भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 531, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 531

सार्थ तुकारामगाथा ४८५ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडेंच ॥ ३ ॥ तुका म्हणे चोरटाचि जाला साव । सहजचि न्याय नाहीं तेथें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - जतन-सांभाळ, खांनें-चोरी करून, साव-प्रतिष्ठित अर्थ - माझे पंचमहाभूतात्मक देहाचे घोंगडे मी चांगले जपून ठेविले होते त्याचा सांभाळ चांगला केला होता पण घरातल्या, हृदयामधील चोरानेंच चोरी करून ते पळवून नेले १ मी येथे यायच्या आधीपासूनच तो इथे होता मला न कळताच तो माझ्याही हृदयात स्थान मिळवून बसला होता २ या देवाने माझे घोंगडे नेले हो, घोंगडे नेले हो त्याने मला आता उघडे केले आहे. ३ तुकाराम महाराज म्हणतात, आणि नवल असे की, जो चोरटा होता, तोच आता प्रतिष्ठित होऊन बसला आहे या ठिकाणी न्याय राहिलेला नाही, हे सहजच दिसते. ४ १०९० घोंगडें नेलें सागो मी कोणा । दुबळें माझें नाणीत मनां ॥ १ ॥ पुढें तें मज न मिळे आता । जवळो सत्ता दाम नाहीं ॥ २ ॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोगडियाची करा शोधणी ॥ ३ ॥ घोगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे जव भरला हाट ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा .- नाणीत-आणीत नाहीत, हाट-बाजार अर्थ -- माझे देहरूपी घोंगडे नेले हे आता मी सांगू तरी कुणास ? मी दुबळा असल्याने कुणीच माझ्या- विषयी मनात आणीत नाहीत १ आता यापुढे ते घोंगडे मला परत मिळेल, अशी आशा दिसत नाही कारण माझ्याजवळ पैसा नाही, कसली सत्ता नाही २ अहो श्रीमान शेट सावकार, महाजन लोकहो, माझे कुणी तरी ऐका हो कुणी तरी माझ्या घोंगड्याचा शोध करा ना ३ तुकाराम महाराज म्हणतात, लौकिकाचा हा बाजार भरला आहे, तोपर्यंतच या माझ्या घोगड्याचा बोभाटा करून शोध करा ना तुम्ही ४ १०९१ माझें घोंगडें पहिलें ठायीं । माग तया पायीं सापडला ॥१ ॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिके ॥ २ ॥ चोर कुठोरि एकेचि ठायीं । वेगळें पाहावे न लगे काही ॥ ३ ॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें त्यामध्यें मेळविलें ॥ ४ ॥ आपल्या आपण शोधिले तींहीं । करीन मी ही तेचि परी ॥ ५ ॥ तुका म्हणे माझें हितचि जालें । फाटके जाऊन घडके आलें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - मार्ग-शोध, कुठोरि-आश्रय देणारा काठारी अर्थ - एवढा बोभाटा झाल्यावर माझे देहरूपी घोंगडे आहे त्या ठिकाणीच पडले आहे असे माझ्या ध्यानात आले त्या विठ्ठलाच्या पायापासूनच मला याचा शोध लागला १ हा देव मोठाच चोर असून त्याला या पुंडलिकाने आपल्या पाठीशी घातले आहे २ त्यामुळे चोर व त्यास आश्रय देणारा फोठारी एकाच ठिकाणी आहेत दोघेजण एकत्र असल्याने त्यांना वेगळे पाहण्याची जरूरीच नाही ३ या चोराने माझ्याही आधी पुष्कळांची घोंगडी चोरली होती त्याच्यातच माने घोंगडही मिसळून टाकले होते ४ ज्यानी आपण होऊन शोध घेतला, त्याना त्याचे त्याचे घोगड मिळाले मीही त्याच्याप्रमाणेच शोध करुन माझ घोंगडे परत मिळविले ५ तुकाराम महाराज म्हणतात, यात माझा फायदाच झाला कारण सतरा ठिकाणी फाटके असलेले माझ गरिवाचे घोंगडे जाऊन चांगले ईश्वरी कृपेचे नये घोंगटे मला मिळाले ६ विवरण - तुकाराम महाराजाच ह यागडयाच अभग रुपकात्मक म्हणून प्रसिद्ध आहेत थीष्टप्यावरावर रानात जाताना अनेक गोपाळ झाडावर काबळ किंवा घानडे घत असत त्याच अनव वेळ बनात गाई वर रागत्या की होत असत त्यामध्ये एक्मेकाचे घायडे पळविणे, लपवून ठेवणे, असा थट्टेचाही प्रकार अस थीष्टपणाने आपल