छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 16, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंऑक्टोबर १६२४ मध्ये मोठा रणसंग्राम होऊन मालिकअंबरने आदिलशाही व मुघली फौजांना पराभव केला. या लढाईत मालिकअंबरप्रमाणे शहाजीनेही मोठा पराक्रम गाजविला. शहाजीचा भाऊ शरीफजी यानेही या लढाईत मोठा पराक्रम गाजविला. या लढाईत त्याला वीरमरण आले. भातवडीच्या लढाईत मुघल आणि आदिलशहा या दोघांनाही माघार घ्यावी लागली. भातवडीच्या अपूर्व यशानंतर निजामशाहीला उर्जितावस्था येण्यास काहीच हरकत नव्हती. परंतु मलिक अंबर व शहाजी यांच्यामध्ये अचानक बेबनाव निर्माण झाला. परिणामी शहाजीने निजामशाही सोडून आदिलशाहीचा आश्रय घेतला. त्यामुळे मलिक अंबर व शहाजी यांच्यात प्रत्यक्ष संघर्षास सुरुवात झाली. तथापि या संघर्षात मलिकअंबरला यश मिळू शकले नाही. त्यामुळे विजापूरच्या दरबारात शहाजीचे वर्चस्व वाढले. शहाजीमुळे अनेक मातब्बर मराठ्यांना आदिलशाहीच्या दरबारात मानाच्या जागा मिळाल्या. स्वतंत्र वृत्तीचा शहाजी १६२७ मध्ये दक्षिणेतील आणि उत्तरेतील राजकारणात दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. १४ मे १६२७ रोजी मलिक अंबरचा मृत्यू झाला व त्यामुळे निजामशाहीची जबरदस्त हानी झाली. त्याचप्रमाणे २८ ऑक्टोबर १६२७ रोजी मुघल सम्राट जहांगीर मृत्यू पावल्यामुळे दिल्लीच्या सिंहासनावर शहाजहान विराजमान झाला. या दोन घटनांचा उत्तरेतील व दक्षिणेतील राजकारणावर दूरगामी परिणाम झाला. शहाजी जरी आदिलशाहीमध्ये मानाचे स्थान मिळवून होता, तरीपण अंतर्यामी निजामशाहीची त्याला ओढ होती. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशाही पोरकी झालेली पाहून शहाजीचे मन निजामशाहीकडे ओढ घेऊ लागले. अशा परिस्थितीत १२ सप्टेंबर १६२७ रोजी इब्राहिम आदिलशहा मृत्यू पावला. त्याच्या जागी आलेल्या मुहम्मदशहाशी शहाजीचे जमले नाही. त्यामुळे स्वतंत्र वृत्तीच्या शहाजीने १६२८ च्या पावसाळ्यापूर्वी आदिलशाही सोडली आणि निजामशाहीत प्रवेश केला. या सुमारास मुघलांची चाकरी सोडून लखुजी जाधवराव हाही निजामशाहीत दाखल झाला. वास्तविक पहाता लखुजी जाधवराव व शहाजी भोसले हे दोन बलाढ्य सरदार निजामशाहीस मिळाल्यामुळे या राजवटीचा उत्कर्ष होण्याची मोठी संधी प्राप्त झाली होती. परंतु प्रत्यक्ष निजामशाही मध्ये अंतर्गत कटकरी, हेवेदावे इतके वाढले होते की शाही- दरबारात संशयाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्ष निजामशहाला लखुजी १० छत्रपती शिवाजी महाराज