छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 15, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंपर्यंत सैन्य पाठवून दहशत निर्माण केली. त्यावेळी चांदबिबीने पराक्रम गाजवून अहमदनगरचा बचाव केला तरीपण तिच्या मृत्यूनंतर मुघलांनी पुन्हा आक्रमण करून १९ ऑगस्ट १६०० रोजी अहमदनगर जिंकून घेतले. राजधानीचे शहर अहमदनगर हातचे गेल्यानंतरही मलिक अंबरने धीर सोडला नाही. मूर्तजा निजामशहा दुसरा याला मराठवाड्यातील परिंड्याच्या किल्ल्यात सुरक्षित ठेऊन दौलताबादजवळ असलेल्या खडकी या गावी मलिक अंबरने आपली नवी राजधानी उभारली. हे खडकी गाव पुढे औरंगाबाद या नावाने प्रसिद्धीस आले. निजामशाही वाचविण्याचे प्रयत्न चालू असतांना मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी असलेल्या मिआन राजूने मलिक अंबरला सर्वतोपरी सहाय्य केले. अकबरानंतर मुघल सम्राट बनलेल्या जहांगीरने निजामशाहीचा उच्छेद करण्यासाठी शहानवाजखान नावाच्या सरदारास दक्षिणेत पाठविले. शहानवाजखानाने रोशन गावला मलिक अंबरचा पराभव करून फेब्रुवारी १६१६ मध्ये खडकी हे गाव लुटले. मलिक अंबरने मुघलाशी तह करून बालाघाटचा प्रदेश जहांगीरला दिला. अशाप्रकारे एक मोठा पराभव मलिक अंबरला पत्करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत लखुजी जाधवरावाने निजामशाही सोडली आणि तोही मुघलांना जाऊन मिळाला. अशा या आणीबाणीच्या काळामध्ये मलिक अंबरला शहाजीचे मोठे सहकार्य मिळाले. भातवडीची लढाई अकबरानंतर जहागीर मुघल सम्राट झाल्यावर त्याने दक्षिण भारतात राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न सुरू केले. लखुजी जाधवराव मुघलांना मिळाल्यामुळे निजामशाहीची बाजू लंगडी पडली होती. या परिस्थितीची फायदा घेऊन विजापूरच्या आदिलशहाला जहांगीरने निजामाविरुद्ध चिथावले. त्यामुळे मलिकअंबर अडचणीत येईल असा जहांगीरचा कयास होता. परंतु धूर्त मलिक अंबरने गोवळकोंड्याच्या कुतुबशहाबरोबर तह करून आपली बाजू भक्कम केली. त्यानंतर थेट बीदरपर्यंत चढाई करून आदिलशाही फौजेचा मोठा पराभव केला. त्यानंतर मलिक अंबरने थेट विजापूरपर्यंत मोहिम काढून आदिलशहाच्या राजधानीलाच वेढा दिला. परंतु मुघलांची मदत मिळाल्यामुळे आदिलशहाने निकराचा लढा दिला. तेव्हा नाईलाज होऊन मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठविला आणि अहमदनगरकडे त्याने प्रयाण केले. या संधीचा फायदा घेऊन आदिलशहा व मुघल यांच्या फौजांनी मलिक अंबरला भातवडीजवळ गाठले. शहाजीची कामगिरी ९