सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 37, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ११ शब्दार्थ व टीपा:- जाळ-जाळे, सांडियेले-सोडले, भरतार-पती, परपुरुष-श्रेष्ठ परमेश्वर अर्थ-आता मी सर्व सुखे नेहमीच भोगीन. मी सर्व मायापाश व नात्याची जाळी तोडून टाकली आहेत. १ या प्रभूसाठी मीं माझ्या पतीसही सोडले. मी या श्रेष्ठ परमेश्वराशी रममाण झाले आहे. २ त्यामुळे आता मला पुनः गर्भवासाची यातना राहणार नाही; आता प्रभुप्राप्तीचे औषध असेच केले आहे की जे फळ धरूच देणार नाही. पुन: लौकिकाची आशाच उरणार नाही. ३ १७ एका जिवें आतां जिणें जालें दोन्हीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥ १ ॥ नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥ २ ॥ तुका म्हणे जाले सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेगळीक-वेगळेपणा, भाक-वचन, इच्छा. अर्थ:-आता माझे व श्रीहरीचे अशी दोनही जीविते एकच झाली आहेत. आता वेगळेपणा असा काही उरलाच नाही. १ मी व नारायण यांच्यात आता निराळेपणा नाही. त्याला मी आर्त्त होऊन हाक मारली; तो मला मिळाला, माझी इच्छा त्याने पुरी केली व मला जवळ करून सांभाळले. २ माझ्या थोड्याफार परिश्रमाचे मला हे फळ मिळाले; आता ती दुजेपणाची वेळ संपली. ३ १८ हासों रूसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट तें ॥ १ ॥ सेवासुखें करूं विनोदेवचन । आम्ही नारायण एकाएकीं ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा:- आवडी-प्रेम, अंतरींची-मनाची. अर्थ : आता आम्ही हसू, एकमेकांवर रुसू व यातून प्रेमाची वाढ करू. मनातील अवीट गोडी चाखून एक- मेकांची सेवा करू. १ काही विनोदवचनांनी संभाषण करू. आता मी व नारायण हे एकच आहोत. २ मी आता या लौकिक जगाविषयी उदासीन झाले आहे. कारण मी हा श्रेष्ठ ईश्वर पती म्हणून केला असून मी त्याला स्वतःच्या आधीन करून ठेवला आहे. ३ १९ मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयांनो ॥ १ ॥ न साहवे तुम्हां या जनाची कूट । बोलती वाईट ओखटें तें ॥ २ ॥ तुका म्हणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळियासवें आम्ही ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- न साहवे-सहन होत नाही, कूट-निंदा, ओखटें-वाईट, अमंगल, विचरों-हिंडत राहू अर्थ - आपल्या मागे मागे येणाऱ्या सांसारिक व लौकिकावर दृष्टी ठेवणाऱ्या स्त्रियांना उद्देशून तुकाराम महाराज म्हणत आहेत; आता तुम्ही कोणी माझ्याबरोबर येऊ नका. बायांनो, तुम्ही सर्वजण सासुरवासिनी आहात. १ तुम्हांला हे लोक निंदात्मक शब्द बोलतील ते सहन होणार नाहीत कारण ते लोक फार वाईट व अमंगल असे बोलतात. २ पण मी मात्र सर्व लौकिकापासून मोकळी व विरक्त झाली असल्यामुळे या गोपाळकृष्णाबरोबर मी वाटेल तशी वागू शकते. ३ २० शिकविले तुम्हीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥ १ ॥ प्रसंगीं या नाही देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥ २ ॥ तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - नित्य-अक्षय, कायम टिकणारे, अनित्य-क्षर, नाश होणारे अर्थ.-लौकिक संसाराविषयी तुम्ही मला जे शिकविले ते श्रीहरीशी माझा वियोग जोपर्यंत होता तोपर्यंतच मला पटत होते. १ आता या ऐक्याच्या भावनेत देहाची देखील शुद्ध आम्हास नाही; तेथे तुमचे वचन आता कोण