सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 38, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१२ सार्थ तुकारामगाथा मानणार ? २ तुकाराम महाराज म्हणत आहेत की माझ्या चित्तात आता अनंतस्वरूपाचा परमेश्वर बसलेला असल्यामुळे मला आता नित्य व अनित्य यांतील भेदही दिसेनासा झाला आहे ३ २१ सांगतो ते तुम्हीं अइकावे कानीं । आमुचे नाचणी नाचू नका ॥ १ ॥ जोवरी या तुम्हा मागिलाची आस । तोवरी उदास होऊ नका ॥ २ ॥ तुका म्हणे काय वायाविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -नाचणी-नादाने, मागिलाची-संसाराची लौकिकाची, आस-इच्छा धिंद-फजिती अर्थ -बायानो, मी सांगते ते तुम्ही आपल्या कानांनी नीट ऐका-माझ्या नादी काही केल्या तुम्ही सांगू नका १ कारण जोपर्यंत तुम्हांला लौकिक संसाराची जबर हाव आहे तोपर्यंत उदास होऊन वैराग्याचा आव आणू नका २ तुकाराम महाराज म्हणतात की अशामुळे काहीच पदरी न पडता तुमची फजिती मात्र होईल इकड़ेही पतीची मर्जी पालवून बसाल व तिकडे परमेश्वरासही मुकाल ३ २२ आजिवरी तुम्हा आम्हा नेणपण । कौतुके खेळणे सग होता ॥ १ ॥ आतां अमावर जाले अगुणाची । करू नये तेचि करों सुखें ॥ २ ॥ तुका म्हणे आता बुडविली दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -नेणपण-अज्ञान, सग-सोबत अगुणाची-निर्गुणाची अर्थ -आजपर्यंत तुम्ही व आम्ही अज्ञानाने लौकिक प्रपंचासच महत्त्व देऊन कौतुकाने खेळ एकमेकांच्या संगतीने खेळलो १ आता मात्र सर्व गुणाचा त्याग करून मी त्या निर्गुण परमेश्वराशी लीन झाले, आणि करू नयेत ते खेळ सुखाने करण्यासाठी तत्पर झाले २ तुकारामबुवा म्हणतात आता मी दोन्ही कुळे सासरची व माहेरची बुडवून एक नारायणास मात्र हृदयात स्थान दिले आहे ३ २३ सासुरिया वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावेचि ॥ १ ॥ साडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगू आता ॥ २ ॥ न व्हावी ते जाली आमुची भडाई । तुका म्हणे काई लाजो आता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -साडवर-नवरा टाकलेली स्त्री भडाई-अपकीर्ती अर्थ -माझ्या सासुरवाडीस असे घडले की माझ्या पतीसच माझा वीट आला, आणि माहेरास तर दिलेली मुलगी दुसऱ्याचीच या भावनेने अलिप्तपणा सहजच होता १ आता या नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीस कोण आधार देणार ? जे काय व्हायचे नशिबात असेल ते भोगू आता २ दोन्ही ठिकाणी भांडणे होऊ नयेत, ती माझी झाली खरी, आता त्याबद्दल लाज धरण्यात काय अर्थ आहे ? ३ २४ मरणाही आधीं राहिलो मरोनी । मग केलें मनीं होते तैसे ॥ १ ॥ आता तुम्ही पाहा आमुचे नवल । नका वेचू बोल वायाविण ॥ २ ॥ तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी । कैसी सग सरी तुम्हा आम्हा ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -वायाविण-व्यर्थ अर्थ -मरणाचे दुःख मी याच जन्मी जगू भोगले आहे प्रत्यक्ष देहत्यागापूर्वीच ती अवस्था या देहधारी अवस्थेतही आम्ही भोगत आहोत माझा संपूर्ण पालट झाला आहे, मग जे माझ्या मनात होते ते मी करीत राहिलो. १ आता तुम्हीच आमच्या आयुष्यातील नवल पाहा उगाच व्यर्थ वचन मात्र अर्थशून्य बोलू नका २ तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सर्व बायका भयभीत आहात, तुम्हांला लौकिकाची आशा सुटलेली नाही तेव्हा तुमच्या- आमच्या संगतीची बरोबरी कशी होणार ? होणार नाहीच ३