सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 40, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१४ सार्थ तुकारामगाथा २९ त्याचे सुख नाहीं आले अनुभवा । कठिण हे जिवा तोचिवरी ॥ १ ॥ मागिलाचे दुःख लागो नेदी अगा । अंतर हे सगा नेदी पुढें ॥ २ ॥ तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नेदी-देत नाही, सगा-भगतीस, श्रुति-वेद अर्थ - जोपर्यंत त्या परमपुरुषाच्या सहवासाचे सुख अनुभवास आले नाही तोपर्यंतच जिवाला हा मार्ग भारी कठिण वाटतो १ पण एकदा त्याची भेट झाली म्हणजे मग मात्र मागचे दुःख जाणवत नाही, आणि जे संगतीचे सुख मिळेल त्यात अंतरही पडत नाही २ तुकाराम महाराज म्हणतात की हा परमपुरुष सर्वांना संपन्न असाच असून त्याचाच महिमा सर्व वेदांनी जाणून गाइला आहे ३ ३० न राहे रसना बोलता आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मने ॥ १ ॥ मानेल त्या तुम्ही अइका स्वभावे । मी तो माझ्या भावे अनुसरले ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्हीं फिरावे बहुतों । माझी तो हे गती जाली आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - रसना-जीभ वाणी आवडी-प्रेमाने अर्थ - बाबांनो, त्या श्रेष्ठ पुरुषाविषयी बोलताना प्रेमामुळे माझ्या वाणीला भान राहात नाही माझ्या मनाने तर त्याच्याच पायावर बुडी दिलेली आहे १ तुमचा जसा स्वभावविशेष असेल त्याप्रमाणे तुम्ही एकावे, मी मात्र माझ्या स्वभावानुसार त्याला अनुसरले आहे २ तुकारामबुवा म्हणतात, बाबांनो तुम्ही आता मागे फिरावे हे बरे माझी तर आता ही अशी गत होऊन गेली आहे ३ ३१ न बोलता तुम्हा कळो न ये गुज । म्हणउनी लाज सांडियेली ॥ १ ॥ आता तुम्हा पुढे जोडीतसे हात । नका कोणी अत पाहो माझा ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी । करील ते हरी पाहो आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - गुज-गुपित गोष्ट सांडियेली-सोडली अर्थ - बाबांनो, मी ही माझ्या मनातील गुपित गोष्ट जर बोलले नसते तर तो तुम्हास समजली नसती, म्हणून तर लाज सोडून मी ही तुम्हास सांगितली १ पण आता मात्र मी तुमच्यापाशी हात जोडून विनवणी करीत आहे की आता माझा अंत कोणी पाहू नका २ तुकारामबुवा म्हणतात, आम्ही आता त्याच्या शेजारी सुखाने बसलो आहोत, आता तो श्रीहरी जे करील ते आम्ही पाहू ३ विवरण - येथ विराण्यांचे पंचवीस अभंग संपले अत्यंत तीव्र अशा अनुभूतीच्या प्रकटीकरणासाठी तुकाराम महाराजांनी ही अशी शृंगारिक भाषा वापरली असली तरी त्यातील रूपक एकदा ध्यानात आल्यावर मग मथितार्थ सरळपण ध्यानात येण्याजोगा असतो ३२ नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाही देवे ॥ १ ॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येईल तैसा बोल रामकृष्ण ॥ २ ॥ देवापाशीं मागे आवडीची भक्ति । विश्वासेसीं प्रीति भावबळें ॥ ३ ॥ तुका म्हणे मना सांगतो विचार । धरावा निर्धार दिसेदिस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - सुस्वर-गोड आवाज, निर्धार-निश्चय अर्थ - तुकारामबुवा आपल्या मनास उपदेश करीत आहेत की मना, तुला मधुर शब्दांनी परमेश्वराचे स्तवन करता येत नसेल, कारण तसा गोड आवाज तुला मिळाला नसेल १ पण ध्यानात ठेव की ईश्वर काही त्याच्यासाठी भुकेलेला नाही तुला जसे येईल तसे 'रामकृष्ण रामकृष्ण' असे म्हण २ देवापाशी मोठ्या प्रेमाने