सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 532, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४८६ सार्थ तुकारामगाथा घोंगटें पलविले, ते पाहून गोपाळ गलगला करीत असत. श्रीमंत मुलांची धागडी चांगली असून त्यामुळे रुधी त्याचा लोभ इतरांना वाटे याच घोंगडयाच्या खेळातून पुढे रूपकात्मक अर्थ तयार झाला असावा श्रीकृष्ण धागडे वाहून घेतो, म्हणजे पंचमहाभूतांचे बनलेले हे शरीर नाहीसे करतो देहभाव नष्ट करतो इंद्रियादीच्या वृत्तीतून तो आपणास मुक्त करतो हा देह म्हणजेच मी, अशी अहंकारार्थी भावना दूर करतो याच देहभावाला धागडे म्हटले आहे पंचमहा भूताचे बनलेले हे घोंगडे केव्हा तरी मोडावयाचे, किंवा त्याच्या अंतर्यामी वसलेला त्याचा खराखुरा मालक ओळ खावयाचा, अशी भाषा संतांच्या परिवारात रुढ झाली याही ठिकाणी तुकारामबुवांचे धागडे गोपाळकृष्णाने चोरून नेले असाच बोभाटा आहे श्रीकृष्णाने देहभाव कमी केला, असा याचा अर्थ शेवटी घोंगडे सापडने, पण ते पहिल्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगले होते पहिले गरिबाचे सतरा ठिकाणी फाटलेले, किंवा ठिगळ लावलेले होत, तर आता हे नवे भरजरीच होते कारण आता त्याला ईश्वरी कृपेची ऊब लाभली होती
या धागड्यापाठीमागे आणखीही एक संकेत असावा वारकरी भक्तांना आजही खांद्यावर कांबळे किंवा धागडे टाकणे आवडत श्रीकृष्ण सांद्यावर घोंगडे किंवा कांबळे टाकून रानावनात गाईमागून जात अस, अशी कल्पना आहे तोच धागा येथेही परिपुष्ट झालेला आहे पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्ताने आजही बाजारात पासादना व घोंगडया भरपूर प्रमाणात विकायला येतात पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी निघताना एखाद्या भाविकाने धागडे विकत घेतले, तर त्यातील गरजेची व भावाची वृत्ती सहज समजून येण्यासारखी आहे ही प्रथा ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आली असावी श्रीसोपानदेवांनी 'घोंगडिया साठों पंढरीये पेठीं । वैणप्याची दाटी होती तेथें' या ओळीने सुरू होणारा एक सुंदर अभंग रूपकाचा म्हणून लिहिलेला आहे या घोगडयाच्या बाजारात सोपानदेवांनी एक धागडे घेतले व ते श्रीगुरुच्या चरणी अपण केल 'सोपान घोंगडी घडी केली । चरणीं राहिली निवृत्तीच्या' म्हणून त्यांनी म्हटले आहे सर्व देहभाव देवाच्या अथवा श्रीगुरूच्या चरणी अर्पण करावा असाच भावार्थ याचा आहे
श्रीज्ञानेश्वरांचेही 'घागडी' वर फार चांगले अभंग आहेत त्यांच्या तर घोंगडयावर ब्रह्माचा गाठा असून ते त्यांना 'रखुमादेविवरें विठ्ठलें दिधलें' असल्यामुळे 'अमोलिक झाले मोलेविण' ज्ञानेश्वरांनीही पंढरीच्या घोंगड्याच्या बाजाराचा उल्लेख केलेला आहू 'घोंगडी घेऊनि हाटासि जाये । पंढरिये आहे वस्ती आम्हा' या बाजारात आपणाम मिळालेले घोंगडे कसले आहे ? ज्ञानदेवांनी वर्णन केले आह 'काळें ना सावळें ढवळें ना पिवळें । घोंगडें निराळें लाधलो मी' इतकेच नव्हे तर तुकोबांना जशी 'फाटके जाऊन धडके आले' अशी प्रचीती आली तशीच ती ज्ञाने श्वरानाही आली होती 'भागील रगडें झाडिले आता । पंढरीनाथा चरणा जवळीं। नवें नवधड हाता आलें । दृष्टी पाहे तय मन हारपले । सहल फुलींवरी गोडा थोरु । घडतें दायो रखुमादेविवरू' असा त्यांनी या गोडेवाल्या धाग डयाचा उल्लेख केलेला आहे खरे म्हणजे हे घोंगडे अद्वैत पठेतून आणलेले असते हे 'व्योमाकारें वेद प्रसिद्ध पाघुरवो' असे असते
या धागड्यावरून ईश्वर व भक्त याचे ऐक्य प्रस्थापित व्हावे अशी ही एक कल्पना आहे ईश्वर मोठा व मी भक्त लहान, पण दोघांचे धागडे एकच, अशी भाषा ज्ञानेश्वरांनी वापरलेली आह 'तू माझा स्वामी मी तुझा रक । पाहता न दिसे वेगळिक ॥ मी तूं पण जाऊ दे दुरी । एकचि घोंगडे पाघरू हरी' असे ज्ञानश्वरानी म्हटले आहे कधी श्रीकृष्णाची धागडी चांगली व आपली मान वाईट का ? अशी गमतीची तक्रारही आह 'कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हासी का दिली वायली ?' अशी विचारणा एका गोपाळाने केलेली आहे
१०९२ सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदा घातलासे ॥ हिंडवूनि पोट भरी दारोदारीं । कोडुनि पेटारी असेतया ॥ १ ॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलो तो मी गा सोडीं आता ॥ माझें मज काहीं न चलेसे जालें । कृपा तुज न करिता ॥ २ ॥