सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 39, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा १३ २५ परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावे सीस ॥ १ ॥ संसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुतें पाहू नये ॥ २ ॥ तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई १ ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सीस-डोके, मागुतें-मागे अर्थ -त्या श्रेष्ठ पुरुषाच्या, परमेश्वराच्या सहवासाचे सुख भोगावयाचे असेल तर तळहातावर शीर घेऊनच जावे लागते, म्हणजे जिवावर उदार व्हावे लागते १ आपल्या हाताने आपल्या संसाराला आग लावावी लागते, संसारसुखावर पाणी सोडावे लागते, पुन त्याच्याकडे मागे वळूनही पाहू नये २ तुकाराम महाराज म्हणतात की दिव्यावर झेप घेणारा पतंग जसा जिवावर उदार होऊन झडप घालतो त्याप्रमाणे या मार्गातील लोकांनी धीट व्हावयास हवे ३ २६ आइकाल परी ऐसे नव्हे ताई । न सडा या सोई अंतराची ॥ १ ॥ नव्हे आराणूक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले तें ॥ २ ॥ तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -न सडा-सोडू नका, आराणूक-तृप्ती, संतोप, गोविले-गुंतवून ठेविल अर्थ -बापानो, तुम्ही माझे म्हणणे ऐकाल, पण त्याप्रमाणे वागणे तुमचे किती होईल कुणास माहित ? पण तुम्ही या परमश्रेष्ठ संतांची संगत मात्र सोडू नका १ आणि लक्षात असू द्या की या लौकिक संसारापासून कसलाच संतोप तुमच्या मनास लाभणार नाही, पण आपले आपणच त्या संसारात गुंतून राहिलेले असतो २ तेव्हा मन जरा कठिण करा व ज्याचे मन असे कठिण होईल तेवढयाच माझ्या मार्गाने या ३ २७ आहाच वाहाच आत वरी दोन्ही । न लगा गडणी आम्हा संशा ॥ १ ॥ भेऊ नये तेथें भेडसावू कोणा । आवरूनि मना बद द्यावा ॥ २ ॥ तुका म्हणे काही अभ्यासावाचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - आहाच-आत वाहाच-बाहेर, गडणी-सावतीण, मैत्रिण, बद-बंदी, वायूचा निरोध करण्याची योगमार्गातील एक प्रक्रिया, अर्थ -आत मनात एक व बाहेर तोंडात एक अशा मैत्रिणी आम्हांस नकोत १ आमच्या मनात कसलेच भय नसते, मग आम्ही तरी इतरांना कसे दाखवू ? तुम्हीही आपले मन आवरून बदिस्त करून ठेवा २ आणि लक्षात असू द्या की कोणत्याही गोष्टीचा चांगला अभ्यास असल्यावाचून काही साध्य होईल असे नसते ३ २८ बहुताच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥ १ ॥ विचार करिता वाया जाय काळ । लटिकॆ ते मूळ फजितीचे ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊ वाटा आमुचिया ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - लटिकॆ-बाट, घटापटा-व्यथ खटपट घटाबादा म्हणजे आकाश बस कवडे, तर घटाच्या आकारात सामावलेले पट म्हणजे वस्त्र व त्यास ततू याच्या सवधावरून ईश्वर व जगत याच्या सवधाचे वगन करण्याची जी वेदान्ताची परिभाषा ती या पटपटादी खटपटीवरून प्रकट होते अथ -आम्ही काही पुष्कळ लोकाच्या मतांना मानणार नाही, कारण प्रत्येकाची भावना कशी वेगळी असेल याचे काय सागावे ? १ याबद्दल जो जो विचार करावा तो तो वेळ मात्र वाया जातो असे दिसते व ही चर्चाच व्यर्थ असून तोमुळे फजिती मात्र पदरी येते २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही वाटल्यास ही घटपटादी खटपट करा खुशाल, पण आमच्या वाटेस मात्र कोणी जाऊ नका ३ १ दीपावरी