छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 14, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ें२. शहाजीची कामगिरी ज्यावेळी जहागिरीची जबाबदारी आली त्यावेळी शहाजी केवळ १२ वर्षांचा होता. आपल्या कर्तबगारीवर शहाजीने मलिक अंबरचा विश्वास संपादन केला आणि काही वर्षांतच तो मातब्बर सरदार झाला. त्याचे वडील मालोजी व चुलते विठोजी हे दोघेही पराक्रमी होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा मालोजीने जिर्णोध्दार केला तसेच शिखर शिंगणापूर येथे यात्रेकरूंच्या सोईसाठी एक तलाव बांधला. औरंगाबाद मध्ये मालपूरा आणि विठपुरा अशा दोन पेठा आहेत. ही नावे मालोजी विठोजी यांच्यावरून पडली असावीत असे मानले जाते. श्रीगोंद्याच्या शेख महंमद या संतास मालोजीने बारा बिघे बागायती जमीन दान म्हणून दिली होती. श्रीगोंदयास जी पेठ मालोजीने बसविली तिला मकरंदपुरा असे म्हणतात. मालोजीस मकरंद अशी पदवी मिळाली होती हे ऐतिहासिक पुराव्यावरून स्पष्ट होते. शहाजीचा उत्कर्ष विठोजी भोसल्याच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजीवर आली. मालोजीची पंचहजारी शहाजीला मिळाली. लहान वयातही ही जबाबदारी शिरी घेण्याची कुवत शहाजीमध्ये होती. शहाजीची ही कुवत पाहून निजामशाहीतील सप्तहजारी सरदार लखुजी जाधवराव याने आपली कन्या जिजाबाई हिचा विवाह शहाजीबरोबर केला. या संदर्भात बखरीत दिलेली रंगपंचमीच्या सणाची कथा निराधार असून शहाजीच्या विवाहाप्रसंगी मालोजी हयात नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. शहाजीचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. इ.स.१६२० पासून शहाजीच्या कर्तबगारीला बहर आलेला दिसून येतो. मलिक अंबरचे कर्तृत्व बुऱ्हाण निजामशहाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राट अकबर याने अहमदनगर ८