सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 442, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४०४ सार्थ तुकारामगाथा ८६६ बळें बाह्यात्कारें संपादिले सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥ १ ॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ २ ॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातो विसरोनि सकळ हे ॥ ३ ॥ प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले फरी नित्य वेवसाय ॥ ४ ॥ तुका म्हणे मज भोरप्याचि परी । जालें सोंग वरी आंत तैसे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- वेवसाय-उद्योग, व्यवसाय, भोरप्याचि परी-बहुरूप्याप्रमाणे. अर्थ - साधुत्वाच्या बळानेच बाह्यात्काराने सोंग संपादन केले; पण अंतरगातून मात्र इंद्रियसुखाचा त्याग झाला नाही १ असे माझ्या अनुभवास नित्य येत असते व यासंबंधीचा खरा विचार काय आहे, याचीही जाणीव माझ्या मनास नेहमीच असते २ जो अनुभव जागेपणीचा असतो, तो कधी स्वप्नामध्ये दिसत नाही. यावेळी मी सर्व काही विसरून जातो ३ माझे चित्त खरोखर या प्रपंचातून बाहेर आलेलेच नाही. मागचेच सर्व उद्योग ते पुन' एकसारखे करीत असते ४ तुकाराम महाराज म्हणतात, माझी अवस्था निरनिराळी सोंगे घेणाऱ्या बहुरूप्याप्रमाणे झालेली आहे. वरवर पुष्कळ सोंगे वेळोवेळी केली तरी आत जो जसाचा तसाच शिल्लक असतो. ५ ८६७ म्हणवितो दास ते नाहीं कारणीं । आत घरी दोन्ही भिन्न भाव ॥ १ ॥ गातो नाचतों तें दाखवितो जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ २ ॥ पाविजे तें वर्म न कळेचि कांहीं । बुडालों या दोहों वघाचिया ॥ ३ ॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥ ४ ॥ तुका म्हणे वांयां गेलो ऐसा दिसे । होईल या हांसें लौकिकाचें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - करणी-कृत्य, धर्म-रहस्य अर्थ - मी स्वतःम ईश्वराचा दास म्हणवून घेतो; पण माझ्या हातून तशी कृत्ये मात्र होत नाहीत कधी. माझ्या अंतरगातील व बाहेरचा भाव वेगवेगळाच दिसतो १ मी प्रेमाने हरीचे गुण गातो त्याच्यासाठी नाचतोही; पण ते सर्व लोकांना दाखविण्यासाठी आहे. माझ्या अंत करणात ईश्वराविषयी प्रेम हटकून आहेच असे मात्र नाही. २ ईश्वरस्वरूपाच्या रहस्याचे ज्ञान जे मला हवे आहे, ते काही अजून मिळालेले नाही या दोघांच्या डोहातच मी पूर्णपणे बुडून जात आहे ३ माझ्या आयुष्याचे जे भांडवल होते ते मात्र काळाने हातोहात संपवीत आणले आहे. ह्या माझ्या आयुष्यास माप लागले असल्याने ते उतरणीस लागले आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी तर या माणसाच्या जन्मास येऊन वायाच गेलो आहे असे दिसते माझ्या सर्व लौकिक संसाराचे हंसेच होईल असे दिसते ५ विवरण-वरील दोन अभंगात भक्तश्रेष्ठ तुकोबानी आपल्या मनाची दुर्बलता स्पष्टपणे मांडलेली आहे तुकारामबुवा एवढे साधू, एवढे विठ्ठलभजनात रंगलेले, एवढे परोपकारी, पण त्याचेही मन त्यांना चित्ती खात असावे हे या अभंगातून ध्यानात येते आपण ह साधुत्वाचे बाह्यात्कारी सोंग पसरून लोकाच्या मनाची फसवणूक तर करीत नाही ना? अशी शंका त्याच्या मनात चाटून गेलेली आहे आपले मन प्रपंचातून सपूर्णपणे निघालेले नाही, जागृती व स्वप्नी एकच ईश्वरभाव अजून आपल्यात निर्माण झालेला नाही, आपण बहुरूप्याप्रमाणे वरवर सोंगधारीच आहोत की काय ? आपले गाणे व आपले नाचणे हे केवळ वरवरचे तर नव्हे ? आपल्या अंतःकरणात ईश्वराविषयी दृढ प्रेम किती आहे ? आपले आयुष्य काळाच्या मानाने हातोहात कमी तर होत नाही ना ? अशा एकसारख्या शंका ह्यांना येत असून ते अत्यंत जागृकतेने आपले चित्त सदैव श्रीहरीच्या चरणी जडून राहील अशा विवंचनेत असतात. स्वतःचे हे जे कठोर आत्मनिरीक्षण तुकोबानी केले आहे, त्यावरून वस्तुस्थितीच तशी होती असे मानण्याचे कारण नाही.