सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 439, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंतुमच्या अंतःकरणात का हो निर्माण होत नाही ? तुमच्या-माझ्यामधील द्वैताची, वेगळेपणाची भावना तुम्ही अजून कायम धरली आहे काय ? ३ मला भेट देण्याचे तुम्ही टाळता, याचे कारण देवा, आमचे पाप फार बलवत्तर आहे, का ? किंवा तूच दुबळा झालास की काय रे ? तुझ्या अंगी आता पापी लोकांचा उद्धार करण्याचे बळ पूर्वीसारखे उरलेले नाही काय ? ४ किंवा देवा, तुला इतरांचे देणे फार झाले की काय ? तुझेही दिवाळे निघाले ? की कुणाच्या ऋणात तुजकडून राहिला आहेस ? ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी गुंतवणूक करून का ठेवितो आहेस ? तुझ्या व माझ्या संबंधाचे स्वरूप स्पष्टपणे ठरवून ना देवा ६ विवरण - वारंवार प्रार्थना करून, स्तुती करून, आर्त भावनेने करुणा भाकूनही देव आपल्यावर का कृपा करीत नाही ? या एका प्रश्नाच्या पोटी थोर भक्तांच्या मनात जे जे विकल्प बहुतांशहतो येतात, त्यातील काही या अभंगात आहेत तुझ्यामाझ्या मार्गात काळ आडवा आला काय ? विसाराचे भेट द्यावी अथवा न द्यावी या सारख्या विचाराचे संकट निर्माण झाले काय ? का भेट न देण्याविषयीचे द्वैत पाटात निर्माण झाले ? आमचे पाप फार झाले ? की दया, तुझी पापमोचनाची शक्तीच कमी झाली ? तुझ्याही शक्तीचे दिवाळे निघाले की काय ? की कुणाच्या ऋणात जखडून गेला असल्यामुळे आमच्यासारख्याच्या वाटघास येत नाहीस ? अशासारखे अनेक संशय भक्तांच्या मनात येतात त्याचा उच्चार तुकारामबुवांनी येथे केलेला आहे मोरोपंतांची 'संशयरत्नमाला' प्रसिद्ध असून तिच्यातही लडिवाळ भक्ताच्या मनातील संशयाबद्दलचा आविष्कार फार चांगल्या प्रकारे झाला आह भक्ताने वारंवार करुणा भाकावी, दीन वाणीने प्रार्थना करावी, नाना तर्क करावेत, डाकाकुसका काढाव्यात, देवाशी प्रेमाने भांडण करावे व मग देवाने कृपा करावी, यामधील सुकुमारता व भक्तीची, जिव्हाळ्याची वृत्ती अधिक संतोषदायी आहे देवा, मला भेट, म्हटल्याबरोबर देव भेटल्यास त्या भेटीमधील आनंद व तळमळ केल्यावर, हट्ट केल्यावर भेटल्यानंतरचा आनंद, यात फरक असणारच लेकराने रागवावे, रुसावे, नाना शंका घ्याव्यात व आईने मग त्याची समजूत काढावी, यात सर्व आले ८५८ काय देहू घालू करवती कमरी । टाकू या भितरी अग्नीमाजी ॥ १ ॥ काय सेवू वन शीत उष्ण ताण । साहो कीं मोहन' धरुनी बैसो ॥ २ ॥ काय लावू अगीं भस्म उधळण । हिंडू देश कोण खुंट चारी ॥ ३ ॥ काय त्यजू अन्न करुनि उपास । काय करु नास जीविताचा ॥ ४ ॥ तुका म्हणे काय करावा उपाय । ऐसा देई भाव पाडुरंगा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - कमरी-शस्त्र, मोहन-मौन, चार खुंट-चार धाम अर्थ - देवा, मी तुमच्या भेटीसाठी करावे तरी काय हो ? काय माझ्या देहावर शस्त्र घालून त्याला कापून टाकू ? की त्याला अग्नीमध्ये टाकून देऊन भाजून टाकू ? १ की एखाद्या रानावनात जाऊन शीत, उष्ण, तहान याचा त्रास सहन करू ? का मौन धारण करून तेथे स्वस्थपणे बसून राहू ? २ की अंगावर भस्माची उधळण करून वैरागी-गोसावी बनू ? चार खुंट फिरून कोणत्या देशाची वारी करू रे देवा, तुझ्यासाठी ? चार धामाची यात्रा करू तुझ्या प्राप्तीसाठी ? ३ अन्न सोडून देऊन देवा मी उपास करू का ? की माझ्या जिविताचा नाश करून टाकू ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, मला सांगा ना एखादा उपाय तुमच्या प्राप्तीचा याविषयी तुम्हीच मला आता एखाद्या भावभक्तीचा मार्ग दाखवा ना ५ ८५९ दमें कीर्ति पोट नरे मानी जग । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥ १ ॥ अंतरतो तुझे पाय मज दुरी । धरिता हे थोरी जाणिवेची ॥ २ ॥ पिंडाच्या पाळणे धावती विकार । मज दावेदार मजमाजी ॥ ३ ॥ १ मौन तु गाथा ५१