सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 525, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंसार्थ तुकारामगाथा ४८१ तो त्यांची वाट एकसारखी पाहात असतो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, कृपेचे दान देणारा हा देव भक्तांवर कृपा करून त्यांच्या विषयी आपल्या प्रेमाची तृप्ती करीत असतो. ४ १०७६ अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नाणीं कांटाळा ॥ १ ॥ पडोन राहेन ते ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागें न करों कांहीं । तुझी आण विठोबा ॥ २ ॥ तुम्ही आम्ही पीडों ज्यानें १ । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥ ३ ॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा² माझा आव्हेर ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- नाणों-न आणी, आणणार नाही, आण-शपथ. अर्थ :- देवा, तुझ्यावर ज्यांची अखंड प्रीती असते, त्या साधुसंतांची व भक्तांची संगत मला द्यावी. कमला- पती, मग सारखे सारखे मागून मी तुला कंटाळा येईल असे काही करणार नाही १ त्या संतांच्या पायांजवळच पडून राहीन. मी काही करणार नाही. काही मागणारही नाही. देवा, याविषयी त्या विठ्ठलाची शपथ आहे. २ तुमच्या दाराशी हाका देऊन सारखे धरणे धरल्याने तुम्हास व आम्हांस अशी दुहेरी पीडा होत असते; ती यामुळे आता दूर होईल. ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा विठ्ठला, माझ्या या बोलण्याकडे लक्ष द्यावे आता. माझा त्याग तुम्ही करु नये. ४ १०७७ पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोपी ॥ १ ॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होऊनिया ठाके ॥ २ ॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥ ३ ॥ तुका म्हणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- पुनीत-पवित्र, ओखदासी-औषधालासुद्धा, मेदिनी-पृथ्वी. अर्थ :- या विष्णुदासांनी आपल्या पावन संगतीने भोवतीच्या सर्व पातकी लोकांना पवित्र केले आहे १ आता यांच्याकडे वाकड्या नजरेने कोण पाहील ? कारण ते या विठ्ठलाविषयी प्रेम धारण करणारे शूर वीर आहेत. जर काही अशुभ असेल तर ते होऊनच त्यांच्या पुढे उभे राहते. २ त्यांच्या समोर श्रीहरीच्या प्रेमाचे पर्वताच्या पर्वत उभे असून पाप औषधाला सुद्धा उरत नाही. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या संत पुरुषांनी सर्व पृथ्वीच वैकुंठ- रूपाची करून टाकली आहे. ४ १०७८ जन³ देव तरी पायांचि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥ १ ॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥ २ ॥ तुका म्हणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाड नाहीं-पाहू नये, ध्यानात धरू नये, पालवीं-पदरात. अर्थ :- सर्व लोक ही देवाचीच स्वरूपे आहेत, असे असले तरी त्यांचे अवगुण ध्यानात न धरता त्यांच्या पायां पडावे. १ असे असले तरी हेही ध्यानात ठेवावे की, अग्नीचे काम शीतनिवारण आहे. थंडी दूर करणे, हे अग्नीचे १ जन, २ आता, ३ जग. तु गाथा...६१