भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 12, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 12

अठरा काढावासा वाटतो, कुणाला त्याच्या भाषासरणीचा अभ्यास करावासा वाटतो, कोणी त्याच्या चरित्रातील ऐतिहासिक प्रसंगांची सत्यता पडताळून पाहात असतात, कोणी त्याच्या अभंगांचा क्रमविकास बसविण्याच्या नादात असतात, कुणाला त्याच्या सगुणभक्तीने चटका लावला असतो, तर कुणास त्याच्या निर्गुणनिराकाराच्या उपासनेची बौद्धिक उंची प्रिय वाटते. कोणी त्याच्या द्वैत अथवा अद्वैत तत्त्वज्ञानाचा शोध घेतात, तर कोणी त्यांना आलेल्या गूढ अशा आध्यात्मिक अनुभूतीची मानसशास्त्रीय चिकित्सा करतात. कोणी त्याच्या आयुष्यातील चमत्कारिक गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, तर कोणी त्याच्या परंपरेचा शोध घेतात. कोणी त्याच्या नावाविषयी, गावाविषयी, जन्मशकाविषयी, जातिविषयी, व्यवसायाविषयी, शिक्षणाविषयी, गुरुपरंपरेविषयी, त्याच्या नामदेवाच्या प्रेरणेविषयी, त्याच्या सदेह वैकुंठगमनाविषयी उत्सुकतेने चर्चा करीत असतात. कोणत्या का होईना, पण एखाद्या बलवत्तर अशा कारणाने देहूच्या या भगवद्भक्ताने सर्वांच लक्ष आपणाकडे वेधून घेतलं आहे खास. 'धन्य देहू गाव' तुकोबांच्या या लोकप्रियतेचे व त्याच्या अभंगवाणीच्या यशाचे नेमके गमक कोणते ? त्याच्या आयुष्यातील मुख्य प्रेरणा कोणत्या ? त्याच्या जीविताचा क्रमविकास व त्याच्या मानसिक अवस्थांची श्रेणी याचा काही संबंध जुळविता येतो का ? प्रथम आपण तुकोबांच्या घरच्या किंवा घराण्याच्या काही प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करू. तुकारामबुवांनी आपल्या गावाचे वर्णन 'धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग' या अभंगात विस्ताराने केले आहे. तेथील श्रीविठ्ठल, रखुमाई, इंद्रायणी- तीर, हरेश्वर, गरुड, हनुमंत, लक्ष्मीनारायणाचे मंदिर, इत्यादी खुणा तुकाराम महाराजांनी या अभंगात दिलेल्या आहेत. 'पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास जन्म घेती' असे दुसऱ्या एका अभंगात त्यांनी हरिदासाच्या, भक्ताच्या जन्मभूमीचे व कुळाचे माहात्म्य वर्णन केले आहे. 'माझ्या वडिलांची मिरासी' या पवित्र भूमीत एका प्रतिष्ठित व विठ्ठलभक्तिसंपन्न अशा कुळात तुकोबांचा जन्म झाला. तुकोबांनी आपल्या कुळाची थोरवी अनेकदा वर्णन केलेली आहे 'शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं' असे त्यांनीच एका अभंगात म्हटल्याप्रमाणे अतिशय शुद्ध अशा कुळात हे भक्तीचे रसाळ व गोमटे असे फळ निर्माण झाले. यांच्या घराण्यातील आठवे पूर्वज विश्वंभरबाबा हे मोठेच विठ्ठलभक्त होते. त्यांच्याच वेळेपासून या गावास क्षेत्राचे महत्त्व प्राप्त झाले असावे. याच विश्वंभरबाबांनी देहूस विठ्ठलाचे मंदिर बांधले. त्यात विठ्ठलमूर्तीची स्थापना केली. अशी ही विठ्ठलपरंपरा तुकोबांच्या वंशाची मिरासदारी आहे. 'विठ्ठल कुळींचे दैवत', 'आदि तो हा देव कुळपूज्य', 'सहज वडिला होती सेवा । म्हणोनि पूजितों या देवा' असे तुकोबांनी आपल्या कुळाच्या दैवताचे वर्णन केले आहे. 'पंढरीची वारी आहे माझ्या घरीं' म्हणून त्यांनी सर्व अभिमानानं उल्लेख केलेला आहे. 'तुका म्हणे संत सेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा' अशा आपल्या आनुवंशिक ठेव्याचे वारंवार वर्णन तुकारामबुवांनी केले आहे. 'व्रत एकादशी करोन उपवासी । गाईन अहर्निशीं मुखीं नाम' अशा भाषेत तुकोबांनी आपल्या घराण्याच्या पवित्र परंपरेचा उल्लेख केलेला आहे. या पावन कुळातील भक्तिपरंपरेचा संस्कार तुकोबांच्या मनावर झालेला असावा. सुस्थितीचा संसार तुकाराम महाराजांच्या घरी महाजनकी होती. थोडी सावकारकी असावी. त्यांच्या घराण्याचा व्यवसाय वैश्याचा, वाण्याचा. तेव्हा घरी दुकानदारी व व्यापार या गोष्टी ओघाने आल्याच. तुकाराम- बुवांचे लक्ष प्रथमपासूनच या व्यवसायात बऱ्यापैकी असावे. आईवडिलांच्या सुखद छायेत बाळपणही सुखाचे गेले असावे. टिपऱ्या, चेंडू, मृदंगपाटचा, हुतूतू, हुबरी, विटीदांडू, कुरघोडी इत्यादी खेळांची त्यांनी