नाही. □□□ शिवपूर्वकाल ७