सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 34, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें८ सार्थ तुकारामगाथा विराण्या-अभंग ७ वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥ १ ॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥ २ ॥ नाइके वचन बोलतां या लोका । ह्मणे जालो तुका हरिरता ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- वाळो-वाळित टाकोत, दूर करोत, शिंदळी-दुराचारी, वाईट चालीची स्त्री, न विसंबे-विश्वास ठेवीत नाही, लौकिक-या जगातील, हरिरता-परमेश्वराशी समरस झालेली अर्थ :- सर्व लोकांनी जरी मला दूर केले किंवा माझ्यावर बहिष्कार टाकला व मला दुराचारी स्त्री म्हटले तरी या त्यांच्या म्हणण्यावर हा वनमाळी श्रीविठ्ठल विश्वास ठेवणार नाही १ मी सर्व लौकिक म्हणजे या जगातील व्यवहार सोडून उदास झाले आहे मला त्यामुळे कसलेच भय उरलेले नाही, अथवा जीवन जगण्याची आशाही उरलेली नाही २ म्हणून या लोकांनी काही जरी कटु शब्दांनी मला म्हटले तरी मी ते आता ऐकणार नाही, कारण मी आता पूर्णपणे एका ईश्वराशीच समरस झाले आहे असे तुकाराम महाराज म्हणतात ३ विवरण - येथून पुढले पंचवीस अभंग 'विरहिणीचे अभंग' अथवा 'विराण्या'चे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत परमेश्वराशी संपूर्ण ऐक्य जे अनुभवास आले त्याचे वर्णन करताना साधुसंत अनेक प्रसंगी नाइलाज म्हणून व्यावहारिक प्रेमाचा, पतिपत्नीचा किंवा कधी प्रियकर-प्रेयसीचा दृष्टान्त घेऊन आपले मनोगत व्यक्त करतात पति-पत्नी किंवा प्रियकर-प्रेयसी या नात्यातील तीव्रताच फक्त त्यांना अपेक्षित असते पतीची वा प्रियकराची वाट पाहण्यात, त्याचे स्मरण करण्यात, त्याचा ध्यास लावून घेण्यात, त्याच्याबद्दल तळमळण्यात अपार सुख पत्नीस वा प्रेयसीस होते प्रत्यक्ष मीलनातील आनंदापेक्षाही विरहातील आर्तता अधिक तीव्र, स्मरणाची जाणीव अधिक तीव्र, रूपचिंतनाची माधुरी अधिक चविष्ट असल्यामुळे भक्तीच्या क्षेत्रात या विरहाला मीलनापेक्षाही फार महत्त्व असते मीलनात किंवा अद्वैतानुभूतीत भोगसुख नाही सर्वच एक अशी अनुभूती आल्यावर कोण कुणाचे स्तवन करणार ? कोण कुणावर लटके रागावणार ? कोण कुणाचे भजन करणार ? म्हणूनच कित्येक ठिकाणी 'अद्वैतीं तो नाही माझें समाधान' यासारखे उद्गार साधुसंत काढतात ज्ञानाच्या भूमिकेवर वा तात्त्विक भूमिकेवर अद्वैत, पण भोगासाठी किंवा अद्वैताच्या अनुभवासाठी द्वैत भक्तीत पत्करावे लागते आणि या द्वैतात विरहाला फार मोठे स्थान आहे स्वत:स पत्नी वा प्रेयसी समजून साधु- संतांनी आपले जे अनुभव प्रकट केले आहेत त्यातील माधुरी अवीट आहे यातील शृंगारिक अर्थ वरवरचा असून त्याचा संबंध केवळ भाषेपुरता किंवा दृष्टान्तापुरताच आहे शृंगाराचे वरवरचे रूप असणाऱ्या या भक्तीच्या विशिष्ट प्रकारास 'मधुरा भक्ती' असे नाव असून त्यास शास्त्रकारांनी मान्यता दिलेली आहे नारदभक्तिसूत्रात भक्तीचे अकरा प्रकार सांगितले आहेत त्यात कांतासक्ती म्हणून एका विशेष प्रकाराचा उल्लेख आलेला आहे नारदांनी श्रेष्ठ भक्तीचा हाच आदर्श सांगितला आहे भगवंताला सर्वस्व अर्पण करणे, (तदर्पिताखिलाचारता), त्याच्या विस्मरणाने व्याकुळ होणे (तद्विस्मरणे परम- व्याकुलतेति) हीच नारदाच्या मताने खरी भक्ती होय गोकुळातील गोपींनी याच प्रकारची भक्ती केली असून त्यांचाच आदर्श नारदांनी मान्य केला आहे (यथा व्रजगोपिकानाम्) त्यांच्या मते भक्ती ही मुख्यतः प्रेमरूपच आहे (परमप्रेमरूपा) भगवान शांडिल्य यांनी प्रेममय भक्तीचाच पुरस्कार केलेला आहे (सा परानुरक्तिरीश्वरे) रूपगो- स्वामी, जीवगोस्वामी यांनी या भक्तीचे शास्त्रीय स्वरूप 'भक्तिरसामृतसिंधु', 'उज्ज्वलनीलमणि' यासारखे ग्रंथ लिहून सिद्ध केले आहे ८ आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकियें ॥ १ ॥ रात्रदिस मज पाहिजे जवळि । क्षण १त्यानिराळी न गमे घडी ॥ २ ॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आता । रातले अनंता तुका ह्मणे ॥ ३ ॥ १ क्षण एव निराळी