सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 41, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १५ तू भक्तीच माग आणि मोठ्या विश्वासाने व भावनेने त्याच्याशी प्रीती जडीव ३ मना, हा हाच एक निर्धार तू दिवसेंदिवस पक्का करावांस हा एक विचार तुला सांगतो ४ ३३ सावध जालों सावध जालों । हरिच्या आलो जागरणा ॥ १ ॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ २ ॥ पळोनिया गेली झोप । होते पाप आड तें ॥ ३ ॥ तुका म्हणे तया ठाया । ओल छाया कृपेची ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागरणा-देवासाठी केलेले जागरण, भजन, कीर्तन, भार-समुदाय, ओल-दाट अर्थ - परमेश्वराच्या कृपेने मी सावध झालो व हरीच्या भजनकीर्तनात मग्न झालो १ त्या ठिकाणी विष्णूभक्तांचे समुदाय मोठमोठ्याने हरिनामाची गर्जना करीत होते २ ते पाहून माझी झोप पळून गेली व जे काही थोडे पाप होते तेही संपले ३ तुकाराम महाराज म्हणतात त्याच ठिकाणी दाट कृपेची छायाही निर्माण झालेली असते ४ ३४ आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥ १ ॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ २ ॥ गीता भागवत करितो श्रवण । १आणीक चिंतन विठोबाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या देवा पार नाहीं ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जागता-सावध, हरिख-हर्ष, आनंद, पार-अंत, शेवट, तुलना अर्थ - आपले श्रेष्ठ हित कशात आहे हे जो जाणून आहे, म्हणजे ईश्वराच्या मोठेपणाची जाणीव ज्यास आहे त्याचे आईबाप त्याला प्रसवून धन्य झाले आहेत १ ज्याच्या कुळात सात्त्विक विचाराचे कन्यापुत्र निर्माण होतात त्याबद्दल प्रत्यक्ष ईश्वरासही हर्ष होतो २ जेथे अखंडपणे भगवद्गीता व भागवत याचे वाचन व श्रवण चालत असते आणि जेथे सतत चिंतन विठ्ठलाचे असते, ३ तेथील लोकांची सेवा मला घडली तर मग माझ्या देवास कसली तुलनाच राहणार नाही, एवढे दैव मोठे माझे होईल ४ ३५ अंतरोंची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥ १ ॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ २ ॥ आपुल्या वैभवे । शृंगारावे निर्मळ ॥ ३ ॥ तुका म्हणे जेवी सवे । प्रेम द्यावे प्रीतीचे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंतरोंची-मनातील, गोडी-किंमत, सोयरा-नातेवाईक, शृंगारावे-सुशोभित करावे अर्थ - ईश्वर आपल्या भक्ताच्या अंतःकरणातील गोडी चाखीत असतो, त्याच्या हृदयात भावना कोणती असते हे तो पाहतो १ खरोखरच देव हा एकच खरा आपला आप्त आहे दीन दुबळ्याचा तोच नातेवाईक नव्हे काय ? २ तो आपल्या सामर्थ्याने आपल्या भक्तास निर्मळपणे सुशोभित करतो ३ इतकेच नव्हे तर तुकाराम महाराज म्हणतात की तो सोयरा ईश्वर आपल्या भक्ताबरोबरच जेवण करतो, व आपले स्वतःचे प्रेमही त्याला देतो ४ ३६ सुखे वोळव दावी गोहा । माझें दुख नेणा याहा ॥ १ ॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय फंसा म्हणे भेडा ॥ २ ॥ निपट मज न चले अन्न । पायली गहू साजा तीन ॥ ३ ॥ गेले वारीं तुम्हीं आणिली साखर । सातदीं² गेली साडेदहा शेर ॥ ४ ॥ १ अखंड २ सात दिवसा दाहा शेर