सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 36, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें१० सार्थ तुकारामगाथा १२ न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥ १ ॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥ २ ॥ आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : नाइकें-ऐकणार नाही. अर्थ : मी आता दुसरे काहीच पाहणार नाही, बोलणार नाही; आणि ऐकणार नाही; कारण माझ्या चित्तात आता एक श्रीहरी स्थिर झाला आहे. १ सासरी व माहेरी आता मला माझे म्हणून कोणी नाही; श्रीहरीच्या रूपात मी दोन्हीचे एकच स्वरूप मानले आहे. २ मीच भांडखोर म्हणून मजवर आळ आलेला होता; पण आता त्या प्रभूंसच मिळवून मी सर्वांवर मात केली आहे. ३ १३ दुजा ऐसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासुनिया ॥ १ ॥ बळियाच्या आम्ही जालों बळिवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥ २ ॥ तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिका गोविंदोसी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : दुजा-दुसरा, प्रीतिका-प्रीति करणाऱ्या अर्थ अनंत स्वरूपाच्या असणाऱ्या या हरीवाचून आता दुसरा कोणी बलवान आहे ? १ आणि या बलवंताच्या प्राप्तीमुळे आम्हीही बलवान झालो असून आमची सत्ता आता सर्वांवर राहील. २ तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मूळचेच अतःकरणाने उदार आहोत; म्हणूनच गोविंदास प्रेम करून आम्ही जवळ करू शकलो. ३ १४ क्षणभरी आम्हीं सोसिलें घाईट । साधिलें अवीट निजसुख ॥ १ ॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखाचिया ॥ २ ॥ तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : अवीट-वीट किंवा, कंटाळा न येणारे, निजसुख-मोक्षाचे सुख, साडीमांडी-टाळणे, पुन. घेणे, भरोवरी-श्रम, कष्ट अर्थ : लोकांच्या दृष्टीने मी त्याची निंदा क्षणभर सहन केली; पण त्या योगाने ज्याचा कधी कंटाळा येणार नाही असे मोक्षसुख मी मिळविले. १ पूर्वायुष्यात अनेक प्रकारची यातायात केली. अनेक गोष्टी टाळल्या. पुनः घेतल्या. सुखप्राप्तीसाठी अनेक परिश्रम घेतले, पण ते सर्व मला अधिकच दुःखाचे झाले. २ पण आता या अनंत स्वरूपाच्या प्रभूशी लीन झाल्यामुळे, पायांशी राहिल्यामुळे जाणेयेणे अथवा त्यातील कष्टच संपून गेले. ३ १५ आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥ १ ॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आम्हांसवें सर्व भोगी ॥ २ ॥ तुका म्हणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा : दुजें-दुसरे, एकविध-एकनिष्ठ, अंगसंग-शरीराची जवळीक, शरीराचा भोग. अर्थः-आता मला कोणी वडील, कोणी धाकटे नाही. मीच मला वडील आहे व धाकटीही आहे. आता माझ्या मागाहून येणारे कोणी नाही ; पुढेही आलेले कोणी नाही. १ आता मला चांगला एकांतही मिळतो, तेव्हा एकनिष्ठ भावनेनेच मी राहतो व तो श्रीहरी माझयारोबर सर्व प्रकारच्या क्रीडा करतो. २ आमच्या दोघां- शिवाय दुसरे तेथे कोणीही नसते ३ १६ सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥ १ ॥ याचसाठीं सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषासीं ॥ २ ॥ तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥ ३ ॥