सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
४८६ सार्थ तुकारामगाथा घोंगटें पलविले, ते पाहून गोपाळ गलगला करीत असत. श्रीमंत मुलांची धागडी चांगली असून त्यामुळे रुधी त्याचा लोभ इतरांना वाटे याच घोंगडयाच्या खेळातून पुढे रूपकात्मक अर्थ तयार झाला असावा श्रीकृष्ण धागडे वाहून घेतो, म्हणजे पंचमहाभूतांचे बनलेले हे शरीर नाहीसे करतो देहभाव नष्ट करतो इंद्रियादीच्या वृत्तीतून तो आपणास मुक्त करतो हा देह म्हणजेच मी, अशी अहंकारार्थी भावना दूर करतो याच देहभावाला धागडे म्हटले आहे पंचमहा भूताचे बनलेले हे घोंगडे केव्हा तरी मोडावयाचे, किंवा त्याच्या अंतर्यामी वसलेला त्याचा खराखुरा मालक ओळ खावयाचा, अशी भाषा संतांच्या परिवारात रुढ झाली याही ठिकाणी तुकारामबुवांचे धागडे गोपाळकृष्णाने चोरून नेले असाच बोभाटा आहे श्रीकृष्णाने देहभाव कमी केला, असा याचा अर्थ शेवटी घोंगडे सापडने, पण ते पहिल्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगले होते पहिले गरिबाचे सतरा ठिकाणी फाटलेले, किंवा ठिगळ लावलेले होत, तर आता हे नवे भरजरीच होते कारण आता त्याला ईश्वरी कृपेची ऊब लाभली होती
या धागड्यापाठीमागे आणखीही एक संकेत असावा वारकरी भक्तांना आजही खांद्यावर कांबळे किंवा धागडे टाकणे आवडत श्रीकृष्ण सांद्यावर घोंगडे किंवा कांबळे टाकून रानावनात गाईमागून जात अस, अशी कल्पना आहे तोच धागा येथेही परिपुष्ट झालेला आहे पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्ताने आजही बाजारात पासादना व घोंगडया भरपूर प्रमाणात विकायला येतात पंढरपूरला आल्यावर विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी निघताना एखाद्या भाविकाने धागडे विकत घेतले, तर त्यातील गरजेची व भावाची वृत्ती सहज समजून येण्यासारखी आहे ही प्रथा ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आली असावी श्रीसोपानदेवांनी 'घोंगडिया साठों पंढरीये पेठीं । वैणप्याची दाटी होती तेथें' या ओळीने सुरू होणारा एक सुंदर अभंग रूपकाचा म्हणून लिहिलेला आहे या घोगडयाच्या बाजारात सोपानदेवांनी एक धागडे घेतले व ते श्रीगुरुच्या चरणी अपण केल 'सोपान घोंगडी घडी केली । चरणीं राहिली निवृत्तीच्या' म्हणून त्यांनी म्हटले आहे सर्व देहभाव देवाच्या अथवा श्रीगुरूच्या चरणी अर्पण करावा असाच भावार्थ याचा आहे
श्रीज्ञानेश्वरांचेही 'घागडी' वर फार चांगले अभंग आहेत त्यांच्या तर घोंगडयावर ब्रह्माचा गाठा असून ते त्यांना 'रखुमादेविवरें विठ्ठलें दिधलें' असल्यामुळे 'अमोलिक झाले मोलेविण' ज्ञानेश्वरांनीही पंढरीच्या घोंगड्याच्या बाजाराचा उल्लेख केलेला आहू 'घोंगडी घेऊनि हाटासि जाये । पंढरिये आहे वस्ती आम्हा' या बाजारात आपणाम मिळालेले घोंगडे कसले आहे ? ज्ञानदेवांनी वर्णन केले आह 'काळें ना सावळें ढवळें ना पिवळें । घोंगडें निराळें लाधलो मी' इतकेच नव्हे तर तुकोबांना जशी 'फाटके जाऊन धडके आले' अशी प्रचीती आली तशीच ती ज्ञाने श्वरानाही आली होती 'भागील रगडें झाडिले आता । पंढरीनाथा चरणा जवळीं। नवें नवधड हाता आलें । दृष्टी पाहे तय मन हारपले । सहल फुलींवरी गोडा थोरु । घडतें दायो रखुमादेविवरू' असा त्यांनी या गोडेवाल्या धाग डयाचा उल्लेख केलेला आहे खरे म्हणजे हे घोंगडे अद्वैत पठेतून आणलेले असते हे 'व्योमाकारें वेद प्रसिद्ध पाघुरवो' असे असते
या धागड्यावरून ईश्वर व भक्त याचे ऐक्य प्रस्थापित व्हावे अशी ही एक कल्पना आहे ईश्वर मोठा व मी भक्त लहान, पण दोघांचे धागडे एकच, अशी भाषा ज्ञानेश्वरांनी वापरलेली आह 'तू माझा स्वामी मी तुझा रक । पाहता न दिसे वेगळिक ॥ मी तूं पण जाऊ दे दुरी । एकचि घोंगडे पाघरू हरी' असे ज्ञानश्वरानी म्हटले आहे कधी श्रीकृष्णाची धागडी चांगली व आपली मान वाईट का ? अशी गमतीची तक्रारही आह 'कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हासी का दिली वायली ?' अशी विचारणा एका गोपाळाने केलेली आहे
१०९२ सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदा घातलासे ॥ हिंडवूनि पोट भरी दारोदारीं । कोडुनि पेटारी असेतया ॥ १ ॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलो तो मी गा सोडीं आता ॥ माझें मज काहीं न चलेसे जालें । कृपा तुज न करिता ॥ २ ॥
सार्थ तुकारामगाथा ४८७ आविसें मीन लावियेला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापमाये कवण रया ॥ ३ ॥ पक्षी पिलयां पातले आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण न भेये धांवोनि घोसरे । जीवित ना जालीं वाळें ॥ ४ ॥ गोडपणें मासी गुंतली लिगाडी । सांपडे फडफडी अधिकाधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धांव घालीं ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- फांदा-पाश, वरो-अवस्था, आविसे-आमिषाने, रया-रक्षण. अर्थ :- गारुड्याची पुंगी वाजत असताना सर्प त्या नादास भुलला. त्याच वेळी त्या गारुड्याने त्याच्यावर पाश टाकून त्याला पकडले. सर्पास पेट्याऱ्यात कोंडून दारोदारी तो हिंडतो व आपले पोट कसे तरी भरतो. काय त्या सर्पाची किंमत असते ? १ पांडुरंगा, माझीही अशीच अवस्था झाली आहे. मीही आता या संसारपाशात गुंतून गेलो आहे. मला आता त्यातून तू सोडव. तू जर कृपा केली नाहीस, तर माझे काहीच चालणार नाही. अशी स्थिती झाली आहे. २ मासे धरणाऱ्या कोळ्याने मासे पकडण्यासाठी गळाच्या टोकास एक लहान मासा आमिष म्हणून लावला. पाण्यातील माशाने ते चांगले भक्ष्य म्हणून तोंडात धरण्याचा प्रयत्न केला व त्यातच तो सापडला. मग कोळ्याने त्या माशास बाहेर काढून त्याचा प्राणच घेण्यास सुरुवात केली. तेथे त्याचे रक्षण करणारे कोण आईबाप आहेत ? ३ घरट्यात असणाऱ्या आपल्या लहान लहान पिल्लांना पारध्याने पाशात पकडले आहे, असे मोठ्या आशेने आलेल्या त्यांच्या आईबाप पक्ष्यांनी पाहिले. मग त्यांनी मरणाची फिकीर न करिता मायेने, पिल्लांवरील प्रेमाने त्यांनी त्या जाळ्यात उडी घेतली. त्यामुळे त्यांची मुलेही वाचली नाहीत व त्यांचे जीवनही संपले. तेही पारध्याच्या हाती पिल्लां- सहित सापडले. ४ गुळचट असणाऱ्या पदार्थावर माशी भुलली व तेथेच गुंतून राहिली. निसटण्यासाठी तिने आणखी फडफड केली, तो ती अधिकच चिकटून राहिली. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, ही अशी आशा माझाही प्राण घेऊ पाहात आहे. पंढरीनिवासा, पांडुरंगा, तू आता माझ्यासाठी धावत ये. ५ १०१३ यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥ १ ॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ २ ॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामध्यें होता गांठी ॥ ३ ॥ तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्वळा काय चाड ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- यातिहीन-हीन जातीचा, होन-द्रव्य, चाड-इच्छा. अर्थ :- देवा, मी तर हीन जातीचा असल्याने मला कसला आला आहे अभिमान ? नारायणा, तुम्हास मात्र सर्व लोक मानतात. १ मला मान नाही, याची कसलीच चिंता वाटत नाही. कसलेच सुखदुःख नाही. जो तो आपल्या गुणांप्रमाणे मान सन्मान होतोच. २ एखाद्या चिंधीत जर द्रव्य बांधले असेल, तर ती चिंधी त्या द्रव्यासाठी मस्तकावर धारण केली जाते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, लोक ज्याला वंदन करतात, मानसन्मान देतात, तो निराळाच आहे. मला दुबळ्याला मानाची काहीच चिंता नाही, इच्छा नाही. ४ १०१४ शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥ १ ॥ जाऊनि वोसंगा रिघेन वोरास । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ २ ॥ कृपा तनु माझी सांभाळी दुभूनि । अमृतजीवनें लोटलीसे ॥ ३ ॥ आनंदाचा ठाव नाहीं माझे चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥ ४ ॥
४८८ सार्थ तुकारामगाथा सैर जाये पडे तयेसी साकडें । सांभाळीत पुढें मागें आस १ ॥ ५ ॥ तुका म्हणे चिंता कैसी ते मी नेणे । लडिवाळ तान्हे विठाईचे ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळली-देत राहिली, चोसगा-कासेस, वोरस-स्नेहपूरित पान्हा, तनु-शरीर, सैर- हवा तसा, वाकडा तिकडा अर्थ - ही आमची विठाई माउली शीतळ अशा छायेप्रमाणे असून ती प्रेमाचा पान्हा देत राहिलेली आहे १ मी तिच्या कासेत तोंड खुपसून इच्छेस येईल त्याप्रमाणे मी तिच्या प्रेमाचा पान्हा चारीन, इच्छेस येईल तितके तिचे कृपामृत पीत राहीन २ ही विठाई माउली मोठ्या कृपेने दुधाचा पाटा सोडून माझ्या शरीराचा सांभाळ करिते तिच्यामुळे अमृताचे सजीवनौघ निर्माण झालेली आहे ३ या कृपेमुळे माझ्या चित्तात आनंदास एवढे भरते आले आहे की, आणखी आनंदाला आता स्थानच उरलेले नाही या आनंदाच्या उधाणास सागराचीसुद्धा उपमा कशी पुरो पडेल ? ४ मी जर येडावाकडा चालू लागलो तर, या आईसच त्याचे सकट पडते माझ्या मागेपुढे राहून ती माझे रक्षण एकसारखे करीत असते ५ तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे मला चिंता कशी माहीत नाही मी या विठाई माउलीचे लडिवाळ असे तान्हे मूलच आहे ६ रामचरित्र—अभंग १४ १०९५ रामा वनवास । तेणे वसे २ सर्व देश ॥ १ ॥ केले नामाचे जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ २ ॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥ ३ ॥ तुका म्हणे ऋषिनेम । ऐसा कळोनि का भ्रम ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - ऋषिनेम-वाल्मीकी ऋषींनी सांगितल्याप्रमाण अर्थ - श्रीरामचंद्राला वनवास घडला म्हणूनच दंडकारण्यात वसती वाढण्यास मदत झाली १ रामचंद्रांनी आपल्या नावाचे सार्थक केले त्याच्याखेरीज समर्थपणा असा स्वतंत्र नाही २ स्वत ची पत्नी सीतादेवी हिला रावणाने नेल्यावर शोकाने व्याकुळ होऊन रामचंद्रही शोकाने वनात रडत होते, असे पुराणांनी वर्णन केले आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, वाल्मीकी ऋषींनी जसे लिहून ठेविले होते, तसेच रामचंद्राचे वर्तन झाले असे समजत असूनही तुमच्या मनात संभ्रम कशासाठी आहे ? ४ १०९६ राम म्हणे ग्रासोग्रासी । तोचि जेविला उपवासी ॥ १ ॥ धन्य धन्य ते शरीर । तीर्थाव्रताचे माहेर ॥ २ ॥ राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥ ३ ॥ राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाउलापाउली ॥ ४ ॥ राम म्हणे भोगीं त्यागी । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥ ५ ॥ ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे जीवन्मुक्त ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - ग्रासोग्रासी-प्रत्येक घास घेताना अर्थ - जेवताना प्रत्येक घासाच्या वेळी रामनाम जर घेतले तर, त्याला उपवासाचेच पुण्य लाभते १ त्याच्या शरीरास तीर्थांचे व व्रतांचे माहेरघर होण्याचे भाग्य लाभते, तो धन्यधन्य होय २ रोजचा व्यवसाय करीत असताना राम राम असे नाम जर आपल्या मुखामधून येत राहिले तर समाधीचेच सुख आपणास मिळेल ३ वाटचाल करताना प्रत्येक पावलागणिक नामाचे उच्चारिले तर, यज्ञयाग केल्याचे श्रेय मिळेल ४ कोणत्याही १ अस, २ असे
सार्थ तुकारामगाथा ४८९ भोगाच्या अथवा त्यागाच्या वेळी रामनाम जर मुखात असले, तर ते कर्म आपल्या अगी लागणार नाही आपण त्यापासून निर्लेप राहू. ५ अशा प्रकारे जो रोज रामनामाचा सतत जप करीत असतो, त्यास तुकाराम महाराज जीवन्मुक्तच म्हणतात ६ १०९७ तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥ १ ॥ तो हा न करी तें काई । का रे लीन नव्ह्हां¹ पायीं ॥ २ ॥ सीळा मनुप्य जाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥ ३ ॥ वानरा हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- उदकावरी-पाण्यावर, सीळा-दगड अर्थ - या रामाचे महत्त्व असे आहे की, याच्या नावाने जड जड दगडही पाण्यावर सेतुबंधनाच्या वेळी तरले १ असा हा रामप्रभू करणार नाही असे काय आहे ? त्याच्या पायांवर तुम्ही लीन का हो होत नाही ? २ याच रामाच्या पायाच्या स्पर्शाने अहल्या शिळा होऊन पडली होती, ती परत मनुष्यरूपास आली. ३ याच रामचंद्राने वानरांच्या साह्याने सबंध लकेचे राज्य रावणापासून हिरावून घेतले व सीतेची मुक्तता केली ४ विवरण:- श्रीरामचंद्राच्या पावन व उद्बोधव चरित्रातील काही कथांचा उल्लेख तुकोवानी रामचरित्रपर अभंगातून केलेला आहे सेतुबंधनास, रावणाशी लढण्यात वानराचे साहाय्य रामचंद्राना विशेष झाले असल्याचे प्रसिद्ध आहे रामचंद्र वनवासास निघाल्यानंतर ज्या अनेक घटना झाल्या, त्यात अहल्येच्या उद्धाराची घटना महत्त्वाची होती. रामाच्या चरणस्पर्शाने शिळा होऊन पडलेली, फत्तराप्रमाणे निर्विचार झालेली, अहल्या मनुष्य झाली, माणसात आली, अशी कथा आहे अहल्या ही गौतम ऋषींची पत्नी ब्रह्मदेवाने ही आपली मानसकन्या गौतमास अर्पण केली इंद्र, अग्नी वरुण इत्यादींचेही प्रेम हिच्यावर हान, इंद्राने गौतमाचे रूप धारण करून अहल्येचे पातिव्रत्य भग करण्याचा प्रयत्न केला गौतमराग हे समजल्याने त्याने इंद्रास व अहल्येस दोघानाही शाप दिले अहल्या शिळा होऊन पडेल असा, गौतमाचा शाप होता व प्रभू रामचंद्र जेव्हा बनात येतील, तेव्हा अहल्येचा उद्धार होईल असाही उ शाप तिला मिळाला होता या संकेतानुसार प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदम्पर्शाने शापित अहल्येचा उद्धार करून तिला मुक्त केले. १०९८ राम म्हणता रामचि होइजे । पदीं बैसोन पदवी² घेइजे ॥ १ ॥ ऐसे सुख वचनीं आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥ २ ॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती फेवीं ॥ ३ ॥ तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आन-दुसऱ्या अर्थ - या रामनामाचे माहात्म्य असे आहे की, जो कुणी त्याचा जप करितो तो स्वतःच रामरूप होऊन जातो. १ असे अलौकिक सुख रामनामाच्या जपात आहे विश्वास ठेवून अनुभव घेऊन पाहा तुम्ही २ एकदा राम- नामाच्या रसयसेची चव मिळाली की, मग दुसऱ्या चवींची आवडच संपून जाते ३ तुकाराम महाराज म्हणतात, हो रामनामाची चव मी स्वतः चाखून पाहिली आहे मला स्वतःला जो अनुभव आला आहे, तोच मी तुम्हांस सांगत आहे ४ १०९९ रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरितीं आपण शंकरें ॥ १ ॥ केंसीं तारक उत्तम तिन्हीं लोकां । हळाहळ शीतळ केले शिवा देवा ॥ २ ॥ हाचि मत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥ ३ ॥ जुनाट नागर नीच नये । तुका म्हणे म्या धरिले जीवें भावें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- हलाहल-हलाहल नावाचे उग्र विष, नीच-नित्य १ व्हाना, पद पेविीजे तु गाथा . ६२
४९० सार्थ तुकारामगाथा अर्थ :- राम राम ही अक्षरे फार सामर्थ्यवान व उत्तम असल्यामुळेच शिवशंकरांनी आपल्या कंठात धारण केली आहेत. १ ही अक्षरे उत्तम असून तीनही लोकांना तारणारी आहेत. शिवशंकरांना विषप्राशनामुळे जो त्रास झाला, तो याच रामनामामुळे दूर झाला. त्यांच्या अंगाचा दाह रामनामामुळे थांबून शीतलता प्राप्त झाली. २ याच राममंत्राचा उपदेश शिवांनो पार्वतीस केलेला असल्यामुळे, तिच्या अनेक जन्मांचे, गर्भवासाचे दुःख संपले. ३ तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही रामनामाची अक्षरे अत्यंत पुरातन असून पवित्र आहेत. शिवाय त्यांच्यात नित्य नवे चैतन्य आहे; म्हणूनच मी हे मनोभावे धारण केले आहे. ४ ११०० राम म्हणतां तरे जाणतां नेणतां । हो का यातिमलता कुळहीन ॥ १ ॥ राम म्हणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ २ ॥ राम म्हणे तया जवळो नये भूत । फेंचा यमदूत म्हणतां राम ॥ ३ ॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके फेरझार म्हणतां राम ॥ ४ ॥ तुका म्हणे हे सुखाचें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- यातिमलता- भलत्या जातीचा, कोणत्याही जातीचा अर्थ - रामनामाचा उच्चार करिताच जाणते, नेणते सर्वचजण तरून जातात. कोणत्याही जातीचा अथवा कुलहीन किंवा हीन कुळाचा असला तरी तो तरून जातो. १ रामनामाचा उच्चार करण्यास कसलाही त्रास पडत नाही. काही महादोष आपल्या हातून घडलेले असतील, तर तेही जळून नष्ट होतात. २ रामनामाचा जप जर कुणी करीत असतील, तर त्यांना भूतपिशाच्चाची बाधाही कधी होत नसते. रामनामाचा उच्चार करीत असताना यमदूतांचेही काही चालत नाही. ३ रामनामाचा जप केल्यानंतर संसारसागर सहज तरून जाता येतो. रामनामाच्या उच्चारा- मुळे जन्ममृत्यूंच्या फेऱ्या चुकतात ४ तुकाराम महाराज म्हणतात, असे हे रामनाम सुखाचे एकमेव साधन असून एकनिष्ठ अशा भावाने या रामनाममृताचे सेवन सर्वांनी करावे. ५ ११०१ पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥ १ ॥ अवघे लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सयंत्र बाहेरी भीतरी आंत ॥ २ ॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होई शरणागत किंवा युद्धासी सादर ॥ ३ ॥ तुका म्हणे एव्द्या भावें रामेंसी भेटी । करूनि घेई आता संबंधेंसी तुटी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - निदसुरा-अर्धवट झोपलेल्या, अज्ञानी, भूपती-रावण, अंगलग-जवळचे. अर्थ -- रावणाचे दूत त्याला सांगू लागले, रामराय पलीकडेच येऊन उभे आहेत. अरे अर्धवट झोपलेल्या अज्ञानी राजा रावणा, झोपून काय राहतोस ? उठ ना. १ या सर्व लंकेत जिकडे तिकडे रामाचेच दूत पसरून राहिलेले दिसतात यांनीच सर्व लंका आतून बाहेरून व्यापलेली दिसते. २ तुझ्या जवळ शिरणारे मोठे मोठे वीर पुरूष युद्धात मरण पावले आहेत तू त्या रामचंद्रास त्वरित शरण तरी जा, किंवा त्याच्याशी युद्धास तरी तयार हो. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या दोन मार्गांपैकी एक असा की, एकचित्ताने तू रामाशीच भेट घ्यावीत व आपला लौकिक प्रपंचाचा य ऐहिकाचा संबंध तोडून टाकायास. ४ ११०२ समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥ १ ॥ कैसे भेटतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ २ ॥ प्रेमसुताचे संधान । बाणें निवारितो बाण ॥ ३ ॥ तुक्यास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- समरंगणा-रणभूमीवर.
सार्थ तुकारामगाथा ४९१
अर्थ - रावण रणभूमीवर येऊन उभा राहिल्याचे प्रभू रामचंद्रांनी पाहिले १ या रणांगणावर आता आपापली नावे विसरून हे दोघे एकमेकांना भिडतील २ परस्पराविषयी असणाऱ्या प्रेमसबधाच्या अनुसंधानामुळे हे एकमेकांचे बाण निवारण करतील ३ तुकाराम महाराज म्हणतात, या रघुनाथाने रहस्य जाणून फार मोठा पराक्रम केला ४ ११०३ केला रावणाचा वध । अवघा तोडिला सबंध ॥ १ ॥ लकाराज्यें विभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ २ ॥ औदार्याची सीमा । काय वर्णू रघुरामा ॥ ३ ॥ तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - चिरकाल-कायमची, दीर्घ कालपर्यंत अर्थ - या रामप्रभूने मदमत्त रावणाचा वध केला व त्याच्या पूर्वकर्मांच्या सबंधापासून त्याला मुक्त केले १ नंतर लंकेचे राज्य रामचंद्राने विभीषणाला दिले त्या राज्यावर त्याची दीर्घकाळपर्यंत स्थापना केली २ या राम- चंद्राच्या औदार्याची सीमा मी काय वर्णन करावी ? ३ तुकाराम महाराज म्हणतात, असा हा माझा दाता प्रभू रामचंद्र असून, त्याने सीतेची रावणाच्या बंदिवासातून मुक्तता केली ४ ११०४ रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥ १ ॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ २ ॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥ ३ ॥ स्मरता जानकी । रामरूप जाले कपि ॥ ४ ॥ रावणेसी लंका । राम आपण जाला देखा ॥ ५ ॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - कपि-वानर अर्थ - अयोध्येस परत आल्यावर रामप्रभूंनी आपल्या कौसल्या मातेस रामरूप करून टाकले १ ज्याच्या मनात सतत रामनाम आहे, ज्याच्या चिंतनात सतत रामनाम आहे, तो रामरूपासच जाऊन पोचेल, याविषयी कोणीही संदेह धरू नये २ अयोध्येमधील सर्व प्रजाच रामरूप होऊन गेली ३ सीतादेवींचे व रामचंद्राचे स्मरण करता करता सर्व वानरही रामरूप होऊन गेले ४ रावणाच्या लंकेतील सर्व राक्षसांनाही, या रामाचीच भीती एकसारखी असल्यामुळे तेही रामरूपच बनून गेले ५ अशा प्रकारे नित्य जो रामनामाचे स्मरण करितो, त्याचे पायावर तुकाराम महाराज डोके ठेवित्तांत ६ ११०५ आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरींतुरे वाद्याचे गजर ॥ १ ॥ आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जयजयकार आळंगिला भरत ॥ २ ॥ फिरिती अक्षवाणे ओवाळिती रघुवीरा । लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा ॥ ३ ॥ जाले रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्से नरनारीबाळें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अक्षवाणे-दिव्यांच्या आरतीने ओवाळण्याची मंगल क्रिया अर्थ - रामचंद्र परत अयोध्येस आल्यानंतर सर्वत्र आनंद्दीआनंद झाला सर्व स्त्रीपुरुष नागरिक हर्षभरित होऊन गेले शंख, भेरी, तुताऱ्या यांच्या जयनादांचा गजर झाला १ रघुनाथ अयोध्येस आल्यामुळे अवघ्या
आयोध्येत आनंदोआनंद होऊन गेला. सर्वत्र जयजयकार झाला. प्रभू रामचंद्रानी बंधू भरताला प्रेमाने आलिंगन दिले २ आयोध्येच्या नारी, रामलक्ष्मण व सीतामाई याना प्रीतीने ओवाळून ओक्षण करू लागल्या. ३ सर्वत्र रामराज्य झाल्यामुळे आनंदी आनंद पसरला. गाई, वास्ने, स्त्री, पुरुष, मुले, सर्वांनाच आनंद झाला, असे तुकाराम महाराज म्हणतात. ४ ११०६ जाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणीं घरी पीक¹ गाई वोळल्या म्हैसी ॥ १ ॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये । दळितां कांडितां जेवितां गे वाइये ॥ २ ॥ स्वप्नीं हो दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरे भय सुटले काळा ॥ ३ ॥ तुका म्हणे रामें सुख दिलें आपुले । तयां गर्भवासी येणे जाणे खुंटलें ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - वोळल्या-दूध देत्या झाल्या अर्थ - आता रामाचे राज्य झाले असल्यावर मग आम्हास काय कमी आहे? पृथ्वीवर उत्तमपैकी पीक वेळच्या वेळी येत राहिले. गाई म्हशी पुष्कळ दूध देत्या झाल्या १ आता या रामाचे ध्यान आम्ही आमच्या ओवीत रोज रोज गाऊ दळताना, कांडताना, जेवण करिताना, याच रामनामाचा जप आम्ही करीत राहू. २ स्वप्नातसुद्धा कुणासही दुःख दिसेनासे झाले. रामनामाच्या गजरामुळे प्रत्यक्ष यमासही भीतीने थरकाप सुटला. ३ तुकाराम महाराज म्हणतात, या रामचंद्रानी आपले स्वसुख सर्वांना दिले असल्याने, त्याच्या गर्भवासाचे दुःख संपले आहे, असे समजावे. जन्ममृत्यूच्या फेरा त्याना पडत नाहीत. ४ ११०७ अहल्या जेणे तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥ १ ॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ २ ॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाशभवानी ॥ ३ ॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ऋषि ॥ ४ ॥ नामजप बीजमंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥ ५ ॥ नामजप जीवन मुनिजना । तुक्यास्वामी रघुनंदना ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - शूळपाणी-ज्याच्या हातात शूल आहे असा शंकर, भवानी-पार्वती अर्थ - या रामनामाचे महत्त्व किती मोठे आहे पाहा या रामनामामुळे अहल्येचा उद्धार झाला. गणिका याच नामामुळे उद्धरून गेली १ अशा या रामाच्या नावाचा, रामहरे रघुराजहरे असा जप एकसारखा करा ना. २ याच रामनामाचा जप केला, तेव्हा समुद्रमथनाच्या वेळी निघालेल्या हलाहल विषामुळे ज्याच्या कंठाची आग होत होती, त्या महादेवाचा कंठ शीतल झाला याच रामनामाच्या जपामुळे पार्वतीदेवीसही अविनाशी पदाची प्राप्ती झाली. ३ काशीस राहून याच तारकमंत्राचा उच्चार केला असता, सर्वांचा उद्धार होतो. याच नामाचा जप वाल्मीकी ऋषींनी करून स्वतःस पावन करून घेतले. ४ नळ नावाच्या वानरास हाच एक नाममंत्र बीजमंत्र म्हणून मिळाला होता. याच रामनामाच्या सामर्थ्यामुळे समुद्रावर निर्जीव दगडसुद्धा तरले. ५ मुनिजनानाही याच रामनामामुळे जीवन कृतार्थ वाटते. या तुकयाचाही स्वामी हाच थोरघुनंदन आहे ६ ११०८ मी तो अल्प मतिहीन । काय वर्णूं तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ॥ १ ॥ नाम चांगले चांगलें । माझे कंठीं राहो भले । कपिकुळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसां ॥ २ ॥ १ पिका
सार्थ तुकारामगाथा ४९३ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥ ३ ॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीर्ति वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंतें काशानें ॥ ४ ॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- मतिहीन-बुद्धीहीन, राजीवलोचन-कमळाप्रमाणे डोळे असणारा. अर्थ :- माझी बुद्धी तर अतिशय तोकडी आहे. रामराया, मी तुझे वर्णन काय करावे ? पाण्यामध्ये दगड तारण्याचे सामर्थ्य तुझ्या नामामध्ये आहे. १ रामचंद्रा, तुझे नाम अतिशय चांगले व पवित्र असल्याने ते नेहमी माझ्या मुखात राहो. या तुझ्या नामानेच सर्व वानरकुळांचा उद्धार झाला असून राक्षसांनाही तूच मुक्त केलेस. २ हनुमंतांच्या हातून द्रोणागिरी पर्वत आणण्याचे महत्कार्य रामचंद्रा, तुम्हीच करविले. भरतभेटीच्या वेळी तुम्ही मोठीच कीर्ती करून दाखविली. ३ गौतमाच्या शापाने दगड होऊन पडलेली अहल्या तुमच्याच प्रभावाने मनुष्यरूप झाली. अशी तुमची कीर्ती अतिशय थोर व वाखाणण्यासारखी आहे. सर्व लंकेचे दहन रामचंद्रा, तुमच्याच बळावर हनुमंताने केले. ४ असा हा श्रेष्ठ रामचंद्र सीतादेवीचे जीवनच असून योगीजनांचे ध्यान आहे. या रामाचे डोळे कमळांप्रमाणे आहेत. हा तुकाराम त्याचे चरण मनापासून धरून ठेवीत आहे. ५ विवरण :-तुकाराम महाराजांनी गाइलेल्या या रामचरित्राचे महत्त्व विशेष आहे. श्रीविठ्ठल हे दैवत वारकरी पंथीयांना व नामदेवतुकारामादी संतांना अतिशय प्रिय आहे. हे श्रीकृष्णाचे म्हणजे विष्णूचेच रूप होय. रामचंद्र हाही विष्णूचाच अवतार होय. त्या दृष्टीने रामचंद्राचे व त्याच्या नामाचे माहात्म्य वारकरी संतांना विशेष वाटणे स्वाभाविकच आहे. त्याच्या मंत्रात राम हेच नाम अगोदर आहे. 'राम कृष्ण हरि' या मंत्राची महिती मराठी साधुसंतांनी व विठ्ठलभक्तांनी अनेक प्रसंगी गाइलेली आहे. तुकोबांनी या रामचरित्रपर अभंगातून रामाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. वाल्मीकीच्या रामायणानंतर रामकथेवर इतरही कवीकडून जे अनेक संस्कार झाले, त्याचा प्रभाव तुकोबांच्या मनावर असावा असे दिसते. रामनामानी जड दगड पाण्यावर तरले, राम व रावण यांच्यात काही 'प्रेमसुखाचें संधान' असल्याने त्यांनी एकमेकांचे बाण बाणांनीच निवारण केले. प्रभू रामचंद्राकडूनच आपणास मृत्यू येऊन आपणास मुक्ती मिळावी अशा हेतूने, विरोधी भक्ती करूनच रावण रामचंद्राकडे आकर्षित झाला होता, वगैरे कल्पना पुढे भक्तीच्या क्षेत्रात बलवान ठरल्या. ऐतिहासिक वस्तुस्थितीच्या दृष्टीने रामकथा पाहण्यापेक्षा, भक्तिभावाच्या परिपुष्टतेसाठीच त्या चरित्रकथेचा उपयोग पुढे पुढे होत राहिला. अध्यात्मरामायणाचा प्रभाव भक्तिमार्गावर पुढच्या काळात विशेष रूपाने पडला असल्याचे स्पष्ट आहे रावणाच्या वधानंतर रामचंद्रांनी स्वतः लंकेवर राज्य केले नाही. बंधू लक्ष्मण याजकडून त्यांनी रावणाचा बंधू विभीषण याला राज्यावर बसविले ! हा भारतीय संस्कृतीचा एक आदर्श मानावयास हवा. कारण लंकेवर स्वारी ही अन्यायाच्या परिमार्जनार्थ होती. मदोन्मत्त रावणशक्तीचा नाश करण्यासाठी तो एक महान प्रयत्न होता. ऋषीमुनींचे यज्ञयाग सुरक्षित राहावेत व अबलांच्या शीलाचे रक्षण व्हावे, म्हणून ती एक योजना होती. स्वतःच्या लहरीसाठी या बडेजावासाठी साम्राज्यविस्तार करण्याची ती महत्त्वाकांक्षा नव्हती, ती बेताल लालसा नव्हती. मानवी संस्कृतीच्या इतिहासात 'लंकाराज्यें विभीषणा । केली चिरकाल स्थापना' हे एक लोकोत्तर व प्रगल्भ मनाचे कृत्य मानावे लागेल. तुकोबांनी केलेल्या रामराज्याच्या सुखाच्या वर्णनासही रामायणात भरपूर आधार सापडण्यासारखा आहे. अभंगक्रमांक ११०७ मध्ये तुकोबांनी 'रामजप बीजमंत्र नळा' असा एक महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. यातील नळ हा प्रसिद्ध नळ राजा न मानिता रामाच्या सैन्यातील एका वानराचे नांव नल होते, हाच संदर्भ महत्त्वाचा
४१४ सार्थ तुकारामगाथा
मानणे भाग आहे हवी ती वस्तू निर्माण करण्याची शक्ती याला वरप्रसादामुळे प्राप्त झालेली होती रामाच्या आज्ञेवरून यानेच सेतूवधाचे काम पूर्ण केले, म्हणून या सेतूस नलसेतू असेही नाव आहे या नलाने जाह्नवी नदीत एका ब्राह्मणाचे अनेक शालिग्राम विसर्जन केले होते त्यावेळी त्या ब्राह्मणाने 'तुझ्या हातून पाण्यात दगड तरतील' असा वर त्याला दिला होता म्हणूनच याच्या हातून सेतू पूर्ण झाला रामनाम हे बीजमंत्राने उपयुक्त आहे मनातील सर्व कामना या नामजपामुळे मिडीस जातात, अशुभाचे निवारण होते, संकटाचा परिहार होतो, पातकाचा नाश होतो, प्रत्यक्ष यमाम दरारा वाटतो, वगैरे रामनामजपाचे माहात्म्य संस्कृत, मराठी अशा ग्रंथातून पुष्कळानी वर्णन केले आहे 'एकैकमक्षर पुसा महापातकनाशनम् ' एकाच अक्षर पापनाश करणारे आहे याचे वर्णन केले जाते अशा या रामनामाचा व रामजपाचा प्रभाव किती मोठा आहे, हे अनेक ग्रंथातून व स्तोत्रातून प्रकट झालेले आहे रा या अक्षराचे रहस्य काय ? म या अक्षराचे रहस्य काय ? आकारातील अर्धचंद्र व त्यावरील बिंदू यात 'राम ही अक्षरे कशी आहेत ? यासारख्या रहस्यमय वर्णनाचेही नमुने पुराणातून व उपासनापर वाङ्मयातून पुष्कळ मिळतात ' श्रीराम' मधील श्री म्हणजे लक्ष्मी, राम म्हणजे आत्मा, जयजय म्हणजे ३६ या अंकाचा वाघ, ३६ म्हणजे छत्तीस तत्त्वानी युक्त असणारा हा देह, इत्यादी वर्णने मंत्रशास्त्रास धरूनही पुष्कळानी केलेली आहेत रामनामाचा मंत्रशास्त्रदृष्ट्या जो काय अर्थ होत असेल, तो कितीही महत्त्वाचा असला तरी, भागवत धर्मीय संतानी त्याच्या जपाचे महत्व चित्तशुद्धीसाठी, स्वानुभवाच्या सुखासाठी, नामस्मरणाच्या आनंदासाठी रामनामाच महत्त्व मान्य केले आहे याच हेतूने तुकोबानी 'रामनामाचे पोवाडे । अखंड ज्याची वाचा पडे । धन्य तो एक संसारी रामनाम जो उच्चारी' (अभंग क्र ४४४१ ) अशा शब्दात रामनामाचे महत्त्व स्पष्ट केले आहे मागे ४१२ क्रमांकाच्या अभंगात 'रामनाम दोन्ही अक्षरें । सुलभ आणि सोपारें' म्हणून जो उल्लेख केलेला आहे तोही याच संदर्भात महत्त्वाचा मानावा लागेल याच भूमिकेवरून साधुसंतानी रामाचे व रामनामाचे महत्त्व मानले आहे तो विठ्ठलाहून वेगळा नाही त्याच्याच नावाशी रामनाम जोडून देऊन एकत्वाचाही बोध सहजगत्या देण्याचा प्रयत्न संताचा होता दैवत नामरूपानी भिन्न असले तरी, बोधाने, तत्त्वरूपाने त्याचे स्वरूप एकच होते याच दृष्टीने एक नाथानी 'भावार्थरामायणा' सारखा ग्रंथ लिहिलाच, 'श्रीरामनाममहिमा' असे एक स्वतंत्र प्रकरण रामनामाच्या माहात्म्यासाठी लिहिलेले आहे त्यात 'सोपारे मंत्र राम अक्षरें दोन्ही । जपता चुके आयनी चौऱ्याशीची', 'सुख रामनामें अपार । शंकर जाणे तोचि विचार', 'रामनाम उच्चार होतों । संसाराशी होय तुटी', 'धन्य मज रामनाम । उच्चारिता होय सकाम', 'जपता रामनामावळी । महादोषा होय होळी' यासारख्या अनेक ओळींतून एकनाथानी रामाचे माहात्म्यकथन केले आहे 'रामकृष्णहरि' याच एका बीजभूत मंत्रात वारकरी पंथीयाची सर्व साधना एकवटलेली आहे यातील मर्मही हेच होय की राम व कृष्ण हे एकच व त्याच्या नामजपाने नामस्मरणाने सर्व काही साध्य होते, अशी त्याची निष्ठा होती ईश्वरापेक्षाही त्याच्या नामाचा महिमा कित्येकदा संतानी मोठा मानलेला आहे
श्लोकरूपी अभंग— ६
११०९ तुजवाचुनी मागणे काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पूरवू कोण जाणे । तुजवाचुनी होत का रावराणे ॥ १ ॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोका । भवतारकू तूजवाचुनि एका । मनीं मानसीं चिंता रूपनाम । पळे पाप ताप भयें नास' काम ॥ २ ॥ हरी नाम हे साच तूझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करू मुखवाणी कैशी देशधडी । तुजवाचुनि वाणिता व्यर्थ गोडी ॥ ३ ॥
१ नासे काम
सार्थ तुकारामगाथा ४९५ भवभंजना व्यापका लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी ॥ असो भावे जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काई ॥ ४ ॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पांयि तो राख देवा । असे मागतसे तुझी चरणसेवा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- महोमंडळी-भूतलावर, रावराणे-श्रीमंत, भवतारक-संसारसागरातून तारून नेणारा, हरी-दुःख हरण करणारें, भवभंजना-संसारभावनेचा नाश करणारा, शेषफणी-शेष नावाचा नाग. अर्थ :- देवा, तुझ्याशिवाय इतर कुणास आम्ही काय मागावे ? विश्वाला व्यापून राहणाऱ्या देवा, या पृथ्वीवर तूच एक समर्थ असा आहेस. तुझ्यावाचून आम्हा जीवाच्या भावना कोण पुरवू शकणार रे देवा ? तुझ्याच कृपेने लोक श्रीमंत राजे वगैरे होतात १ या तीनही लोकात देवा, तुझ्याशिवाय मोक्ष देणारा कुणीही नाही. संसारातून तारणाराही तुझ्याखून कुणीही नाही. तुझ्या नामाचे व रूपाचे मनात चिंतन केले म्हणजे पाप व ताप पळून जातात. तुझ्या भयाने कामादिक वृत्तीं उरत नाहीत २ दुख हरण करणारा म्हणून तुझे नाव हरी, असे जे पुराणांत वर्णन केले आहे ते खरेच आहे. काळाच्या व गर्भादियोनींतून होणाऱ्या जन्माचा सर्व कारभार या श्रीहरीच्या हातातच असतो. तुझ्या नामास न उच्चारिता देवा, ही माझी वाणी देशोधडीस कशी पाठवू ? तुझे गोड गोड जर तिने वर्णन केले नाही तर सर्वच व्यर्थ आहे. ३ संसारवृत्तीचा नाश करणारा असा तू असून तिन्ही लोकांना तू भरून राहिलेला आहेस तुझे वर्णन करताना शेष नावाचा नागही थकून गेला. हा माझा जीव सर्व भावानी तुझ्याच पायी देवा, अर्पण केला आहे. याशिवाय दुसरे काही मागणे व्यर्थपणे मी कशासाठी करावे ? ४ देवा, तू दीनानाथ आहेस, अशी साक्ष सर्व लोकांना पटलेली आहे. तू अनेक दीन, पातकी व दोषी असणाऱ्या लोकांचा उद्धार केला आहेस. देवा, हा तुकाराम तुझ्या पायी शरण आला आहे, त्याचेही रक्षण करावेस तू, तो तुझी चरणसेवा मागीत आहे ५ १११० उभा भींवरेच्या तिरीं राहिलाहे । असे सन्मुख दक्षिणे मूस वाहे । महापातकांनो पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामबीर ॥ १ ॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । लागले मुनिवरा हे गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥ २ ॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा धाययातो उदार । जया वोळगती सिद्धि सर्वठायीं । तुझें नाम हे चांगले गे विठाई ॥ ३ ॥ असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हे धरुनि भक्तिलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । थिटो माठली हे सिद्धसाधकांची ॥ ४ ॥ करा ये गुहा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुज्ञा तेंच साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आले । असे विश्व हे जीवनें त्याचि ज्यालें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - भीवरेच्या-भिदरा नदीच्या काठावर, पळ काप-थरकाप, खंती-काळजी, वोळगती- प्राप्त होतात, कटसूत्र-करगोटा, कटीवर हात ठेवून, ज्याले-जिवंत राहिले अर्थ :- हा श्रीविठ्ठल देव भिवरा नदीच्या काठावर उभा राहिलेला असून त्याच्या समोरही भिवरा नदी दक्षिणमुखी होऊन वहात आहे. याच्या नामामुळे महापातकांना सुद्धा मोठा थरकाप भरतो. या विठ्ठलाचे नामवीर, नामघोष करणारे थोर पाहा कसा नामाचा घोष करीत आहेत. १ हा देव गुणगंभीर असून मोठ्या धैर्याचा आहे. याच्या मुखावर हास्य आहे. अमृताप्रमाणे सुखदायक वाटणारे शब्द हा आपल्या मुखाने बोलत असतो सर्व मुनि- श्रेष्ठांच्या चित्तात याचेच गोड रूप स्थिर झाले आहे. याची देहभावना सुटून सर्व काळज्या यांच्या दूर झाल्या आहेत. २ या भूतलावर हा मोठा थोर कीर्तिचा आहे, असा याचा गौरव सर्वत्र झालेला आहे. भक्तांना त्याच्या इच्छेप्रमाणे
४९६ सार्थ तुकारामगाथा दान देण्यासाठी हा उदार असतो याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात विठाईमाउली, तुझे नाम फारच चांगले आहे ग ३ हा विठ्ठल विटेवर उघडा होऊन उभा आहे त्याने आपले हात कमरेवर ठेविले असून त्याला भक्तीचा लोभ मोठाच आहे भवसागरातून तरून जाण्याची पुढची वाट हा भक्तांना दाखवीत असतो अनेक सिद्धांची व साधवांची ही विठाई माउलीच आहे ४ चला, लौकर त्वरा करून या पथाचा स्वीकार करा ज्या सुखाला सीमा नाही, तेच सुख प्रथम साधा तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरपुरांस सर्व प्रकारची सुखे आलीच आहेत त्याच्यामुळेच हे विश्व जिवंत राहिलेले आहे ५ ११११ धना गुंतले चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडता न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी ते तृप्त नाहीं ॥ १ ॥ न दिसे शुद्ध पाहाता निजमती । पुढे पडिलो इंद्रिया थोर घातीं । जिवा नास त्या संगतीं दड बेडी । हरी शीघ्र या दृष्टसंगासि तोडीं ॥ २ ॥ असों आणिके काय सांगो अनंता । मोहो पापिणी दृष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवाचुनी सोडवी कोण हरी ॥ ३ ॥ निज देखता निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ या भीत आहे । तया वस्ति देहीं नको देउ देवा । तुजवाचुनी आणिक नास्ति हेवा ॥ ४ ॥ करों घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भक्ति दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायि माथा ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - मुरारी-मुर नावाच्या दैत्याचा पराभव करणारा, श्रीकृष्ण, मही-पृथ्वी, दृष्टसंगासि- दुष्ट अशा सोवतींस, नास्ती हेवा-हाव नसो, मोकलू-दूर सारू नकोस अर्थ - हे मुरारी, माझे चित्त धनाच्या आशेत गुंतून राहिले आहे अशा या लोभी मनास बरोबर घेऊन मी दारोदारी हिंडत आहे हिंडून हिंडून हे मरत आहे पण यास काही पुरे पडत नाही याची काही तृप्ती होत नाही याच्या लोभापुढे सारी पृथ्वी ठेंगणी झाली तरी, हे तृप्त झालेले नाही १ माझी बुद्धी तशी पाहिली तर, काही शुद्ध नाही इंद्रियसुखांच्या मोठ्याच संकटातही पुढे मी अडकून पडलो त्याच्या संगतीत माझ्या जीवाचा नाश मात्र होत राहिला मोठाच घात झाला त्याच्या दडात व बेडीत फार त्रास झाला श्रीहरी, या दुष्ट संगतीस तू लौकर तोडून टाकावेस २ अशा दशांचे आणखी अनंता, तुला काय सांगावे ? हा पापी मोह आणि ही पापिणी व दुष्ट माया ममता यानी मला गांजले आहे फार काम क्रोध याच्याही यातना फार मोठ्याच आहेत या सर्वांतून श्रीहरी, तुझ्या वाचून मला सोडविणार कोण आहे ? ३ निजसुखास मी पाहण्याची इच्छा करीत आहे, तो ते सुख दूर दूरच जात आहे निद्रा, आळस, दंभ याना देवा, मी भीत आहे माझ्या या देहात त्याना वस्ती करू देऊ नकोस देवा, तुझ्या- शिवाय मला आता दुसऱ्या कशाचीही हाव नाही ४ माझ्या मनात घातपाताची शंका येऊन मोठी लाज निर्माण होत आहे माझ्यापासून भक्तिभाव व सत्यवृत्ती या गोष्टी दूर दूर होत आहेत असे वाटते दीनाचा बंधू असणाऱ्या देवा, या अनाथास तू दूर सारू नकोस हा तुकाराम तुझ्या पायावर विनंती करून डोके ठेवीत आहे ५ १११२ पैल सायळें तेज पुंजाळ कंते । सिरों खुर्बिली साजिरीं मोरवीसे' । हरे त्यासि रे देखता ताप माया । भजा रे भजा यादवा योगिराया ॥ १ ॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार ह्या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रूपा मीनली साजिरी माळकंठीं ॥ २ ॥ १ मोरपीसें
सार्थ तुकारामगाथा ४९७ असे यांदवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया' वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्याती । पाहा सांवळें रूप हैं पावनासी ॥ ३ ॥ कसीं पाऊलें साजिरीं कुंकुमाचीं । कसी वीट हे लाधली देवांची । जया चिंतितां अग्नि हा शांति नीवे । घरा मानसीं आपला देहभाव ॥ ४ ॥ मुनो' देखतां मुग्ध हैं चित्त ध्याय । देह मांडला भाव हा बापमाय । तुक्या लागलें मानसीं देवपिसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका :- पैल-पलीकडे, पुंजाळ-चमकणारे, तुदिशी-शोभलेली, मोरखीसे-मोरपिसे, वळा-तेज अर्थ :- पलीकडे सावळ्या रंगाचे तेज पाहा कसे चमकणारे दिसत आहे ! त्याच्या डोक्यावर मोरपिसे शोभलेली आहेत. त्याला पाहताच मनातील पापताप दूर होतात. या योगिराज यादवास सर्वजणांनी भजावे, त्याचीच भक्ती करावी. १ याला सोळा सहस्र कुमारी लुब्ध झाल्या. त्या गोपकन्या अतिशय दिव्य व सुकुमार होत्या. त्यांच्या मध्यभागी हा कोटीचंद्राच्या तेजाप्रमाणे शोभिवंत दिसतो याच्या गळ्यात शोभून दिसणारी माळ त्याच्या रूपात विरून जाते. २ सर्व यादवांच्यात हा चक्रपाणी श्रीकृष्ण श्रेष्ठ आहे, तीनही लोकातील तेहतीस कोटी देव त्याला वंदन करतात. महाकाळाप्रमाणे असणारे दैत्य याला पाहून कापू लागतात. पापाचा नाश करणारे, असे हे सावळे रूप तुम्ही मन लावून पाहावे ३ याची गोजिरवाणी पावले पाहा कशी कुंकुमाच्या रंगाची असून शोभिवंत आहेत याला दैववान अशी ही वीट कशी लाभलेली आहे याचे चिंतन करताच अग्नीसुद्धा शांत होऊन निवून जातो तुम्ही आपल्या मनास, आपल्या देहभावास मान जपावे ४ सर्व मुनीलोक सुद्धा याच्याच मुखाचे ध्यान आपल्या चित्तात करतात या देहातील भाव याच मायबापासाठी मी अर्पण केला आहे. या तुकारामाच्या मनास याच देवाचे वेड लागलेले असून हे चित्तचोरटे व सावळे रूप माझ्या मनात स्थिर असावे. ५ १११३ असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापूनी अग्नि हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबले बिंब हे ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥ १ ॥ तन वाटितां क्षीर हैं होत नाहीं । पशु भक्षितां पालटे तेंचि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापूनी अंतर्वाहि ॥ २ ॥ फळ कर्दळी शेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं तें याउगे धीग जालें । फळ पुष्पना यत्न ते व्यर्थ गेले ॥ ३ ॥ असे नाम हे दर्पणे सिद्ध केलें । असे बिंब तें या मळा आड ठेलें । कसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप । नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥ ४ ॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां । तुका वीनवितो पढों काय पायां । तुज पुत्र द्वारा धन वासना हे । मग उरलें शेवटीं काय पाहे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीका :- नासु-नाश, तन-गवत, धीग-ढीग, पुष्कळ, दर्पणे-आरशाने अर्थ -हा श्रीहरी सर्व जीवात निवास करून आहे लाकडामध्ये अग्नी सुप्त स्थितीत ज्याप्रमाणे असतो, त्याप्रमाणे याचा वास सर्व वस्तूत असतो. घटामध्ये, आकाशाचे बिंब जसे पडावे, तसे याचे बिंब प्रत्येक ठिकाणी पडलेले आहे. घराचा, शरीराचा नाश झाला तरी, या बिंबाचा, चैतन्यतत्त्वाचा नाश कधी होत नाही १ गवत वाटून पाटून कितीही पेतले तरी, त्याचे काही दूध होणार नाही, पण गाईम्हशीने ते गवत खाताच त्याचे स्वरूप पालटून त्याचे उत्तम दूध तयार होते. याचे वर्म जाणणारा तोच एक श्रीहरी आहे. सर्व वस्तुमात्रात अंतर्बाह्य असा तोच व्यापून १ तया, २ मनी. तु गाथा ६३
आहे २ कदळीला, केळीला फळ शेवटी शेवटी येते पण आधीच त्या फळास शोधण्यासाठी तिच्या गाभ्याच्या पोकळीत पाहिले तर काय दिसणार आहे ? ज्याला धीर नाही त्याने पुष्कळ केले तरी ते व्यर्थच होते फळ व पुष्प याच्या साठी प्रयत्न करून काही उपयोग नसतो ३ दपणान, आरशाने आपले नाव सिद्ध केले आहे त्याच्या योगान दर्प म्हणज अहकार वाढतो या अहंकाररूपी मळाच्या आतच या श्रीहरीचे बिब आहे आपले आचरण जर शुद्ध नसते तर त्याचे हे निजरूप त्या दर्पणात कसे दिसेल ? ते दिसावे यासाठी पापपुण्याचा पसारा मात्र वृथा वाढवू नका ४ या श्रीहरीचे खरे वर्म माहीत करून घ्या उगाच विनाकारण सोंगढोंग करू नका हा तुकाराम विनवणी करुन तुमच्या पायावर पडत आहे तुम्हास जर धन, पत्नी पुत्र याचीच केवळ वासना असेल तर मग या जीवनात काय शेवटी उरले ते तूच सावध होऊन पाहावेस ५
१११४ मना सांडि हे वासना दुष्ट खोडी । मतीं मानसीं एक हे ध्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज काहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हे पायिं सूख ॥ १ ॥ ऐसा सद्भावे तुज शरण आलो । देहदुःख हे भोगिता फार भ्यालो । भवतारिते दुसरे नांहीं कोणी । गुरु होत का देव तेहेतीस तीन्ही ॥ २ ॥ जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती तेचि सोये । करीं सर्व सगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥ ३ ॥
शब्दार्थ व टीपा - मतीं-बुद्धी मानसीं-मनात
अर्थ - मना, दुष्ट वासना व वाईट खोडी याचा तू त्याग कर नेहमी मनात व बुद्धीत याचीच गोडी असण व्यर्थ आहे माझ्या हिताची व तुझ्या हिताची गोष्ट एकच आहे तू या विठ्ठलाचे पाय धरावेस यात सब सुख आहे १ मना असा मी आता सर्व भावे तुला शरण आलेलो आहे या देहाची दुख भोगून मी फारच दमून गेलो आहे संसारातून तारणारे मला दुसरे कुणीही नाही तेहेतीस कोटी असे तीनही लोकाचे देव जरी गुरु असले तरी त्याचाही उपयोग होत नाही २ या सब लोकाना धनाची इच्छा फार असते मना, तुलाही तीच संगत आवडते पण तू सब संगतीचा त्याग करून या विठ्ठलचरणी लीन व्हावेस अशी विनंती मी तुझ्या चरणो मस्तक ठेवून करीत आहे ३
विवरण - श्लोकातून बोध देण्याचा प्रयत्न तुकाराम महाराज यानी वरील सहा अभगात केलेला आहे रचनचा घाट रामदासाप्रमाणे गद्यप्राय असून रचना वृत्तदृष्ट्या अतिशय शिथिल अशी दिसते तुकोबाच्या अभगातील रंग अर्थातच या श्लोकातून नाही भुजगप्रयातासारख वृत्त वापरण्याचा हा एक त्यानी प्रारंभी प्रारंभी प्रयोग करून पाहिला असावा बहुतक सर्व अभगातून श्रीविठ्ठलाचेच गुणवणन असून एखाद्यादुसऱ्या श्लोकात मनास बोध आहे 'मना सांडि हे वासना दुष्ट खोडी' या सारख्या ओळीवरून रामदासाची आठवण होत
१११५ सुटायाचा काहीं पाहातो उपाय । तो हे बेखें पाय गोवियेले ॥ १ ॥ एसिया दुःखाचे सापडलो सबो' । हारपली बुद्धि बळ माझें ॥ २ ॥ प्रारब्ध नियमाण संचिताचे । वोढत ठायींचे आलें साचे ॥ ३ ॥ विधिनिषेधाचे सापडलो चपे । एके एक लापे निवडेना² ॥ ४ ॥ सारावे ते वाढे त्याचियाचि अगें । तृष्णचिया संगें दुःखी जालों ॥ ५ ॥ तुका म्हणे आता करीं सोडवण । सर्वशक्तिहीन जालो देवा ॥ ६ ॥
शब्दार्थ व टीपा -गोवियेले-गुतले गेले सबों-संधीत पंचात चपे-कटकटीत १ संधी, २ सापडना
सार्थ तुकारामगाथा ४९९ अर्थ - संसारपाशातून सुटण्याचा उपाय जो जो मी शोधू लागतो, तो तो त्यात अधिकच गुंतून जात आहे त्यात माझे पाय अधिकच गुंतले गेले आहेत १ अशा या दुःखाच्या पेचात मी सापडलो असून माझी सर्व बुद्धी व माझे सर्व बळ संपत आले आहे २ प्रारब्ध, क्रियमाण व संचित याच्यामुळे जो जो कर्मे भोगावी लागणार आहेत, ती ती खरोखर माझ्या मागे धावतच आली आहेत ३ विधिनिषेधाच्या कटकटीत मी सापडलो असून, एक संपविले की दुसरे निर्माण होऊन मी त्यातून काही मोकळा होत नाही मला त्याची निवडही करता येईनाशी झाली आहे ४ ज्याचा निषेध करावा व दूर सारावे त्याचीच वाढ माझ्या अंगात होते अशा या तृष्णेच्या वाढीमुळे मी अतिशय दुःखीकष्टी झालो आहे ५ तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता तूच माझी मुक्तता या संसारपाशातून कर. कारण मी आता सर्व शक्तींच्या विरहित असा दुबळा झालो आहे ६ १११६ भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥ १ ॥ ऐसा पडिलों फाचणी । करीं धावा म्हणउनी ॥ २ ॥ विचारितों कांहीं । तो हैं मन हातीं नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । येयें न पुरे रिघावा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - पर-परंतु फाचणी-फाचात, पेचात रिघावा-प्रवेश अर्थ - या संसारपाशाचे देवा, मला फार भय वाटते हा संसार सुटता सुटत नाही १ अशा मोठ्या पेचात मी पडलो असून देवा, माझ्यासाठी तुम्ही सत्वर धावून यावे २ मी स्वतःच्या मनाशी पुष्कळच विचार करून पाहतो, पण माझे मन काही माझ्या हाताशी लागत नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात, देवा या मनाच्या ठिकाणी काही माझा प्रवेश नीट होत नाही ४ १११७ येगा येगा पाडुरंगा । घेई उचलूनि वोसंगा ॥ १ ॥ ऐसी असोनिया वेसी । दिसतो मी परदेसी ॥ २ ॥ उगवूनि गोया । सोडवूनि न्यावे देवा ॥ ३ ॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसे नाहीं ॥ ४ ॥ तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - वोसगा-पदरामध्ये, वेसी-जवळच आश्रयाने, उगवूनि-गोडवून, गोवा-गुंतगुंत अर्थ - पांडुरंगा, तू सत्वर धावून ये ना मला उचलून तू आपल्या पदरात घे १ मी असा अगदी तुझ्या जवळच आश्रयास असूनही परदेशी झाल्यासारखा आहे २ देवा, या प्रपंचाची गुंतणूक सोडवावी व मला यातून तुम्ही मुक्त करावे ३ तुकाराम महाराज म्हणतात, हे हृषीकेशी उगाच उशीर का करीत आहात ? ४ १११८ माझी विठ्ठल माउली । प्रेमपान्हा१ पान्हायली ॥ १ ॥ कुर्वाळुनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ २ ॥ केली पुरवी लाळी । नव्हे निष्ठुर कोवळी ॥ ३ ॥ तुका म्हणे घास । मुखीं घाली ब्रह्मरस ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा -- न वजे-जात नाही, आळी-हट्ट अर्थ - ही माझी विठाई माउली किती प्रेमळ आहे पाहा ही माझ्यासाठी प्रेमाच्या पाल्हाने पान्हायलेली आहे तोच मजसाठी उत्सुक आहे १ ती मला स्वतःच्या हळुवार हाताने कुरवाळिते व मग आपल्या स्तनांशी लाविते कृपेचे दूध मला पाजते व मग एक क्षणभरही माझ्यापासून दूर जात नाही २ मी जो जो हट्ट करीत असतो, १ प्रेमें पान्हा
५०० सार्थ तुकारामगाथा तो तो ती पुरवीत असते तो मनाने निष्ठुर मुळीच नसून अगदी कोमल वृत्तीची आहे ३ तुकाराम महाराज म्हणतात, ही माझी विठाई माउली माझ्या मुखात ब्रह्मरसाचा घास घालीत असते ४ विवरण - तुकाराम महाराजाचा हा अतिशय गोड अनुभूतीचा एक छोटा, परंतु सर्वोत्तम मुलाची प्रचीती देणारा असा अभंग आहे सर्व चिंता मिटल्या, मनाची तळमळ धावली, तळमळ दूर झाली संशय फिटले, मी पातकी, अपराधी, ही वृत्ती कमी झाली की, मग एखादा क्षण असा येतो की, ईश्वर दूर नसून आपल्यात आहे असे पटू लागते श्रीविठ्ठल किती कनवाळू आहे! आपण जितके त्याच्यासाठी आतुर आहोत, त्याहीपेक्षा तो आपल्याविषयी जास्त उत्सुक आहे, असे मग ध्यानात येते त्याला खरी प्रेमाने हाक मारणारी मुले कुठं आहेत? कुणी खऱ्या प्रेमाने आप णास विचारीत आहे काय ? अशाच शोधात ता नेहमी असता, आणि तुकाराम महाराजांसारखा एवढा भक्त दिसला की मग त्यालाही मोठेच समाधान लाभते ता त्या भक्ताचं सर्व काही करीत असतं! त्या विठाई माउलीचा प्रेमपान्हा मग तिलाच आवरेनासा होतो चट्कन कुरवाळून ती आपल्या लाडक्या भक्ताला जवळ घेते व त्याला प्रेमाने स्तंनाशी लावते त्याच्याजवळवून मग कधीही दूर जावच नाही जो हट्ट ह मूर करील तो ती पुरवीत असतं ही माय निष्ठुर नसून मनाची अत्यंत बावळी आहे, अशी प्रचीती मग येत असतं ब्रह्मरसाच्या घासाने मग भक्त तृप्त होऊन जातो अशा मोठ्या उदात्त व सत्तापित वृत्तीचा हा लहानसा अभंग मोठ्या गोड भावाचा म्हणून लक्षात राहण्यासारखा आहे विठ्ठलाचे दयालुत्त्व व भक्ताविषयीचे वात्सल्य, याचे मोठे रेखीव व हृदयावर उमटणारे चित्र या अभंगात आहे १११९ आम्ही उतराई । भाव निरोपूनि पायीं ॥ १ ॥ तुम्ही पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ २ ॥ आमचा हा नेम । तुम्हा उचित हा धर्म ॥ ३ ॥ तुका म्हणे देवा । जाणो सांगितली सेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- आळी-हट्ट अर्थ - आमच्या मनाचा भाव देवा, तुमच्या जवळ सांगून आम्ही आता उतराई झालेलो आहोत आमच्या कडून काही करावयाचे असे आता राहिलेले नाही १ आता आम्ही लडिवाळ भक्तानी जे जे हट्ट करावेत, ते ते तुम्ही पूर्ण करावेत, एवढीच पायाशी देवा, विनवणी आहे २ अशा प्रकारे नाना हट्ट करणे, हा आमचा स्वभावधर्म आहे व तो पुरविणे हे तुमचे उचित असे कर्तव्यच आहे ३ देवा, तुम्ही जी सेवा करायला मला सांगितली आहे, ती मी जाणून आहे ४ ११२० केलें पाप जेणे दिलें अनुमोदन । दोघासी पतन सारिखेंच ॥ १ ॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ २ ॥ देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावे निमित्ता थेंक म्हणून ॥ ३ ॥ तुका म्हणे जोडे केल्याविण कर्म । देखतां१ तो श्रम न मनिता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अनुमोदन-होकार, पाठिंबा, ओढाळ-आडाळ जनावर अर्थ - एखाद्याने एखादे पापकाम केले व दुसऱ्याने त्याला उत्तेजन दिले, तर दोघांनाही सारख्याच योग्यतेचे पतन आहे दोघेही तितकेच दोषी आहेत, असे समजावे १ लोण्यामध्ये थोडे जरी विष घातले तरी, सर्व लोणी त्याच्या संगतीने विषमय होऊन जाते म्हणून दुर्जनाचा सवस्वी त्याग करणे, यातच हित असते २ एखादे जनावर ओढाळ असून शेताच्या बाधाशी असेल, अथवा त्या दिशेने निघाले असेल, तर त्याला हांक हांक म्हणून आपण आपले १ नेणती तो
सार्थ तुकारामगाथा ५०१ कर्तव्य केल्याचे चुकू नये ३ तुकाराम महाराज म्हणतात, एखादे कार्य करण्यातच श्रम आहेत, असे पाहून ते कार्य केल्याशिवाय का कधी त्यापासून होणारा लाभ होणार आहे ४ ११२१ विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्वाति भोग जया ॥ १ ॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ २ ॥ विठ्ठल जागृतिस्वप्नसुषुप्ती । आन दुजें नेणती विठ्ठलेविण ॥ ३ ॥ भूषण अळकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जया नरा ॥ ४ ॥ तुका म्हणे ते ही विठ्ठलचि जाले । सकल्प मुराले दुजेपणे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - ग्रासोग्रासीं- प्रत्येक घास घेत असताना अर्थ - ज्याच्या गायनात विठ्ठल आहे, चित्तात विठ्ठल आहे, सर्व विश्वातो एकमेव विठ्ठल होच आहे ज्याचे सर्व भोगही विठ्ठलमय होत असतात १ आसनावर विठ्ठल, शयनावर विठ्ठलच ज्याला दिसतो, जेवण करीत असताना प्रत्येक घासाबरोबर ज्याना विठ्ठलच प्रतीत होतो २ ज्याच्या जागेपणी, स्वप्नामध्ये, अर्धवट झोपलेल्या अवस्थेतही ज्याना विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही ३ ज्याचे सर्व भूषण व अळकार म्हणने हा एक विठ्ठल आहे व ज्याचा सर्व निर्धार हा विठ्ठलच आहे ४ ते, तुकाराम महाराज म्हणतात, स्वत च विठ्ठलस्वरूपास पावलेले आहेत असे समजावे दुजेपणाची, आपण विठ्ठलावाचून दूर आहोत, अशी भावनाच त्याच्या ठिकाणी उरलेली नाही, असे जाणावे ५ ११२२ दास जालो हरिदासाचा । बुद्धिकायामनेंवाचा ॥ १ ॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदगकल्लोळ । नासे दुष्टबुद्धि सकळ । समाधी हरिकीर्तनीं ॥ २ ॥ ऐकता हरिकथा । भक्ति लागे त्या अभक्ता ॥ ३ ॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पाडुरग ॥ ४ ॥ हें सुख ब्रह्मादिका । म्हणे नाहीं नाहीं तुका ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा - काया-शरीर अर्थ - मी कायावाचामनेकरून या हरिदासाचाच दास बनून राहिलो आहे १ या कीर्तनाच्या स्थानी प्रेमाचा सुकाळ असून टाळ, मृदंग यांच्या गजरात, मनात काही दुष्ट बुद्धी असेल तर ती सर्व नष्ट होईल हरिकीर्तना- मध्ये समाधीचे सुख प्राप्त होईल २ या ईश्वराची कथा ऐकत असताना एखादा अभक्त असला, तरी तो भक्त होऊन जाईल ३ या कीर्तनाचा रंग पाहून तेथे प्रत्यक्ष पांडुरंगही भूलून उभा राहिलेला असतो ४ तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचे कीर्तनामधील सुख प्रत्यक्ष ब्रह्मदेवादिकांनाही प्राप्त होणारे नाही ५ विवरण - वारकरी पंथात कीर्तनभक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण असे सांगितले आहे टाळ, मृदंग, वीणा यांच्या थापाने युक्त असे ईश्वराचे भजन, हरिकथेचे अथवा भक्तीचे निरूपण, नृत्यसंगीताच्या साहाय्यान तल्लीनता व प्रभुप्रेमाची लयलूट, हे कीर्तनाचे मुख्य स्वरूप होय या कीर्तनसुखाची गोडी अनेक संतानी गाइली आहे या कीर्त नाच्या सुखाविषयी सर्वांनाच, ब्रह्मदेवालाही लोभ वाटतो, प्रत्यक्ष अमृतही लाजून दूर मरत, असे तुकाराम महाराजां- नीच म्हटले आहे या कीर्तनाखेरीज दुसरे कुठलेही साधन नका शरण यात प्रभूचे गुणगान, ध्यान, नामस्मरण, सत संग, भजन याचा समावेश असून हे अतिशय सोप असे साधन आहे 'पाहता साधन विठ्ठल कीर्तन । भक्त सजीवन यात्माराम ।', 'नित्य हरिकथा नामावळी । वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ' असा या कीर्तनभक्तीचाच महिमा निवृत्ती- नाथानी गाइला आहे या कीर्तनात ईश्वर आपले वैकुंठीचे स्थान सोडून उभा असतो, अशीही साक्ष संतानी वारंवार दिलेली आहे 'क्षीरसागर सांडोनि हरी । कीर्तनीं उभा सहपरिवारो,' 'कीर्तनाची आवडी देवा । वैकुंठाहूनी पायी
५०२ सार्थ तुकारामगाथा धावा । नवल वैकुंठींच नसे । तो कीर्तनीं नाचतसे ', ' कीर्तनाचे थोर सुख । यदुनायक राहे उभा ', ' नसे वैकुंठीं हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी' अशा शब्दांत एकनाथांनी कीर्तनाचा व देवाचा संबंध वर्णन केलेला आहे. या कीर्तनामुळे दुष्ट बुद्धी नाहीशी होते. पापवृत्ती नष्ट होते अभक्तही भक्त होऊन जातात, अशी ही साक्ष एकनाथांनी वारंवार दिलेली आहे ' धन्यधन्य कीर्तन भूमंडळीं । महादोषा घेतसे झोळी ', ' पातकी घातकी यांसी सोपा पंथ । कीर्तनें सरते कलीमाजी ', ' महापातकी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वद्य जाले ', ' कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं रोया । तरले पातकी ते वेळा ' असे या कीर्तनाचे माहात्म्य एकनाथांनी वर्णन केलेले आहे. महाराष्ट्रातील कीर्तनाचे आद्य प्रवर्तक श्रीनामदेवराय यांची ' नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं ' ही ओळ प्रसिद्धच आहे ' कीर्तन नर्तन याचे जनार्दन । न पवती पतन येरझारी ', ' ऐकता कीर्तन होतो जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाम मात्रें ', ' ' कीर्तनाच्या सुखें सुखी होतो देव । कोणतें वैभव याची आता ' असे या कीर्तनाचे महत्त्व नामदेव महाराजांनी वर्णन केले आहे तुकाराम महाराजांचे कीर्तनावर तर कितीतरी अभंग आहेत याच एका साध्या, सोप्या व सरळ मार्गाचा पुरस्कार त्यांना करावयाचा होता देव, भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम कीर्तनात असल्यामुळे याठिकाणी, ' जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारीनर । तीर्थे तया ठाया । येती पुनीत व्हावया ' असा कीर्तनाचा महिमा असल्याचा तुकारामबुवा एका अभंगात सांगतात ' कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ', याचे कारण असे की, तो विठ्ठलच या कीर्तनात येऊन उभा असतो जो तपश्चर्येने सापडत नाही, तो या कीर्तनात उभा असतो ' न करिता ध्याना । न करिता धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरी ' अशी या धीरगंभीरीची कीर्तनभक्ती तुकाराम महाराजांनी वर्णन केलेली आहे या कलियुगात नामसंकीर्तन हेच एक अतिशय सोपे असे साधन सर्वांना साधुसंतांनी उपलब्ध करून दिलेले आहे ' सोपें वर्म आम्हा सागितले संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ' असे या कीर्तनाच्या साधनाविषयी बुवांनी म्हटले आहे या कीर्तनाच्या लोभासाठी ब्रह्मादेवादी देवही उत्सुक असतात, असे त्यांनी इतरत्रही वारंवार सुचविले आहे स्वर्गामधील देवाची इच्छा आपणास मृत्युलोकात जन्म यावा, अशी असल्याचे त्यांनी सागितले आहे याच कीर्तनामध्ये काया संपूर्ण ब्रह्ममय होऊन जाते असा त्यांचा अनुभव आहे ११२३ गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥ १ ॥ जतन करा जतन करा । धावते सैरा ओढाळ ते ॥ २ ॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥ ३ ॥ तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी वधु' चौऱ्यांशीचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गति-प्रगती अर्थ - आपली प्रगती किंवा अधोगती ही केवळ आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते यासाठी मनात साधुसंताच्या संगतीत किंवा एकांतात लावावे १ या मनास नीट सांभाळा कारण ते ओढाळ असून सैरा- वैरा धावत सुटलेले असते २ आपला मानसन्मान किंवा आपला अपमान हा केवळ या मनाच्या अवस्थेमुळे निर्माण होत असल्याने त्याला ज्याचे ध्यान आपण लावावे, तेच ते करीत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच मनाच्या साह्याने संसारसागरही तरून जाता येतो चौऱ्याऐंशी लक्ष योनींतून मुक्तता केवळ या एका ओढाळ मनास बंधूप्रमाणे वश करून घेतल्यासच होईल ४ विवरण - हे मन मोठे चंचल आहे इंद्रियसुखाकडे धावणारे आहे त्यास प्रथम आवरावे, असे सर्व साधु- संतानी सांगितले आहे आपल्या आयुष्यातील मान व सन्मान हा सर्व या मनाच्या स्थितीगतीवर अवलंबून आहे या मनास जिंका मनास मोकाट सोडू नका. मनाने सुखी समाधानी व्हा या मनास स्वाधीन ठेवाल, तरच तुम्ही संसार- सागर तरून जाल, असा त्यांच्या उपदेशाचा सारांश असतो भगवद्गीतेनेही हे मन मोठे चंचल असून त्याचा निग्रह करणे अवघड असल्याचे सांगितले आहे परंतु अभ्यासाने व वैराग्याने त्याला स्वाधीन ठेवित्ता येते, असाही निर्देश सहाव्या १ बांधु
सार्थ तुकारामगाथा ५०३ अध्यायात आहे. मन जिंकण्याचे किंवा ताब्यात ठेवण्याचे मुख्य साधन कोणते ? तर अभ्यास व वैराग्य ही दोन प्रमुख साधने गीतेने सांगितली आहेत. अभ्यास म्हणजे कोणतीही गोष्ट पुनः पुनः करणे व वैराग्य म्हणजे, राग, प्रीती, लोभ नसणे, अशी अवस्था होय. पातंजलयोगसूत्रातही ' योगश्चित्तवृत्तिनिरोधः ' म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे, याने नाव योग असे सांगून पुढे ' अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ' अभ्यास व वैराग्य यांनीच या मनाचा अथवा चित्तवृत्तीचा निरोध होतो, असे म्हटले आहे; अशा प्रकारे अतिचपळ असणाऱ्या व आवरण्यास कठीण असणाऱ्या या मनाच्या निरोधाचे उपाय सर्वत्र साधुसंतानी सांगितले आहेत. 'मन आधीं मुंडीं । वासनेतें खंडी । विठ्ठल ब्रह्मांडों एक आत्मा' असे श्रीसोपानदेवांनी या मनाच्या निरोधाविषयी म्हटले आहे. त्यांनीही 'विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य । सोवळा आरोग्य हरि देखा' असेच साधन मनाच्या निग्रहाविषयी सांगितले आहे. 'मन एके ठायीं । राहे ऐसे करों कांहीं । सर्व साधनाचे सार । मनों करावा विचार' अशा शब्दांनी सुरुवात करून एकनाथानी मनास उपदेश केलेला आहे. रामदासाचा मनास उपदेश प्रसिद्धच आहे. ' नका धावू तुम्ही संरा । मना मागे या सत्वरा । मन पैं आधीन । तेणें जोडे संतचरण' असा त्यांनी मनो- जयाचा उपाय व परिणामही सांगितलेला आहे, हे मन किती ओढाळ आहे, किती अस्थिर आहे, किती चंचल आहे, यासबंधीही त्यांनी वारंवार उल्लेख केले आहेत. ' मना तूं अधीर अधीर । बहू पातकी पामर । न राहासी स्थिर । क्षणभर निश्चयैं ॥ किती शिकवावें तूतें नायणसी एकचित्तें । बहू गार्णे बोलता सूं तें । नायणसी पामरा ॥' अशा मनाचे स्वभाववर्णन एकनाथानी केलेले आहे. 'बैसतां निश्चळ । मन करी तळमळ । ध्यान धारणा ते थिथी । मन न पावेचि सिद्धी ' असे हठवादी व दुराग्रही मन प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करते. शेवटी 'तुज सांगतसे मना । पाहे पंढरीचा राणा । नको तुजा छंद कांहीं । राहे विठ्ठलाचे पायीं' असे त्यास सांगून 'मन रामों रंगले अवघे मनाचे राम जाले' असा मनोजयाचा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे 'मन करा रे प्रसन्न । सर्वसिद्धींचे कारण' असा तुकोबाचा अभंग आपणास माहीत आहेच ( क्र. २९१ ) तुकारामबुवांनाही मनाच्या ओढाळ व चंचल स्थितीचा अनुभव चांगलाच आला असावा. ' मन उताविळ । जाले न राहे निश्चळ । मन गुंतलें लुल्या । बाप धांवोनि द्या ठाया ', ' मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एक पळ स्थिर नाहीं ' इत्यादी ओळींवरून तुकोबाच्या आयुष्यातही या मनास जिंकण्याचा संग्राम कसा होत असावा याची कल्पना करता येण्यासारखी आहे. अर्थातच तुकोबानी मनास वैराग्याने, नामस्मरणाने, चिंतनाने एकसारखा अंकुश लावलेला असल्यामुळे, त्यांना ते जिंकता आले, व रोज नव्या जागृतीचा टप्पा गाठता आला, हे स्पष्ट आहे. 'तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दीस जागृतीचा ' असा त्यांनी आपल्या साधनेचा निष्कर्ष दिलेला आहे. त्यांनीही मनास वारंवार उपदेश केलेला आहे, तोही मार्गदर्शक होण्यासारखा आहे. 'मना एक करो । म्हणे जाईन पडरी । उभा विटेवरी । तो पाहेन सांवळां ।', 'मना सांडि हे वासना दुष्ट सोडी', वगैरे ओळींतून मनास सावरण्याचे प्रयत्नही त्यांनी सुचविले आहेत. ११२४ पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥ १ ॥ पुंडलिकें हाट भरियेली पेठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ २ ॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥ ३ ॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥ ४ ॥ तुका म्हणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- ओखदा-औषधासही, हाट-बाजार, उदमासी-व्यापारास, धणी-तृप्ती. अर्थ :- या पंढरपूर क्षेत्रात दुःख औषधालासुद्धा मिळायचे नाही. नेहमी सर्वत्र प्रेमसुखाचा सुकाळ असतो. १ या पंढरपूरच्या बाजाराची पेठ भक्त पुंडलिकाने भरविलेली असून त्याने वैकुंठाबरोबरच विठ्ठलही आणून
५०४ सार्थ तुकारामगाथा
येथे उभा केलेला आहे २ आता या ठिकाणी भक्तीच्या व्यापारास कधी तूट येणार नाही या ठिकाणी सर्व प्रकारचे लाभ होऊन मनाची तृप्ती होत असते ३ या ठिकाणचा हा विठ्ठलरूपी माल शिगोशीग पूर्ण मापाने भरलेला अस ल्याने, सर्व देशास पुरेल एवढा विपुल प्रमाणात आहे पंढरपूरची पंचक्रोशी याच विठ्ठलरूपी मालाने दुमदुमून गेलेली आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, सर्व साधुसंतांचे मन तृप्त होईल, असाच माल या पंढरपुरात लाभल्यामुळे ते या ठिकाणीच बसून राहिले आहेत ५
११२५ द्वारकेचे केणें आले याचि ठाया । पुढें भक्तराया चोजवीत ॥ १ ॥ गोधिले विसारे माप केले खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ २ ॥ वैष्णव मापारी नाही जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥ ३ ॥ लाभ जाला त्यांनी धरिला तो विचार । अहिवय परत्र साटविले ॥ ४ ॥ तुका म्हणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं सतांचिया ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा -केणे-माल जिनस चोजवीत-जागवीत, शोध करीत, गोधिले-गुंतवून ठेविले, सळे-मोज- माप, पार-अत, अहिवय-यालोकी, परत्र-परलोकी
अर्थ -द्वारकेत असणारा हा श्रीकृष्णरूपी किंवा विठ्ठलरूपी माल आज या पंढरपूरच्या बाजारात आला आहे, आणि त्याच्यापुढे भक्तराज पुंडलिक असा शोध करीत उभा आहे १ या मालासाठी भक्तानी विसार देऊन या विठ्ठलास गुंतवून ठेविले असल्यामुळे अजूनही हा परत द्वारकेस गेलेला नाही २ सारे वैष्णव माल घ्यावयात सिद्ध झाले असूनही त्याचे मोजमाप कुणासही घेता आलेले नाही व पुढेही कधी त्याचा अंत लागेल असे वाटत नाही ३ ज्याना त्याचा लाभ झाला त्यांनी तोच हातात धरून त्याचे चिंतन केले व या लोकात व परलोकातही त्याची प्राप्ती करून घेतली ४ तुकाराम महाराज म्हणतात या पंढरीच्या क्षेत्रात मलाही मजुरी मिळालेली असून याविषयी मला संतांचा मोठाच विश्वास वाटतो ५
११२६ सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥ १ ॥ साक्षमूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ २ ॥ पंचक्रोशीमाजी रीघ नाही दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥ ३ ॥ निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरी ब्रह्मानंदु ॥ ४ ॥ तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस घेईं कोटि ॥ ५ ॥
शब्दार्थ व टीपा - सुरवर-देवश्रेष्ठ, रीघ-प्रवेश, आपैसा-आपोआप ज्यापें-ज्याच्याजवळ
अर्थ - ज्या क्षेत्रात चंद्रभागा निर्मळपणे वाहात आहे, त्या पेठेत सर्व देवश्रेष्ठ व सर्व तीर्थे याची दाटी झालेली असते १ ही मी काही कोणी सांगितलेली गोष्ट सांगत आहे असे नाही, तर प्रत्यक्ष अनुभवाची बात सांगतो आहे या स्थानाचा महिमा फार मोठा असून त्याचे वर्णनसुद्धा करता येणार नाही २ या क्षेत्राच्या पंच क्रोशीत एकाही दोषाला प्रवेश मिळणार नाही ते सर्व महादोष आपोआप जळून नष्ट होतात ३ या ठिकाणी पुरुष व स्त्रिया निर्विषयी असून देवाप्रमाणे ते चतुर्भुज आहेत प्रत्येक घरात ब्रह्मानंदच निर्माण झालेला आहे ४ तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्याजवळ पुण्याचा लवलेशही नाही, त्याने सरळ पंढरपूरला जावे व वाटेल तेवढे पुण्य संपादन करावे ५
विवरण - वरील तीन अभंगातून तुकारामबुवांनी पंढरपूर या क्षेत्राच महत्व वर्णन केल आहे तुकोबा स्वतः वैश्यव्यवसाय करीत असत तेव्हा त्याच व्यापाराच्या भाषेत त्यांनी चंद्रभागेच्या तीरावर भरलेल्या या विठ्ठल रूपी मालाचे व बाजारपेठेचे वर्णन केले आहे ही बाजारपेठ पुंडलीकान बगविली असून त्याच्याचमुळे सारे वैकुंठ या भतळावर निर्माण झाले, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे या ठिकाणी कुणीही व्यापार केला तर त्यास कधी
सार्थ तुकारामगाथा ५०५ लूट वेगार नाहीं असे तुकोबा सांगतात द्वारकेहून हा श्रीकृष्णरूपी माल पंढरपूरच्या पेठेत सर्वांनाच पसंत पडलेला आहे साऱ्या भक्तांनी याला मोजण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे मोजमाप कुणासही करता आलेले नाही अशा प्रकारे व्यापाऱ्याच्या भाषेत या विठ्ठलरूपी मालाचा सौदा पटविण्याची भाषा या अभंगातून आहे भक्तांना विस्तार देऊन गुंतविल्यामुळे या पांडुरंगास परत द्वारकेस जाताच आले नसल्याचेही तुकोबांनी मार्मिकपणे नमूद केले आहे या द्वारकेच्या राण्यामुळे सर्वच संतांना पंढरपूरविषयी फार मोठा जिव्हाळा वाटतो ज्ञानेश्वरनामदेवाच्या आधीपासूनच पंढरपूर व श्रीविठ्ठल याचा महिमा गाजत असला तरी माहात्म्यवर्णनास खरा प्रारंभ संतांच्या वाट- मयांतूनच होत राहिला श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या क्षेत्राबद्दल आपल्या एका अभंगात म्हटले आहे, 'धणतीर्थ पंढरी। भूर्वकुंठ महीवरी। भक्त पुंडलिकाचे द्वारीं। कर कटावरी राहिला 'पुन दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात, 'पंढरीसी कीर्तन करी। पुंडलिकासी नमस्कारी। विठ्ठलचरण अंतरी धरीं। धन्य जन्म तयाचा' ज्ञानेश्वरनामदेव यांच्या काळा- पासून या पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य विशेष रूपाने गर्जत राहिले पंढरपूर हे क्षेत्र म्हणजेच या भूमीवरील वैकुंठनगरी असे सर्वांचीच समजूत आहे नामदेव हही धंद्याने व्यापारी व दुकानदार, त्यांनीही तुकोबाप्रमाणेच 'इनामाची भरली पेठ । भूर्वकुंठ पंढरी' असे म्हटले आहे या क्षेत्रात सर्व पातकांचा नाश होतो येथील देवळे पाषाण, तृण या सर्वांनाच देवाचेच स्वरूप प्राप्त झालेले असते अशा नामदेवाची साक्ष असून 'अनंत तीर्थांचे माहेर । अनंत रूपाचे सार ।' म्हणजे हे पंढरपूर असे त्यांनी म्हटले आहे 'झळझळित सोनसळा। कळस देखिला सोवळा। वरचे वरचें पंढरपूर । विठोबारायाचे नगर', 'सर्व सुखरासी भिवरेच्या तिरीं । आमुची पंढरी कामधेनू' अशा शब्दात नामदेवांनी पंढरीचे वर्णन मोठ्या काव्यमय भाषेत केले आहे त्यांनाही या क्षेत्रापुढे भुक्तिसुख अथवा ब्रह्मसुख याची पर्वा नाही त्यांनी एका अभंगात स्पष्टपणे म्हटले आहे की, 'आम्हीं स्वर्गसुख मानू जैसा ओव। देसोनियां सुख पंढरीचे। नलगे वैकुंठ न वाटू कैलास। सर्वस्वाची आस देवापार्थी।' तुकारामबुवांचेही अनेक अभंग पंढरपूरचे माहात्म्यवर्णन करणारे आहेत 'आमुची मिरास पंढरी। आमुचे घर भीमातीरीं', 'पंढरीये माझें माहेर साजणी। ओवीये कांडणीं गाऊ गीत', 'पंढरीचे वारकरी। ते अधिकारी मोक्षाचे', 'पंढरीचा महिमा। देता आणीक उपमा। ऐसा ठाय नाहीं कोठें। देव उभाउभी भेटे' इत्यादी शब्दात या पंढरपूर क्षेत्राचे वर्णन तुकारामबुवांनीही केलेले आहे
११२७ विचार नाहीं नर खर तो जैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥ १ ॥ वादावाद करणे त्यासी तोच वरी । गुखाडोची चाड सरे तोच बाहेरी ॥ २ ॥ सौभाग्यसंपन्न हो का वृद्ध प्रतिष्ठ। चिकरूनि १ साठी पाया लागली ते विष्ठ ॥ ३ ॥ नाही याति कुळ फांसे ओढी तयासी। तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खर-गाढव, लगड-ओझे, गुखाडीची-घाणेरड्या जागेची, चाड-किंमत अर्थ - ज्या माणसाला परमार्थाचा विचारच माहीत नाही, तो मनुष्य असूनही गाढवाप्रमाणेच होय उगाच पाठीवर ब्रह्मज्ञानाचे ओझे वाहणारा मात्र तो समजावा १ बाहेरच्या घाणेरड्या जागेची सवय असल्याप्रमाणे त्याला नेहमीच वादविवाद करणे आवडते २ अशा प्रकारचा मनुष्य, मग तो जरी भाग्यवान, धीमंत, वृद्ध, प्रतिष्ठा- वान असला तरी त्याचा धिक्कार पायास लागलेल्या विष्ठेप्रमाणे करावा ३ जो नुसतेच फांसे ओढतो, त्याला याती, कूळ यांची प्रतिष्ठा कधीच नसते तुकाराम महाराज म्हणतात, ह्याच्या माळामुद्रांच्या सोंगाला काय जाळायचेय ? ४
११२८ देव होसी तरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणे न लगे ॥ १ ॥ दुष्ट होती तरी आणिकांते करिसी । संदेह येविशीं करणे न लगे ॥ २ ॥ तुका म्हणे जे दर्पणीं विवळे । ते तया वाणलें निश्चयेंसों ॥ ३ ॥ शब्दार्थ व टीपा - आणिकांते-इतरांना, दुसऱ्यांना, दर्पणीं-आरशामध्ये
१ चिक्करूनि तु गाथा ६४