छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 17, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंजाधवारांविषयी संशय व तिरस्कार वाटू लागला. त्यातूनच २५ जुलै १६२९ रोजी लखुजी जाधवराव, त्याची २ मुले अचलोजी व रघोजी आणि नातू बसवंत यांच्यावर निजामशहाने मारेकरी घातले आणि भर दरबारात हत्याकांड घडून आले. हा भीषण प्रकार पाहिल्यानंतर शहाजीला निजामशाहीचा वीट आला आणि त्याने निजामशाही सोडून मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शहाजीचा मनोदय ओळखून बादशहा शहाजहानने शहाजीस पंचहजारी देऊ केली. त्याचा मुलगा संभाजी यालाही दोन हजारी व चुलतभाऊ मालोजी याला दोन हजारी असा सरंजाम देण्याचे मान्य केले अशाप्रकारे शहाजी फिरून मुघलांकडे आला. मुघलांकडे आल्यावर बंडखोर पठाण सरदार दर्याखान याचे पारिपत्य करण्याची जबाबदारी शहाजीवर शहाजहानने सोपविली. या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी जिजाबाई प्रसूत होऊन शिवाजीचा जन्म झाला. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत शहाजीला शिवनेरीवर जाण्याची सवड मिळाली नाही. पावसाळा सुरू झाल्यावर शहाजी शिवनेरीला गेला आणि पुत्रमुख त्याने पाहिले. इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात विशेषतः बालाघाट प्रदेशात भीषण स्वरूपाचा दुष्काळ पडला. समकालीन साहित्यामधून या भीषण दुष्काळाची वर्णन आढळतात. 'बादशहानामा' या ग्रंथात या भीषण दुष्काळाचे तपशीलाने वर्णन आलेले आहे. शहाजी मुघलांकडे गेल्यानंतर निजामशाही जवळजवळ मोडकळीस आली. मलिक अंबरचा मुलगा फतेखान याने निजामशाही सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. उलट कटकारस्थानांना कंटाळून ऑक्टोबर १६३१ मध्ये फतेखानाने निजामशहाला ठार मारले. त्यामुळे निजामशाहीची अवस्था मोठी दयनीय झाली. आता निजामशाही मुघलांच्या आहारी जाणार हे शहाजीच्या लक्षात आले आणि म्हणून कोकणात असलेला निजामशहाचा एक वारस शोधून काढून शहाजीने त्याची प्रतिष्ठापना जुन्नर येथे केली. निजामशाही वाचविण्याचे त्याने प्रयत्न सुरू केले. शहाजीच्या या हालचाली मुघलांना धोकादायक वाटल्या. तरीपण आपण मुघलांशी एकनिष्ठ आहोत असे शहाजी वरकरणी भासवत होता. शहाजीचा स्वतंत्र लढा मुघलांकडे असतांना शहाजीने नाशिक, त्र्यंबक, संगमनेर व जुन्नर हे परगणे आपल्या वर्चस्वाखाली आणून कोकण पर्यंतचा प्रदेश हुकमतीखाली आणला. त्यानंतर शहाजीने स्वातंत्र्य पुकारले. बादशहानाम्यामध्ये असा उल्लेख आहे शहाजीची कामगिरी ११