सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 434, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें३९६ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा :- वान-पदार्थ, वस्तू, बरेवोजा-चांगल्या प्रकाराने. अर्थ :- श्रीकृष्णाच्या रूपाचे कृष्णांजन माझ्या डोळ्यांत घातलेले असल्याने ते मोठे सोवळ व निमंळ बनले आहेत. १ परमेश्वराचा निरोप सांगण्यासाठी म्हणूनच मी खटपट करीत आहे त्या नारायणाने त्याचा हा निरोप गोड करून मला सांगितला आहे. २ जे भाग्यवत आहे, ते त्यांच्या घरी विश्वासाने चाकरी केल्यास मनासारखे कार्य साधते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकाराने पोटही चांगले भरते व आपल्या स्वामी आपल्याला आश्रय आपोआप मिळतो. ४ ८४२ मंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥ १ ॥ पुढें नाडियेलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ २ ॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टीं येधीताहे ॥ ३ ॥ वैकुंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥ ४ ॥ पुंडलिकाँ थारा । देउनि आणिले या चोरा ॥ ५ ॥ तुका म्हणे चला । तुम्ही आम्ही धरूं त्याला ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा :- मंद-ढोंगी, कपटी ( लटक्या अर्थाने ), नाडियेले-फसविले, पेणें-मुक्काम. अर्थ :- प्रेमाचा पाश हातात घेऊन हा ढोंगी श्रीहरी पंढरपुरास येऊन स्थिर झाला आहे. १ याने नंतर जगातील अनेकांना फसविले. काही मागमूस लागणार नाही अशा ठिकाणी हा लबाड घेऊन जातो. २ दोन्ही हात उभारून केवळ दृष्टीनेच वेधून हा आपणाकडे सर्वांना आकर्षित करून घेतो. ३ पुंडलीक भक्ताने या चोरास आश्रय देऊन या स्थानावर स्थिर केले आहे. ४ या पंढरपूरच्या लोभासाठी या श्रीहरीने वैकुंठ सोडून मुक्काम आपल्या भक्तांसाठी केलेला आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, चला, तुम्ही आम्ही सर्व मिळून त्याला धरून त्याचेच भजनपूजन करू. ६ ८४३ भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां साक्षित्वासीं ॥ १ ॥ माझी माझी म्हणे एकएकां मारी । हैं तौ नाही दुरी उभयतां ॥ २ ॥ तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥ ३ ॥ तुका म्हणे एके ठायाँ आहे वर्म । हेचि होय श्रम निवारितें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - दुरी-उणीव, भातें-खाऊ. अर्थ :- कधी कधी आई आपल्या मुलाचे भांडण कौतुकाने लावते व आपण दूर उभी राहून साक्षित्वाने पाहात असते. १ ती कधी एका मुलास माझा लाडका असे म्हणते व दुसऱ्यास मार देते. पण या दोन्ही मुलाच्या प्रेमात काही उणीव नसते २ मला फार खाऊ मिळाला, तुला थोडाच आहे, असे भांडण विनाकारण कटकट करुन मुले करतात व आई प्रेमाने ते सोडविते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, पण या वृथा भांडणाचे वर्म एका आईस मात्र माहीत असल्याने तो त्यांचे श्रम दूर करण्याचे प्रयत्न करते. ४ ८४४ लटकियाची आशा । होतो पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥ १ ॥ वरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ २ ॥ मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्त्तली बुद्धी । परती तों कधीं । घडेचि ना माघारीं ॥ ३ ॥