छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 35, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंआखणी केली. जानेवारी १६६० मध्येच नेताजी पालकरला विजापूरच्या प्रदेशात आक्रमण करण्यासाठी पाठविले. नेताजीने लक्ष्मीश्वरपर्यंत मजल मारून अनेक ठिकाणी खंडण्या वसूल केल्या. याच महिन्यात एक तुकडी शिवाजीने कोकणमध्ये पाठविली. राजापूर बंदरात खानाची काही जहाजे होती. ती ताब्यात घेण्यासाठी या तुकडीची रवानगी करण्यात आली होती. तिसरी स्वारी शिवाजीने स्वतःच्या नेतृत्त्वाखाली काढली. मिरजेपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणून विजापूर दरबारात मोठी खळबळ शिवाजीने उडवली. तेव्हा आदिलशहाने सिद्दी जौहर या बलाढ्य सरदाराची शिवाजीविरुद्ध नेमणूक केली. प्रचंड तयारीनिशी सिद्दी जौहर शिवाजीशी सामना करण्यासाठी निघाला. ती बातमी कळताच शिवाजीने पन्हाळा किल्ल्याचा आश्रय घेतला. तेव्हा मार्च १६६० च्या प्रारंभी सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या किल्ल्याला वेढा घातला. सिद्दी जौहरबरोबर सिद्दी मसऊद, भाईखान आणि अफझलखानाचा मुलगा फाजलखान तसेच बाजी घोरपडे हे नावाजलेले सरदार होते. जौहरचे एकूण सैन्य १५,००० असल्याचा उल्लेख समकालीन इंग्रजी पत्रामध्ये सापडतो. विशेष म्हणजे इंग्रज वखारवाल्यांनी हेन्री रेव्हिंग्टन याला तोफा व दारूगोळा देऊन जौहरच्या मदतीसाठी पाठविले. पन्हाळा किल्ल्यात शिवाजीसमवेत ५- ६ हजार एवढे सैन्य होते. किल्ल्याला वेढा घालून ३ महिने झाले तरी प्रत्यक्ष चढाई जौहरकडून होत नव्हती. पावसाळा तोंडाशी आल्यामुळे सिद्दी जौहर वेढा काढून घेईल असे शिवाजीला वाटत होते. परंतु पावसाळ्यातही वेढा चालू राहिल अशी तजवीज सिद्दी जौहरने करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवाजापुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन मुघलांतर्फे बलाढ्य सरदार शायिस्तेखान हा प्रचंड फौज घेऊन शिवाजीच्या प्रदेशात धुमाकूळ घालून पुण्यापर्यंत येऊन थडकला होता. अशाप्रकारे दुहेरी संकटात शिवाजी सापडला होता. राजमाता जिजाबाईंच्या आज्ञेप्रमाणे नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल यांनी बाहेरून जौहरचा वेढा मोडून काढण्याची शिकस्त केली पण त्यांना यश आले नाही. पन्हाळ्यातून सुटका सिद्दी जौहरशी तहाची बोलणी सुरू केल्यावर वेढ्याला शिथिलता येईल अशी शिवाजीची अटकळ होती आणि वेढ्याला शिथिलता प्राप्त झाल्यावर एखादे अलौकीक साहस करून आपली सुटका करून घेता येईल असा बेत शिवाजीने आखला, जून १६६० च्या अखेरीस शिवाजीने जौहरशी तहाची स्वराज्याचा विस्तार २९