सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 548, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें५०२ सार्थ तुकारामगाथा धावा । नवल वैकुंठींच नसे । तो कीर्तनीं नाचतसे ', ' कीर्तनाचे थोर सुख । यदुनायक राहे उभा ', ' नसे वैकुंठीं हरी । नाचे कीर्तनीं परोपरी । भक्तांबरोबरी' अशा शब्दांत एकनाथांनी कीर्तनाचा व देवाचा संबंध वर्णन केलेला आहे. या कीर्तनामुळे दुष्ट बुद्धी नाहीशी होते. पापवृत्ती नष्ट होते अभक्तही भक्त होऊन जातात, अशी ही साक्ष एकनाथांनी वारंवार दिलेली आहे ' धन्यधन्य कीर्तन भूमंडळीं । महादोषा घेतसे झोळी ', ' पातकी घातकी यांसी सोपा पंथ । कीर्तनें सरते कलीमाजी ', ' महापातकी तरले कीर्तनीं । प्रत्यक्ष पुराणीं वद्य जाले ', ' कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं रोया । तरले पातकी ते वेळा ' असे या कीर्तनाचे माहात्म्य एकनाथांनी वर्णन केलेले आहे. महाराष्ट्रातील कीर्तनाचे आद्य प्रवर्तक श्रीनामदेवराय यांची ' नाचू कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं ' ही ओळ प्रसिद्धच आहे ' कीर्तन नर्तन याचे जनार्दन । न पवती पतन येरझारी ', ' ऐकता कीर्तन होतो जीवन्मुक्त । दाविसी अनंत नाम मात्रें ', ' ' कीर्तनाच्या सुखें सुखी होतो देव । कोणतें वैभव याची आता ' असे या कीर्तनाचे महत्त्व नामदेव महाराजांनी वर्णन केले आहे तुकाराम महाराजांचे कीर्तनावर तर कितीतरी अभंग आहेत याच एका साध्या, सोप्या व सरळ मार्गाचा पुरस्कार त्यांना करावयाचा होता देव, भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम कीर्तनात असल्यामुळे याठिकाणी, ' जळती दोषांचे डोंगर । शुद्ध होती नारीनर । तीर्थे तया ठाया । येती पुनीत व्हावया ' असा कीर्तनाचा महिमा असल्याचा तुकारामबुवा एका अभंगात सांगतात ' कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ', याचे कारण असे की, तो विठ्ठलच या कीर्तनात येऊन उभा असतो जो तपश्चर्येने सापडत नाही, तो या कीर्तनात उभा असतो ' न करिता ध्याना । न करिता धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरी ' अशी या धीरगंभीरीची कीर्तनभक्ती तुकाराम महाराजांनी वर्णन केलेली आहे या कलियुगात नामसंकीर्तन हेच एक अतिशय सोपे असे साधन सर्वांना साधुसंतांनी उपलब्ध करून दिलेले आहे ' सोपें वर्म आम्हा सागितले संतीं । टाळ दिंडी हातीं घेऊनि नाचा ' असे या कीर्तनाच्या साधनाविषयी बुवांनी म्हटले आहे या कीर्तनाच्या लोभासाठी ब्रह्मादेवादी देवही उत्सुक असतात, असे त्यांनी इतरत्रही वारंवार सुचविले आहे स्वर्गामधील देवाची इच्छा आपणास मृत्युलोकात जन्म यावा, अशी असल्याचे त्यांनी सागितले आहे याच कीर्तनामध्ये काया संपूर्ण ब्रह्ममय होऊन जाते असा त्यांचा अनुभव आहे ११२३ गति अधोगति मनाची युक्ति । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥ १ ॥ जतन करा जतन करा । धावते सैरा ओढाळ ते ॥ २ ॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तेचि करी ॥ ३ ॥ तुका म्हणे मन उतरी भवसिंधु । मन करी वधु' चौऱ्यांशीचा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- गति-प्रगती अर्थ - आपली प्रगती किंवा अधोगती ही केवळ आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते यासाठी मनात साधुसंताच्या संगतीत किंवा एकांतात लावावे १ या मनास नीट सांभाळा कारण ते ओढाळ असून सैरा- वैरा धावत सुटलेले असते २ आपला मानसन्मान किंवा आपला अपमान हा केवळ या मनाच्या अवस्थेमुळे निर्माण होत असल्याने त्याला ज्याचे ध्यान आपण लावावे, तेच ते करीत असते ३ तुकाराम महाराज म्हणतात, याच मनाच्या साह्याने संसारसागरही तरून जाता येतो चौऱ्याऐंशी लक्ष योनींतून मुक्तता केवळ या एका ओढाळ मनास बंधूप्रमाणे वश करून घेतल्यासच होईल ४ विवरण - हे मन मोठे चंचल आहे इंद्रियसुखाकडे धावणारे आहे त्यास प्रथम आवरावे, असे सर्व साधु- संतानी सांगितले आहे आपल्या आयुष्यातील मान व सन्मान हा सर्व या मनाच्या स्थितीगतीवर अवलंबून आहे या मनास जिंका मनास मोकाट सोडू नका. मनाने सुखी समाधानी व्हा या मनास स्वाधीन ठेवाल, तरच तुम्ही संसार- सागर तरून जाल, असा त्यांच्या उपदेशाचा सारांश असतो भगवद्गीतेनेही हे मन मोठे चंचल असून त्याचा निग्रह करणे अवघड असल्याचे सांगितले आहे परंतु अभ्यासाने व वैराग्याने त्याला स्वाधीन ठेवित्ता येते, असाही निर्देश सहाव्या १ बांधु