सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 35, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ९ शब्दार्थ व टीपा -आधिच्या-पूर्वजन्मीच्या, भ्रतारें-पतीकडून, रातले-रममाण झाले अर्थ -पूर्वजन्मीच्या माझ्या पतीकडून माझी इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मी आज या वरवर गैर वाटणाऱ्या आचरणास प्रवृत्त झाले आहे १ तो धोंहोरो मला आता रात्रंदिवस माझ्याजवळ हवा त्याच्याशिवाय मला एक क्षणभरही करमणार नाही २ आता माझ्यादाद्दलची सर्व आशा सोडून द्या, कारण तुकारामबुवा म्हणतात की मी आता अनंताशी रममाण झाले आहे ३ विवरण - वरवर शृंगारात्मक दिसणाऱ्या या अभंगाच्या निमित्ताने तुकाराम महाराजानी आपण आता परमेश्वराशी रममाण झालेलो असल्यामुळे आपली आशा आता लोकांनी सोडून द्यावी असे विनविले आहे ९ हाचि नेम आता न फिरे माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥ १ ॥ घररिघी जाले पट्टराणी बळें । वरिले सावळें परब्रह्म ॥ २ ॥ वळियाचा अगसंग जाला आता । नाही भय चिंता तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -घररिघी-स्वत होऊन घरात शिरणारी, पट्टराणी-मुख्य आवडती राणी, वरिले- स्वीकारिले, वळियाचा-बलवानाचा, समर्थाचा, अगसंग-संबध अर्थ -मी आज श्रीप्रभुशेजारी बसले असल्याने तेथून आता माघारी फिरणार नाही, हाच माझा निश्चय झाला आहे १ मी आता त्या सावळ्या परब्रह्मास वरले असल्यामुळे मी त्याची पट्टराणी झाले आहे मी स्वतः होऊन त्याच्या घरात शिरले आहे २ आता माझा संबंध बलवंताशी झालेला आहे त्यामुळे मला कुठलीच भीती किंवा चिंता उरली नाही ३ १० नाही काम माझें काज तुम्हासवे । होते गुप्त ठावे केले आता ॥ १ ॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सरती लोकांमाजी जाले ॥ २ ॥ न धरावा लोभ काहीं मजविशीं । जाले देवपिशी तुका म्हणे ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा -काज-काय, सरतो-मान्य, देवपिशी-देववेडी अर्थ -भोवतालच्या लोकांना उद्देशून तुकारामबुवा म्हणत आहेत की, माझे आता तुमच्या बरोबर, काही काम उरलेले नाही आजवर माझा गुप्त संबंध ईश्वराशी होता तो आता तुम्हा सर्वांना माहित झाला आहे १ माझे हे निंद्यकर्म तुम्हास ठाऊक झाले आहे त्यामुळे माझे आचरण तुम्हास मान्य नाही २ तरी तुम्हीही आता माझ्या- विषयी कसलाच लोभ धरू नये, मी आता पक्की देववेडी झाले आहे ३ ११ विसरले कुळ आपुला आचार । पती भाये दीर घर सोय ॥ १ ॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त माझें ॥ २ ॥ मज आता कोणी आळवाल क्षणी । तुका म्हणे कानीं बहिरी जाले ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - सांडिला-सोडिला, रातले-रममाण झाले, क्षणी-कवां अर्थ -मी आता आपले कुलशीलही विसरून गेले असून माझे घर, सोयरे, दीर, पती इत्यादींनाही मी विसरले आहे १ मी या जगातील रोजचा सर्व व्यवहार सोडून दिला असून मला आता कसलीच भीती व चिंता उरलेली नाही माझे चित्त आता त्या अनंताशी रमले आहे २ आता मी परत संसारात किंवा लौकिक व्यवहारात गुंतावे म्हणून कुणी मला आळवू नये तुकाराम महाराज म्हणतात, मी आता दोनही कानांनी बहिरीच झाले आहे ३ तु गाथा २