सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 48, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२२ सार्थ तुकारामगाथा ४६ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥ १ ॥ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ २ ॥ कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥ ३ ॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पाये ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भेदाभेदभ्रम-हे माझे, हे दुसऱ्याचे, हा पापी, हा पुण्यवान, हा लहान, हा मोठा अशा जाणिवेचा भ्रम, वर्म-खूण. अर्थ :- सर्व जगच विष्णुमय आहे, म्हणजे एकच तत्त्व सर्वत्र भरून राहिले आहे असे मानणे हा वैष्णवांचा धर्मच आहे. यात भेद मानणे, निराळेपणा कोणत्याही कारणाने कल्पिणे हे वाईट आहे. १ तुम्ही खरे भगवंताचे उपासक असाल तर जे कराल ते सत्याचे स्वरूप जाणून हिताचे असेल तेच करा. २ कुणाही जीवाचा मत्सर करु नका, कारण सर्वत्र एकच परमेश्वरतत्त्व भरून राहिले आहे, व त्या सर्वेश्वर पूजनाचे तत्त्व ध्यानात असू द्या. ३ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व अवयव एकाच देहाचे आहेत. जर एका अवयवास सुखाची किंवा दुःखाची अनुभूती आल्यास ती त्या जीवात सारखीच जाणवते. ४ विवरण :- वारकरी संप्रदायात या अभंगास फार महत्त्व आहे याचे कारण असे की दोन महत्त्वाचे विचार या अभंगात थोडक्या शब्दांत सांगितले आहेत सर्व जगतात एकच परमेश्वर भरून राहिला आहे असे समजून सर्व- श्वराची पूजा करण्याचीच वृत्ती आपली असावी असा एकत्वाचा बोध फार परिणामकारक रीतीने वर्णन केला आहे. या बोधाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे सर्वत्र परमेश्वराचाच अंश व्यक्त झालेला असल्यामुळे हा लहान, हा मोठा हा उच्च, हा नीच, हा चांगला, हा वाईट, हा पुण्यवान, हा पापी असे भेद उरू नयेत एकट्याचाच हा सर्व विस्तार असल्यामुळे समानबधत्त्वाची जाणीव असणे जगण्याचे आहे, हा यातून निघालेला दुसरा विचार. मग कुणाचाही मत्सर करू नये हे ओघानेच आले. हेवा दावा, मत्सर आपण ज्याचा करणार तोच ईश्वरी अशाचा व्यक्त झालेला आकार असेल तर ? असा प्रश्न सर्वांच्याच मनासमोर उभा राहिला तर पुजळसे हेवेदावे मिटतील कटुता कमी होईल. भागवत धर्माने या समत्वाच्या दृष्टीने फार मोठी कामगिरी सामाजिक क्षेत्रातही केली आहे भेददृष्टीने पाहणे संतानी अमंगल मानले आहे ४७ आम्ही तरी आस । जालों टाकोनि उदास ॥ १ ॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ २ ॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगी हा चढो ॥ ३ ॥ तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसों जैसों ॥ ४ ॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥ ५ ॥ तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - आस-इच्छा, आशा, तुरंगी-घोड्यावर मानामान-मान किंवा अपमान, खंती-काळजी अर्थ :- देहबुद्धीची आशा सोडून आता आम्ही उदास झालो आहोत. १ आता परमेश्वरा, मरणाचे भय कुणास आहे ? २ आता देह कुठे पडून जावो अथवा घोड्यावर चढो, आम्हांस त्याचे काय ? ३ यामुळे होणारे सुखदुःखादी विकार तुमचे तुम्हापाशीच राहोत, आमचा त्यांच्याशी संबंध नाही; आम्ही आहो तसेच राहू. ४ मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांचा नाश करून आम्ही आता त्यांच्या पलीकडे गेलो आहोत. ५ तुकाराम महाराज म्हणतात, आता यासंबंधीची मनांत बिलकुल चिंता उरलेली नाही. ६ ४८ निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥ १ ॥ मज हेंही नाहीं तेंही नाहीं । वेगळा वोहों पासुनी ॥ २ ॥